"कडक पृथ्वी" - "सौम्य मंगळ"

Submitted by गुलाम चोर on 22 October, 2013 - 00:29

हो - नाही - हो करता करता अखेर फायनल झालेलं आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था लवकरच मंगळावर (तोच तो आपल्या भारतीयांच्या जीवनात 'चहा' , इस्त्री यांच्या खालोखाल 'कडक' मानला जाणारा…) यान पाठवणार आहे. मोहीम यशस्वी होईल असं गृहीत धरू.. नाही धरू'च' (कारण शेवटी आपल्या खिशातूनच जाणार आहेत हे पैसे). सारे काही नियोजनानुसार झाल्यास या महिन्याच्या अखेरीला भारताचे 'मंगलयान' मंगळाच्या दिशेने झेपावेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ आपली मुद्रा आणखी ठळक करतील.

आता मला अशी शंका आहे कि, जर आज - उद्या - १०० वर्षांनी मंगळावर वस्ती शक्य झाली तर....

मंगळ बाबा आपसूकच तिथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या "स्वगृही" असणार ना?
तिथे जन्माला येणाऱ्यांच्या पत्रिकेत "कडक पृथ्वी" असू शकेल का?
'पृथ्वी'चा कोणत्या रंगाचा खडा कोणत्या बोटात परिधान करायला लागेल?
तिकडच्या 'कालनिर्णय'मध्ये सोमवार नंतर "पृथ्वीवार" असणार का?
शिनेमावाले 'ड्वायलॉक' लिहिताना, "लडकी मांगलिक है.. " याऐवजी काय लिहितील?
भोंडला खेळताना "आज कोण वार बाई आज कोण वार" मध्ये, "आज आहे पृथ्वीवार' असं म्हणून मग कोणाला नमस्कार करणार?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबुटिंबु.... सगळ्या प्रतिक्रिया Lol
'पृथ्वी'चा कोणत्या रंगाचा खडा कोणत्या बोटात परिधान करायला लागेल? <<<<< निळ्या-हिरव्या मिश्र छटांचा, पण याप्रकारचा खडा/रत्न अन्य कोणत्या ग्रहावर मिळतो का ते ही तपासावे लागेल.>>>> हे मात्र शक्य नाही कारण जोपर्यंत माणुस मंगळावर वस्ती करायला लागेल तोपर्यंत पृथ्वीवर फक्त काळा रंग शिल्लक राहिलेला असेल. "प्रदुषणाने काही दिवसात पृथ्वीवरील जमिनीचा आणि पाण्याचा रंग हाच होणार आहे. अजुन काही वर्षाने जन्माला येणार्‍या पिढीला हिरवगार गवत/झाडं आणि निळशार पाणी ही कवीकल्पना वाटणार आहे." ही माझी या प्रश्नावरची प्रतिक्रिया.

अरे हो की मुग्धा, ते मी विसरलोच होतो, तर मग पृथ्वीकरता काळ्यारंगाचाच खडा वापरावा लागेल असे दिसते आहे. Sad

