क्रोशा फ्रॉक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 October, 2013 - 03:18

खुप दिवसांपासुन मायबोलीवर अवल, जयवी-जयश्री आणि इतरांचे कोशा वर्क पॅटर्न पहात होते. आपणही करावे असे खुप मनाय यायचे ते पाहून. पूर्वी आई दोर्‍यावर विणकाम करायची. पण मला समजू लागले तोपर्यंत तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला म्हणून तिने सोडून दिले. पण तिने मला साखळी आणि खांब शिकवली होती. नंतर आजूबाजूचे पाहून कॉलेज लाईफच्या वेळी रुमाल वगैरे केले होते पण ते असेच पाहून केलेले होते. त्यात शास्त्रशुद्धपणा नव्हता. बेसीक नॉलेज नव्हते. कशाला काय बोलतात हेही माहीत नव्हते. शिवाय त्यात एवढा गॅप पडला होता. एकदा अवलच्या ऑनलाईन क्लासचे ऐकले. पण ऑनलाईन कितपत कळेल ह्याबद्दल मला शंकाच होती.

त्यात एक दिवस राधाच्या वाढदिवसाच्या दरम्यान शांकली आणि आरतीने मिळून गिफ्ट पाठवले. शांकलीने सुंदर गुलाबी फ्रॉक विणलेला राधासाठी आणि अवलने मोठ्या श्रावणीसाठी स्कर्ट. सोबत एक प्रेमळ पत्र. ते क्रोशा काम पाहून तर मी शिकायचे पक्केच केले. शांकली पण इतक्या लवकर इतके सुंदर विणते हे पाहून माझा उत्साह दुणावला. मग मी लगेच आरतीला सांगुन शिकण्याचे पक्के केले.

अवलने मला पहिला एक पर्स शिकवली. त्याचे फोटो मी सगळ्यांना पाठवले तेव्हा माझ्याच नात्यातले ४ विद्यार्थी माझ्यासाठी तयार झाले Lol जाऊबाईंना तर शिकवायला पण सुरुवात केलेय. अवलची मी सगळ्यात डोकेदुखी विद्यार्थी असावे. कारण मी रात्री घरातली कामे आवरल्यावर, मुली झोपल्यावर ११.३० ला तिला छळायला सुरुवात करते. एक दिवस तर तिला १ वाजवला होता ऑनलाईन. Lol सहनशिल आहे बिचारी. Lol त्यात आमच्या गप्पा जास्त आणि विणकाम कमी असा प्रकार. गप्पांमध्ये सगळ्या विद्यार्थिनींचे ती कौतुक करत असते बरं.

पर्स नंतर मी तिच्याकडे मोठ्या मुलीसाठी फ्रॉक विणायला शिकायचे पक्के केले कारण छोट्या राधासाठी आधीच शांकलीने पाठवला होता. अवलने लगेच संमती दिली आणि गप्पा मारत, हसत खेळत तिने हा फ्रॉक माझ्याकडून करवून घेतला. तिची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे. लगेच समजते. खालील २६ इंची फ्रॉक करायला जवळ जवळ २० दिवस गेले. घरात तर सगळ्यांना आवडला. आहोंनी पण भरपुर कौतुक केले. पुतण्याला खरेच वाटत नाही मी केला म्हणून पण त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा लागला.

पहिला फ्रॉक गुरूचरणी समर्पीत.

१) समोरची बाजू

२) पाठची बाजू

३) फुलात बटण माझ्या आयडीयाने लावले हो Lol

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त केलयंस गं.. वेळ काढतेस ते महत्वाचे.

मला खरे तर काहीच काम नसतानाही मला अजिबात वेळ नसतो. काय करते मी हा एक मोठ्ठा प्रश्न आहे. तु मायबोलीच्या व्यसनातुन काहीतरी क्रियेटिव करतेयस. मी नुसतीच व्यसनाधीन... Sad Happy

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. काही दिवस ऑफिसला आले नव्हते त्यामुळे प्रतिसाद द्यायचे राहीले.

वा! जागू, मस्त झाला आहे फ्रॉक! रंग तर खुपच गोड आहे. तुमच्या गुरु शिष्येचे खरंच कौतुक वाटते. तुझी कमाल आहे रात्री ११.३० ला शिकवणी! बापरे!

बापरे, जागु ______________________/\______________________ तुस्सी ग्रे८ हो! Happy

Pages