नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)

Submitted by Anvita on 25 October, 2013 - 01:18

नोकरी / व्यवसाय (दशमस्थान)

बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे " मी नोकरी करणे चांगले कि व्यवसाय ?" .

ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते कृष्णमुर्ती पद्धतीने जास्त चांगले देता येते. त्याकरता जन्मकुंडली कृष्णमुर्ती पद्धतीने बनवलेली असली पाहिजे. पत्रिकेतील ग्रहाचा भाव पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धती मध्ये बदलू शकतात कारण कृष्णमुर्ती पद्धती मध्ये भावारंभ पद्धत वापरली आहे.

दशमस्थान हे कर्म स्थान आहे. त्यामुळे दशम भावाच्या उपनक्षत्र स्वामीवरून नोकरी करणार कि व्यवसाय ते ठरवता येते.

"दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर कोणत्याही प्रकारे सप्तमाचा बलवान कार्येश असेल व चर राशीत असेल तर ती व्यक्ती व्यवसाय करेल . जर दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी षष्ठ स्थानाचा कार्येश असेल तर ती व्यक्ती नोकरी करेल. "

षष्ठ स्थानावरून नोकरीचा विचार करतात व सप्तम हे customer ( गिऱ्हाईक) चा विचार होतो .
कधी कधी व्यक्ती आधी नोकरी करते मग व्यवसाय किंवा नोकरी करता करता एखादा जोडधंदा करते .अशावेळेस बरेच वेळा दशमभावाचा उपनक्षत्र स्वामी द्विस्वभाव राशीत असतो.

प्रथम भावावरून माणसाचा कल/ पिंड कळतो म्हणजे व्यवसाय करण्यास अनुकूल आहे का नोकरीकरता .

चतुर्थ स्थान पण बघावे . कृष्णमुर्ती पद्धती मध्ये शिक्षणाचा विचार चतुर्थ स्थानावरून केला आहे. साधारण पणे शिक्षण व (व्यवसाय /नोकरी )ह्याचा संबंध असतो .
काही वेळा आपण घेतलेल्या शिक्षणाचा नोकरी/व्यवसायाशी संबंध येत नाही. त्याकरता एकंदर पत्रिकेतील
ग्रहयोग , ग्रहाच्या राशी , नक्षत्र , येणाऱ्या महादशा ह्या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो . हे सगळे बघून मग व्यवसाय कोणता असेल ह्याचा अंदाज येतो.

दशमाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे हे पण पाहावे.
उदा. बुध कम्युनिकेशन , लेखन , प्रकाशन, ज्योतिष,कॉम्पुटर , स्तेशनरी, वकिली, पोस्ट इ संबंधात नोकरी/ व्यवसाय दाखवतो .
दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामीचा संबंध कोणत्या भावाशी आहे. त्याचप्रमाणे दशमभाव कोणत्या राशी व नक्षत्रात आहे हे पण बघावे.

आता व्यवसाय म्हटले तरी इतके पर्याय असतात त्यामुळे नक्की काय हे बऱ्याच वेळा अवघड असते . पण त्या व्यक्तीची आवड , क्षमता , शिक्षण येणाऱ्या महादशा ह्या सर्वाचा विचार करून मग ठरवावे.

पत्रिकेच्या आर्थिक स्थिती वरून मग व्यवसाय यशस्वी होईल का? चांगल्या पगाराची नोकरी मिळेल का? ह्या बाबत अंदाज येतो .
दशमाचा उपनक्षत्र स्वामी जर २,६,७,१०,११ ह्या भावाचा बलवान कार्येश असेल तर व्यवसायात चांगले यश मिळते .

साधारणपणे जर ५,९,८ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात अडचणी येतात . बहुतेक वेळा जर दशा/ अंतर्दशा अष्टम स्थानाचे फळ दाखवत असेल तर मनस्ताप पण होतो. त्यामुळे ह्या काळात नोकरी बदलू नये . साधारणपणे २,३,६,१०,११ ह्या स्थानाच्या दशा असतील तर नोकरी/ व्यवसायात चांगली प्रगती होते .जो/जे ग्रह दशम स्थानाचे बलवान कार्येश असतात त्या ग्रहाच्या दशा/ अंतर्दशा नोकरीत प्रमोशन / व्यवसायात प्रगती दाखवतात.