>>>> पृथ्वीवरुन दूर जन्म होणार असेल, तर कुंडली मांडण्याची सध्याची पृथ्वीकेंद्रित (मेदिनीय) पद्धत बदलून सूर्यसिद्धान्तानुसार सूर्याला केंद्रस्थानी मानुन मांडावी लागेल <<<
यात अजुन भर म्हणजे, दोन ग्रहांचे दरम्यान अंतराळात जन्म झाल्यास सूर्यसापेक्ष नक्षत्रपट्ट्याच्या आधारे ती जागा निश्चित करुन ते नक्षत्र/रास प्रथमस्थानी माण्डावी लागेल! तसेच, यानाने उड्डाण्ण केल्यापासून कोणत्या ग्रहापासून किती अंतरापर्यंत तो तो ग्रहच मानायचा व किती अंतरानंतर अंतराळ मांडायचे याची कोष्टके करावयास लागतील. सोलापुरचे दातेपंचांगवाले अशा कोष्टकात निष्णात आहेत, ते करतीलच! Proud
माझे अंदाजानुसार, कदाचित हां, पण कदाचित कुंडली सपाट पृष्ठभागा ऐवजी त्रिमितीतील दाखविण्याचाही प्रघात पडू शकेल. जसे की क्यूब दाखवुन, मधे केंद्रभागी सूर्य गृहित, मधल्या आडव्या प्रतलावर सूर्यमाला असे काहीसे. अन अर्थातच बारा मूळ घरांचे जोडीने, अन्य किमान ३६ घरे वाढू शकतील Proud
करा, विचार करा, अन आत्तापासूनच अभ्यासाला लागा, ज्योतिषाशास्त्राला मरण तर नाहीच, पण भरपुर स्कोप आत्तापासूनच दिसतो आहे Wink
अशा प्रश्नांचे धागे निघणे, याचाच दुसरा अर्थ असाही होतो की बघा विचारी मनुष्य जमात केवळ याच जन्माच्या नव्हे तर पुढील कुठल्यातरी जन्मात कोणत्यातरी ग्रहावर जन्म वगैरे झाल्यास तेव्हाचे भविष्य /कालखंड कसा जाईल याचीही चिंता करते, मग मला सांगा, कुठल्या कायद्याने "ज्योतिषांवर" बंदी घालता येईल? Proud
कारण प्रश्न उद्भवला की कुठेतरी उत्तरही असतेच, फक्त शोधावे लागते. अन भविष्याबाबतचे प्रश्न ज्योतिषी नाही सांगणार तर कोण सांगणार? Wink

याव्यतिरिक्त, पूर्वी कसे आफ्रिकेतील लोकान्ना अमेरिकायुरोपमधे नेऊन गुलाम म्हणुन वापरीत, तसेच एका ग्रहावर जन्मलेल्यान्ना, दुसर्या ग्रहावर "गुलाम" म्हणून घेऊन जाणार्‍या गुलामचोरांबाबतही ज्योतिषशास्त्राला दखल घ्यावी लागेल. Proud
यातिल कोणत्या ग्रहावरील जन्ता "मागास" असेल, व कोणत्या ग्रहावर जाण्याकरता आसुसलेली असेल, कोणत्या ग्रहावरील जन्ता सद्यस्थितीतील अमेरिका/चीन/पाकिस्तान प्रमाणे वागेल, कोणत्या ग्रहावर कम्युनिझम फळेल्/फुलेल ते अभ्यासणेही ज्योतिषांच्या द्रुष्टीने आव्हानात्मक ठरेल. Proud

एल. टी.

णिषेढ,

आमच्या आफ्रिकेतलेच नै काय, तूमच्या थोर भारतातले लोक पण गुलाम म्हणून, दक्षिण आफ्रिकेत, केनयात,
मॉरिशियसमधे, फिजीमधे, वेस्ट इंडीजमधे नेल्ते. Happy

अरे व्वा, दिनेशभाऊ, तुम्ही वाचताय होय Happy छान.
असेल असेल, तुम्ही म्हणता तसेही असेल, पण जास्त चर्चा आफ्रिकेची झाली नव्हं?

limbutimbu - अबब च आहे तुमचा प्रतिसाद...
बाकि निलीमा ची शन्का मला पण आली ... हे गुलाम चोर महाशय कुठे गायब झालेत..?? आपल्याला कामाला लावून ?

थोडे विषयांतर, खास एल टी साठी,

या भारतीय लोकांनी संधी मिळताच आपला उत्कर्ष करून तर घेतलाच पण आपली भारतीय संस्कृती आणि धर्मही जपला ( आपण मात्र त्यांना विसरलो. ) दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठे देवालय, फिजी मधे आहे.

दिनेशभाऊ, ग्रेट! याबद्दल आजही काही माहीती "शिक्षण वगैरे क्षेत्रातून" मिळणे दुरापास्त आहे. Sad
तुमच्यासारख्या कुणी जाणत्याने सांगितले तरच कळणार.

