संहिता- पुणे प्रिमीअर वृतांत

Submitted by काशी on 18 October, 2013 - 06:21

सोमणिझम झाल्याने मंजिरी सोमण सारखा ठीपकेदार ( पॉईंट वाईज ) वृतांत लिहावा की काय.. असा विचार करते आहे.. पण तोहि जमेल का नाही ते माहित नाही. असो.. जे आणि जस जमेल तस लीहाव झालं..(मेलं ते नेटही आज दळण दळतं आहे) तर मंड्ळी ..

१६ तार्खेला मुंबई प्रिमीअरची घोषणा झाली.. मग पुण्यात आहे का नाही ह्याची चाचपणी केली.. तर १७ तारखेला आहे आणि मिसो असणार आहे ह्याची खात्रीदायक बातमी मिळाली.. चला.. मग संयोजकांना साकडे घातले..

तर रोजची धावपळ आटोपत.. ६.१५ ला सिटी प्राईड कोथरूड्ला पोचले.. (गडबडीत ते लाडवाचच काय पण कॅमेराही विसरुन) सर्व प्रमुख कलाकार आधिच पोहोचलेले होते.. दामले मास्तर आणि साजिरा ह्या संयोजकांची धवपळ चालु होती.. 'ही मायबोलीकरांची तिकीटे.. सगळ्यांना वाट' असे फर्मान निघाले.. मग मी ईकडे ति़कडे ( खरतर मिसोकडे) कुठे मायबोलीकर दिसतायेत का ते बघत उभी राहीले.. शेवटी अनीशाने मला मायबोलीकरांची गाठ घालुन दिली..मग तु कोण मी कोण हा खेळ सुरू होणार तर.. 'हे मायबोली गटग नाही.. हा आपला कार्यक्र्म आहे.. जरा फोटो बिटो काढा.. पाहुण्यांशी बोला' अशी एक प्रेमळ सुचना आली Happy म्हणुन मी खरतर फोटो काढायचा आहे अस म्हणायला लागले Proud Proud Proud मध्यंतरात मायबोलीवर प्रसिध्द असलेला सांडासांडीचा खेळही खेळुन झाला..

सर्व कलाकार अतिशय आगत्याने बोलत होते.. फोटो काढुन घेत होते.. छान वाटले.. सर्व कलकारंना जमिनीवर बघुन तर फारच बरं वाटले.. चित्रपट सुरु होतांना मायबोलीचा लोगो झळकतो.. मस्त फील येतो तेव्हा.. चिन्मयचे कौतुक करावे तितके थोडे आहे..
बाकी चित्रपटा विषयीतर काय बोलावे.. केवळ 'अप्रतिम' सुरेख, सुरेल मैफील... 'God is a bad scriptwriter .' हे वाक्य भन्नाट आहे.. अजुनाही ह्या विचारातुन बाहेर पडता येत नाहीये.. सुंदर चित्रीकरण.. अप्रतिम संवाद, तोडीस तोड अभिनय.. एक एक पदर कसा सुंदररीत्या उलगडत जातो.. आरतीताईंची गाणी केवळ अप्रतिम आहेत.. त्यांचा आवाज मस्त आत खोल झिरपत जातो..आहा..
जास्त लीहीत नाही..पण ज्याची त्यानी अनुभवावी अशी ही संहीता आहे.

हर्पेन,केदार्,चैतन्य, आनंदयात्री,अरुंधती,सई,पद्मजा,मीन्वा,पूनम्,अनीशा अतुल,शशांक (?) कोण राहील?? ह्या सगळ्यां माबोकरांबरोबर मजा आली..
अतिशय सुरेख अनुभवा साठी मायबोली प्रशासनाचे आभार आणि अश्याच दर्जेदार कलाकृतींसाठी शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काशी, मस्तच वृत्तांत

आणि फोटो पाहिले - ऐकत नाहीय्येस अगदी!! मिलियन डॉलर स्माईल हां!! एकदमच सही Happy Happy

आणि एवढं करून लाडू विसरलीसच? श्या!! Wink

डिस्क्लेमर - गरज पडल्यास सर्व संबंधितांनी दिवे घ्या, भरपूर घ्या Happy

उपस्थितांच्या नामोल्लेखामधे माझे नाव सर्व प्रथम लिहिल्यामुळे "(घ्या मेल्यांनो असे मनातल्या मनात साजिरा आणि चिनुक्सला म्हणून लिहिल्यासारखा) कसला गुंडाळलाय वृतांत हे असे काही मी तरी म्हणणार नाही. Wink

छाने Happy