माझ्यामते मी दशमस्थानाबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जाणकारांनी अजून आपली मते व अनुभव मांडावेत .

(संदर्भांकरता सुनील देव , सुरेश शहासने, ज्योतिन्द्र हसबे ह्याची पुस्तके वापरली आहेत . )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

limbutimbu , धन्यवाद !
कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास जरूर करा . पारंपारिक पद्धत व कृष्णमुर्ती ह्या दोन्हीचा समन्वय साधला तर फारच चांगले.

प्रश्नकुंडली मध्ये एखादा प्रोजेक्ट मिळेल कि नाही हे बघण्यासाठी पण दशमाचा उपनक्षत्र स्वामी बघतात .

दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर प्रथम स्थानात असेल तर त्या व्यक्तीस समाजकार्य करण्याचे योग असतात /करते . त्याचा जर लाभाशी संबंध आला तर प्रसिद्धी मिळते . पण प्रथमस्थान हे द्विताय ( धन ) चे व्यय स्थान असल्यामुळे इतर धनस्थाने बलवान नसतील तर फारसा पैसा मिळत नाही.

नोकरीसंबंधी पुढील प्रश्न कसे बघावेत?
१. नोकरीचे स्वरुप - कायम स्वरुपी, तात्पुरती, पार्ट टाईम
२. नोकरीतील बदल - जॉब चेंज
३. बढती
४. नोकरीतून काढून टाकणे (गैर व्यवहार किंवा वाईट वर्तणूक)
५. नोकरीनिमित्त प्रवास - परदेश प्रवास्/देशांतर्गत बदली
६. नोकरी सुटणे - कंपनी बंद होणे, ले ऑफ वगैरे

या संबंधी काही उदाहरणे असतील तर उत्तमच

अशा प्रकारचे प्रश्न कृष्णमुर्ती पद्धतीने चांगले बघता येतात

१. नोकरीचे स्वरुप - कायम स्वरुपी, तात्पुरती, पार्ट टाईम
ह्या साठी दशा स्वामी बघावा . महादश स्वामी जर १,५,९ ह्या भावांचा कार्येश नसेल तर नोकरी कायम स्वरूपी असते

२. जर दशा स्वामी ६,१० बरोबर १ ,५,९ चा पण कार्येश असेल तर जॉब बदलण्याकडे कल असतो व जॉब बदलतो

३. बढती
साधारण पणे दशा स्वामी व अंतर्दशा स्वामी दशम व लाभ ह्या स्थानाचे कार्येश असतील तर त्या काळात मिळते .

४. नोकरीतून काढून टाकणे (गैर व्यवहार किंवा वाईट वर्तणूक)
ह्या बाबतीत प्रश्नकुंडली बघावी . दशमाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल व १,५,९,८,१२ह्याचा कार्येश
असेल व तशाच दशा असतील तर नोकरीतून काढून टाकण्याची शक्यता असते

५. नोकरीनिमित्त प्रवास - परदेश प्रवास्/देशांतर्गत बदली ह्यासाठी दशा स्वामी ९,१२ चा कार्येश असावा लागतो

६. नोकरी सुटणे - कंपनी बंद होणे, ले ऑफ वगैरे
ह्यासाठी पण प्रश्नकुंडली जास्त उपयुक्त आहे. तसेच त्या व्यक्तीच्या पत्रिकेत पण जॉब जाण्याचे योग असायला पाहिजेत.

अन्विता

मी सुद्धा कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास सुरु केला होता परंतु मला एफिमेरि ज व

रॅफेल्स टेबल मिळाले नाहि

कुठे मिळेल?

दशमस्थानात मिथुनेचा राहु १८ अंशावर असताना, दशमेश बुध चतुर्थात केतु आणि मंगळाच्या युतीत आणि भाग्येशाच्या नक्षत्रात ( पुर्वाषाढा ) राहुच्या महादशेत गुरुच्या अंतर्दशेत काय फळे मिळतील ?