मंगळागौरीच्या ऐवजी कोणती पूजा करतील?>>>> धरणीमायेची.
सप्तशतीच्या पोथीत पोथी पूर्ण झाल्यावर 'अपराधक्षमापन स्तोत्र' म्हणावयाचे असते. सप्तशतीच्या पोथी वाचताना त्यात अनवधानाने विसर्ग, बिंदु, मात्रा इ.चे उच्चारण राहुन गेले असल्यास त्याबद्दल मागितलेली क्षमायाचना आहे. मंगळावर रहायला गेलेल्या लोकांना पृथ्वीवर केलेल्या अपराधांसाठी असेच एखादे स्तोत्र रचावे लागेल.

हो ना मुग्धा, अगदी बरोबर बोल्लीस.
शिवाय, पृथ्विवरुन तमाम जीवन्त जन्ता अन्य ग्रहांवर गेल्यावरही, पृथ्वीवरील मृतांचे आत्मे, त्यान्चे काय होईल? कारण ते काही परग्रहावर जाऊ शकतिल अशी शक्यता दिसत नाही, अगदीच एखाददुसरा चूकार चळवळ्या आत्मा एखाद्या यानाला धरुन गेला तर जाईल, पण बाकीचे इथेच!
तर मग पृथ्वीचे स्वरुप जुन्या झपाटलेल्या पडक्या वाड्याप्रमाणे होईल की काय अशीही एक शन्का मला येते आहे. Proud
बायदिवे, त्यावेळेसच्या अंतराळयान्नान्ना देखिल लिम्बुमिर्ची बान्धावी लागेल का असे आत्मे येऊ नयेत म्हणुन? Wink

मंगळावरच असल्यावर तिकडच्या जातकाच्या कुंडलीत 'भू' हा ग्रह मंगळाची जागा घेईल .असे बदल करावे लागतील (१) मंगळाच्या दोन राशी पैकी वृश्चिक रास रविला अधिक देणे .रविच्या दोन स्वराशी होतील.(२)बुधाची कन्या रास 'भू'ला देणे अधिक मंगळाची मेष अशा दोन भूसाठी स्वराशी .(३)भूची उच्च रास कुंभ ,नीच सिंह .(४)मंगळा वरच्या मुलाला 'थंडपणा' असा भूदोष सांगता येईल .(५)रवि आणि शनिगटाशी भूचे बुधासारखे समतोल सख्य राहिल .(६)रत्न कोणते द्यावे ?

लिंबुभाउ............ कंटाळा आला हो आता... तेच तेच काय उगळत बसतात ... ते काय चंदन आहे का ?

Light 1

>>>> कंटाळा आला हो आता... तेच तेच काय उगळत बसतात ... <<<< Lol खीऽखीऽखीऽखीऽ
क्का? इतक्यातच दोनचार पोस्टीतच कण्टाळलात?
बघा, स्वतःवर आलं की कस होत!
अन ह्याच अशाच वावदूक आचरट निधर्मी/अन्नीसी/बुप्रा/अश्रद्ध/निरर्गल प्रतिक्रिया जिथे जिथे हिंदुत्ववादी/ ज्योतिष/ धर्मविषयक चर्चा गांभिर्याने अन सश्रद्धेने होत असताना तिथे तिथे येऊन पडतात तेव्हा आमचे काय होत असेल? आम्ही कधी बोल्लो का की कंटाळलो म्हणून? Proud

माझ्यावर कधीच काहीच येत नाही लिंबुभाउ Biggrin

पण किमान हे लेख विनोदी अंगाने घ्या... इथे पण तुमचे हिंदुत्ववादी ब्रिगेडी हिंदुधर्म खतरे मे ...सारख्या घोषणा देउन काय उपयोग ?

>>>> पण किमान हे लेख विनोदी अंगाने घ्या... <<<<<
ऽऽआँ? म्हन्जे??? माझ्या आधीच्या विनोदी अंगाने घेतलेल्या पोस्टीन्नी तुम्हाला हसू नै आल? Sad
अरे रे, मी पुन्हा नीटपणे प्रयत्न कर्तो बर्का, तसही विनोदाच अन आमच वावडंच.

Srd, पृथ्वीकरता राशी निश्चित करण्याची कल्पना परफेक्ट, तो मुद्दा राहूनच गेला होता. राशींची तुमची निवड देखिल अचूक. धन्यवाद.

तर मग पृथ्वीचे स्वरुप जुन्या झपाटलेल्या पडक्या वाड्याप्रमाणे होईल की काय अशीही एक शन्का मला येते आहे.>>>आणि मग मंगळावरील टिव्हीवर पृथ्वीवर गेलेल्या आणि आत्म्यांच्या तावडीत सापडलेल्या लोकांच्या भयकथा दाखवल्या जातील. fear files - earth stories.
पण लिंबुभौ खरच पत्रिका, ग्रहदोष वगैरे वाचुन कंटाळा आला. दुसर काहितरी लिहा.

>>>> दुसर काहितरी लिहा <<< ओके
विषय द्या, धागा द्या, फटकेबाजीला मैदान द्या!

बायदिवे, मी सध्या "निवृत्ती" बाबत गांभिर्याने विचार करतोय, Happy परवाच एका मित्राला आमनेसामने अध्यात्मातील अपेक्षित "निवृत्ती"वर दोन तास लेक्चर झोडून बोअर केलय Proud पण ते विषय इकडे चालणार नाहीत.

मागल्याच आठवड्यात आख्ख कडाप्प्याच किचन ओटा/मांडण्या वगैरे उचकटून दुसर्‍या खोलित नेऊन बांधले, रन्गकाम केले, पण ते इथे सान्गुन काय उपयोग?

आज सकाळी लोखण्डी रॅकला ऑईलपेण्ट फासुन आलोय.

उद्या भोरजवळ कोणतेसे रिसॉर्ट आहे तिथे जाणारोत. तिथे अ‍ॅडव्हेन्चरस स्पोर्ट आहेत म्हणे, तिथेच रॉक क्लायम्बिन्गही आहे, ते करायचा विचार आहे. त्या करता क्यानव्हास स्पोर्ट्स शूज आज विकत घेणारे. पोराचे शूज माझ्या पायाला येत नाहीत, तिन बोटे मोठ्ठे होतात.
भिन्तीवर चढल्यावर वरुन खालचे फोटो काढायला क्यामेरा गळ्यात अडकवायची सोय करायला हवीये.

तिथेच "रेन डान्सची"(?) सोयही आहे म्हणे. तिकडे मात्र मी जाणार नाही. एकतर नाचता येत नाही, त्यातुन गार पाणी नको वाटते, हां गरम पाण्याचा रेन डान्स असेल तर मग न नाचता (फुकटात) आन्घोळ करुन घेईन म्हणतो.

बाकी डोक्यावर पाणी पडल की तोन्डातुन आपोआप गाण्याची लकेर का निघते हे मला सांगता येत नाही. पण त्या लकेरी ऐकुन बाकिच्यान्चे डान्स आपोआप थाम्बले नाहीत म्हणजे मिळवले. कुणी सान्गाव? दुप्पट जोरातही नाचू लागतील.

एक मात्र खरे, की चाळीतील सामाईक बाथरुममध्ये बाहेर नम्बरकरता ताटकळत अस्लेल्यान्ना ऐकु जाइल इतपत मोठ्याने बाथरुम गायकी करण्याचे सौख्य काही औरच. हल्लीच्या पिढीला त्यातिल रंगत कळणारच नाही.

अन आपल्या आधी बाथरुममधे जाऊन किन्चाळत किन्चाळत विनाकारण टाईमपास करणार्‍याला "भ" च्या बाराखडीत शिव्या घालण्याचे सौभाग्य ज्याला लाभले आहे तो जगातील कोणत्याही प्रसंगास तोंड देऊ शकतो यावर माझा खासा विश्वास आहे.

बायदिवे, सकाळी सकाळी ऑफिसला येताना एका बाईकवाल्याने मला विनाकारण कट मारला/झासा दिल्याबरोबर मी त्याला जोरात "एऽऽ प्पाव्वट्ट्याऽऽ सुक्काळीच्या" म्हणून ओरडलो, तसा तो न थांबता दिसेनासा झाला. आता थाम्बला अस्ता तरी मी काय करु शकणार होतो म्हणा?