नितीनचंद्र , एवढ्या माहितीवर नाही सांगता येणार कारण कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका केल्यास काही वेळेस ग्रह स्थान बदलतो . तसेच राहूचे नक्षत्र आणि sub पण बघायला लागेल . तसेच बुध शुक्राच्या नक्षत्रात असला तर मग शुक्र कुठे आहे ( कृष्णमुर्ती पद्धतीच्या पत्रिकेत) ते पण बघावे लागेल .
त्यासाठी पूर्ण कृष्णमुर्ती पद्धतीने बनवलेली पत्रिकाच आवश्यक आहे.

Dear Anvita,

Badlun majha pratisad dete ahe,

Date of Birth 10.11.1981
Place Of Birth: Mumbai
Birth Time 14.25
Could u help me with regards to job change. i want to change my job since last 1 year but could no luck.

can you kindly guide me, if this is not right time to change. My office place is very far from my home ,,

Regards
Mani

mani ,
Actually १२ sep २०१३ पर्यंत तुम्हाला रवीची दशा होती ती करियर च्या दृष्टीने फारशी चांगली नव्हती .कारण रवि मुख्यत्वे अष्टमाची फळे देत होता . परंतु आता चालू झालेली चंद्राची दशा २,६,११ हि नोकरीच्या दृष्टीने चांगली स्थाने देत आहे. त्यामुळे आता नवीन जॉब मिळण्याच्या दृष्टीने चांगलेच आहे. प्रयत्न करा . जरूर चांगला जॉब मिळेल .

अन्विता, आपला हा लेख फारच अभ्यासपूर्वक लिहिलेला आहे. असेच मार्गदर्शन करीत राहा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!

deepalideo , धन्यवाद!

माझे लेख आता माझ्या ब्लोग वर वाचू शकता . anaghabhade.blogspot.in
तुमच्या प्रतिसादांचे / सूचनांचे स्वागत आहे .

कृष्णमूर्ती पध्दत खरोखरच उपयोगी आहे का ?

एखाद्याचे ग्रह जन्मलग्न
(ढोबळ)कुंडलीत चांगले वाटतात परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र काहीच फळे दिसत त्याचे कारण शोधण्याचा खटाटोप आहे का ?
नाहित

srd ,
कृष्णमुर्ती पद्धती मध्ये उच्च ग्रह नीच ग्रह असे वर्गीकरण नाही. प्रत्येक ग्रह हा त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फळ देतो .
त्यामुळे वरवर चांगला वाटणार ग्रह बर्याच वेळा वेगळीच फळे देताना दिसतो .
त्यामुळे कृष्णमुर्ती पद्धती हि महादशेचे फळ बघण्यात जास्त प्रभावी वाटते. बाकी जे ग्रहयोग ( नवपंचम योग , केंद्र योग युती योग) पारंपारिक पद्धतीप्रमाणे आपण बघतो त्यांना तर महत्व आहेच .
त्यामुळे कृष्णमुर्ती पद्धत व पारंपारिक पद्धत ह्या दोन्हींचा विचार केल्यास जास्त अचूक उत्तरे येतात .

माझे सर्व लेख आता माझ्या ब्लोग वर पण आहेत . anaghabhade.blogspot.in
तुमच्या प्रतिसादांचे / सूचनांचे स्वागत आहे .

जन्म तारीख १७. ०९ . १९८५
जन्म वेळ ०६.०५ am.
जन्म ठिकाण चिपलुन

अन्विताजि
क्रुपया मार्गदर्शन करावे.
मला जॉबबद्दल काही सल्ला मिळेल का?? मि सध्या (EQUTY MARKET ) MADHE
जॉब करतोय पण काहीच मनासारखं होतं नाही.

रस्सा , तुमच्या पत्रिकेप्रमाणे आत्ता equity मार्केट मध्ये जोब योग्यच वाटतो आहे . साधारण जुलै २०१४ पासून त्याकरत दिवस अजून चांगले वाटत आहेत . निराश होऊ नका .

कार्येश ग्रह कसे काढावे हे कोणत्याही कृष्णमुर्ती पद्धतीच्या पुस्तकात सापडेल जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर लवकरच मी ब्लोग (anaghabhade.blogspot.in ) वर ह्या संदर्भात लेख लिहीन .

Hi Anviata,
can you please send your email ID i have some question I will send you my required details, Your valuable guidance will be helpful to plan my future.

Thanks,

Pages