अहो लिंब्याभौ याच विषयावर पत्रिका ग्रह्दोष सोडुन दुसर काहितरी लिहा अस म्हणाले मी. तुम्ही फार म्हणजे फारच दुसर लिहिलत ब्वा.

अहो पण मूळ धागाच "पत्रिका/ज्योतिषावरचा" आहे ना Sad

असो.
तर मी काय म्हणत होतो? की उद्या जयपुरसिटीसारखी लाल सिटी जर मंगळावर उभारायची ठरले तर तिचा तिथला रंग कोणता असावयास हवा? फिक्कट हिरवा/निळा/जांभळा? की अजुन कोणता?

मंगळावरील मातीच्या वीटा काय रंगाच्या असतील?

उद्या जर मंगळावर सोन्याच्या गुणधर्माचाच पण पूर्ण वेगळ्या रंगाचा चमकता धातू मिळाला तर त्याचे नाव काय ठेवता येईल?

मंगळावर एचटूओ या कॉम्बिनेशन ऐवजी वेगळ्याच कॉम्बिनेशनने बनलेले पाणीसदृश द्रव मिळू शकेल का? अन समजा असे द्रव अल्कोहोलच्या जवळपासचे गुणधर्म दाखवित असेल तर काय होईल?

जेव्हा वेगवेगळ्या ग्रहांवर वस्ती होईल, तेव्हाच्या आयपीएल मधे संघ ग्रहांच्या नावे ओळखले जातिल का?

ध्वनीवहन होण्यासाठी वातावरण वा तत्सम माध्यमाची जरुरी अस्ते असे म्हणतात, जर मंगळावर तसे नसेल तर काय होईल? हळूहळू माणूस बोलणे व ऐकणे हे अवयव गमावू शकेल काय?

मंगळावर जीवसृष्टी वर वर तरी दिसली नाहीये असे म्हणतात, पण भूमिगत जीवसृष्टी असू शकेल काय? किंवा जुन्या स्टारट्रेकमधे दाखविल्याप्रमाणे खडक वगैरे भूभागच सजिव असू शकेल काय?

मंगळावर वस्तीकेल्यावर सांडपाणी/टाकाऊ द्रव्ये यांचा निचरा करण्याची सोय काय करावी लागेल? की तेव्हाचे पर्यावरणवादी त्यावरुनही भान्डत बसतील?

मंगळावर हिरवा / निळा रंग बघायला मिळणे दुर्मिळ असेल ना?

मंगळावरचे होकायंत्र कसे असेल?

मंगळावरील वास्तुशास्त्राप्रमाणे दिशांचे शुभाशुभ कसे ओळखावे?

तोवर मंगळसुत्र हा प्रकार म्युझियममधेच बघायला मिळेल कदाचित, पण समजा अस्तित्वात असलाच, तर विवाहित स्त्रिया (तेव्हा विवाह होत असल्यास) नवर्‍याच्या नावाने जे गळ्यातले गंठन घालतील त्यास मंगळसूत्र म्हणतील की अजुन काही?

१. जेव्हा वेगवेगळ्या ग्रहांवर वस्ती होईल, तेव्हाच्या आयपीएल मधे संघ ग्रहांच्या नावे ओळखले जातिल का?>>> नक्किच.
२. ध्वनीवहन होण्यासाठी वातावरण वा तत्सम माध्यमाची जरुरी अस्ते असे म्हणतात, जर मंगळावर तसे नसेल तर काय होईल? हळूहळू माणूस बोलणे व ऐकणे हे अवयव गमावू शकेल काय?>>> ईईई कसा दिसेल ना कान आणि तोंड नसलेला माणुस?
३. मंगळावर वस्तीकेल्यावर सांडपाणी/टाकाऊ द्रव्ये यांचा निचरा करण्याची सोय काय करावी लागेल? की तेव्हाचे पर्यावरणवादी त्यावरुनही भान्डत बसतील? 'पर्यावरणवादी' या नावातच वाद आहे त्यामुळे पृथ्वी काय मंगळ काय किंवा अन्य कुठलाही ग्रह काय ते वाद घालणारच.
४. तोवर मंगळसुत्र हा प्रकार म्युझियममधेच बघायला मिळेल कदाचित, पण समजा अस्तित्वात असलाच, तर विवाहित स्त्रिया (तेव्हा विवाह होत असल्यास) नवर्‍याच्या नावाने जे गळ्यातले गंठन घालतील त्यास मंगळसूत्र म्हणतील की अजुन काही?>>> तोपर्यंत जर इतर ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण झाली तर मंगळ आणि इतर ग्रह अशा सोयरिकी होतील आणि मग नवरा मुलगा ज्या ग्रहावरचा आहे त्या ग्रहाचे नाव त्या गंठनाला दिले जाईल. उदा. मुलगा जर गुरुवरचा असेल तर ते गंठन 'गुरुसुत्र' या नावाने ओळखल जाईल. शनी-मंगळ सोयरीक म्हणजे आपल्याकडचे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह मानले जातील आणि चुकुन अशी प्रेमप्रकरणं झालीच तर प्रचंड भांडण उत्पन्न होतील... पृथ्वी-मंगळ सोयरीक म्हणजे तमाम हिंदी-मराठी चित्रपटांचा आवडीचा आणि त्यांनी चावुन चावुन चोथा झालेला विषय "अमीरी-गरीबी" Biggrin

लिंबू, तुझी पोस्ट्स विषयाला धरुनच आहेत, कल्पना विलास चांगला आहे.
फक्त ते मध्ये मध्ये ".... बुप्रा..." वाले शेरे सोडून दे Happy

उदय, धागा चालू करताना लिहीलेले मुद्दे पाहिले तर लिंबू ची पोस्ट्स अतिरंजित आहेत, पण विषयाला धरुनच आहेत. त्याला तेच जमते (नाहीतर वरती लिहीलेले एकदम असंबद्ध Wink ). तुम्ही लिहा की दुसरे मुद्दे.

माझाही टीपी Proud लिंबू, गंमत करतेय... रागावू नका Happy
----------------------------------------------------------------------------------

तर मी काय म्हणत होतो? की उद्या जयपुरसिटीसारखी लाल सिटी जर मंगळावर उभारायची ठरले तर तिचा तिथला रंग कोणता असावयास हवा? फिक्कट हिरवा/निळा/जांभळा? की अजुन कोणता? >>>> लाल ग्रहावर पिवळं काँबिनेशन मस्त दिसेल. सगळं शहर पिवळं हवं. इकडून ज्या रंगाचा ग्रह दिसतो त्याच रंगाची माती तिथे असते असं आपण जबरदस्तीने गृहित धरु, एवढा वेळ नाही प्रत्येक बारीक संशोधन करायला. तो रंग वातावरणामुळे आहे की अजून कशाने ते काय करायचंय? त्यामुळे गुरु ग्रहावरुन माती आणून विटा बनवाव्यात.

मंगळावरील मातीच्या वीटा काय रंगाच्या असतील? >>>> इकडून लाल दिसतो म्हणजे लालच.

उद्या जर मंगळावर सोन्याच्या गुणधर्माचाच पण पूर्ण वेगळ्या रंगाचा चमकता धातू मिळाला तर त्याचे नाव काय ठेवता येईल? >>> मन्या

मंगळावर एचटूओ या कॉम्बिनेशन ऐवजी वेगळ्याच कॉम्बिनेशनने बनलेले पाणीसदृश द्रव मिळू शकेल का? अन समजा असे द्रव अल्कोहोलच्या जवळपासचे गुणधर्म दाखवित असेल तर काय होईल? >>>> न मिळायला काय झालं? इकडचं प्रवाही अल्कोहोल तिकडे दगडासारखं असू शकतं Wink इकडे रासायनिक क्रियांसाठी ठराविक तापमान, दाब वगैरे असावं लागतं, तिकडे वेगळंच काहीतरी असेल.

जेव्हा वेगवेगळ्या ग्रहांवर वस्ती होईल, तेव्हाच्या आयपीएल मधे संघ ग्रहांच्या नावे ओळखले जातिल का? >>>> नाही जमणार असलं काही. पृथ्वीवरचा माणूस तुमच्यासारखा दिसतो. मंगळावर इकडचा माणूस मायग्रेट होऊन उत्क्रांत होईल आणि काहीतरी वेगळाच दिसू लागेल. अजून इतर ग्रहांवर अजून काहीतरी वेगळा. निदान समान प्रकारच्या सजीवांमध्ये तरी आयपीएल मॅचेस व्हायला हव्यात. रुल्सही वेगळे पाहिजेत कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळे असतील आणि चेंडूचे अंदाज चुकतील.

ध्वनीवहन होण्यासाठी वातावरण वा तत्सम माध्यमाची जरुरी अस्ते असे म्हणतात, जर मंगळावर तसे नसेल तर काय होईल? हळूहळू माणूस बोलणे व ऐकणे हे अवयव गमावू शकेल काय? >>>> उत्क्रांती होईल आणि कान, स्वरयंत्र गायब. नुसते हातवारे करा. शेपुट फुटलं तर हातवारेशेपुट करा.

मंगळावर जीवसृष्टी वर वर तरी दिसली नाहीये असे म्हणतात, पण भूमिगत जीवसृष्टी असू शकेल काय? किंवा जुन्या स्टारट्रेकमधे दाखविल्याप्रमाणे खडक वगैरे भूभागच सजिव असू शकेल काय? >>> खडकावर पाय दिल्यावर चावला तर समजा सजीव आहे.

मंगळावर वस्तीकेल्यावर सांडपाणी/टाकाऊ द्रव्ये यांचा निचरा करण्याची सोय काय करावी लागेल? की तेव्हाचे पर्यावरणवादी त्यावरुनही भान्डत बसतील? >>>> काही गरज नाही. तोपर्यंत पृथ्वी हे ऑफिशियल डंपिंग ग्राउंड झालेलं असेल.

मंगळावर हिरवा / निळा रंग बघायला मिळणे दुर्मिळ असेल ना? >>> पृथ्वीवरुन इम्पोर्ट करा. इकडे सगळे रंग आहेत. नविन नविन तयार पण होतात.. जसे की... पुरणपोळी कलर, चिंतामणी कलर.

मंगळावरचे होकायंत्र कसे असेल? >>>> आत्ता आहे तसंच न्या की तिकडे. नविन कश्याला घ्यायचं? तिकडे तुळशीबाग नाही. वसवावी लागेल. आधी तुळशी न्या तिथे.

मंगळावरील वास्तुशास्त्राप्रमाणे दिशांचे शुभाशुभ कसे ओळखावे? >>> स्वतःच्या सोयीप्रमाणे

तोवर मंगळसुत्र हा प्रकार म्युझियममधेच बघायला मिळेल कदाचित, पण समजा अस्तित्वात असलाच, तर विवाहित स्त्रिया (तेव्हा विवाह होत असल्यास) नवर्‍याच्या नावाने जे गळ्यातले गंठन घालतील त्यास मंगळसूत्र म्हणतील की अजुन काही? >>> मंगळसुत्र = मंगल (शुभ्)+सुत्र (धागा). ग्रहाशी संबंध नाही.

ओ लिंबुभौ ...............तुम्हाला काही काम सांगितलेले मी.........विपुत............झाले का ?

(मुद्दामुन हक्काने सांगतोय Wink )

>>>> शेपुट फुटलं तर हातवारेशेपुट करा. <<<<<< Lol Lol Lol
शेपुट फुटण्याकरता मंगळावर जायची गरज पडणार नाही, इकडेच दिल्लीत सफदरजंग रोडवर (म्हण्जे कुठे कळतय ना? Wink ) गेले तरी आपोआप शेपुट फुटतयं कित्येकजणान्ना! फक्त आपल्यासारख्या सामान्य जनान्ना ते शेपुट डोळ्याला दिसत नाही इतकेच, पण ते शेपुट फुटलेले अस्तेच अस्ते, त्याशिवाय तिकडे म्हणे प्रवेशच मिळत नाही! Proud