सध्या रोज बातमी पत्रे देणा-या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून सोन्याच्या खजिन्याची बातमी सतत दिली जात आहे. लहानपणी वाचलेल्या खजिन्यांच्या गोष्टींची आठवण काढून आपण चकित व्हावे अशीच परिस्थिती.
थोडक्यात कळालेली माहिती अशी -
उत्तर प्रदेशातील उन्नाव या किल्ल्यात राव राम बक्श सिंह पुर्वी (१७ वे शतक ) राज्य करत होते.
कानपुर गावातील एक साधु शोभन सरकार यांचा असा दावा आहे की त्यांना स्वप्नात उन्नाव चे दिवंगत राजे राव बख्श सिंह दिसले. आणि किल्ल्याखाली १००० टन सोने ( सध्याच्या बाजारभावाने किंमत ३ लाख कोटी रु) आहे असे सांगितले. ( काही वाहिन्यांवर असे ही सांगत होते की स्वतः राव राम राजा घोड्यावरून फिरतो व स्वामींना भेटून खोद्काम करून खजिना ताब्यात घ्या व आपल्याला मुक्त करा असेही सांगतो )
स्वामींनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. मंत्री चरण महंत दास व राज्यसभा सदस्य ब्रजेश पाठक शोभन सरकार यांचे शिष्य स्वामी ओम यांना भेटले.काही चाचण्या केल्यानंतर भूगर्भात काही धातुसदृश्य असल्याचा पुरावा भूगर्भ वैज्ञानिक व पुरातत्व खात्याला मिळाला आहे .
(हे धातुसदृश्य सोनेच असेल असे नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.) 
पुरातत्व विभागाने व सरकारने आता खोदण्याची सर्व तयारी केली आहे.
१८ ऑक्टोबर पासून खोदकाम चालू होईल.
या भावी १००० टन सोन्याच्या मालकी हक्कासाठी आत्तापासूनच वाद चालू झालेत.
राजाचे वंशज तिथे पोचले आहेत. काही गावांनी मालकी हक्कचे ठराव केले आहेत. अंतिमतः हा खजिना भारत सरकारचा असेल हे काल कोणतेतरी मंत्री एका वाहिनीवर सांगत होते.(नाव लक्षात नाही).
काहीजण दिल्लीतल्या नोक-या सोडून गावी परत आले आहेत. कारण आता गावाचा कायापालट होणार आहे.
शोभन सरकार यांनी असंही सांगितलं आहे की त्या जागी जर सोन्याचा खजिना मिळाला नाही तर
सरकार त्यांच्यावर देशद्रोहा चा खटला चालवू शकते.
हे सोने मिळाले की डॉलर व पौंडस ला रुपया खाली ढकलेल असं ही आज त्या साधूंचे शिष्य सांगत होते.
व भारत अमेरिका व ब्रिटन यांना मागे टाकेल.
एकूणच भारताची सर्व ददात मिटेल असं दिसतंय.:स्मित: मालामाल पर्मंनंटली 
प्रश्न असा आहे की एका स्वप्नाच्या आधारे सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे व खोदकाम चालू करणार आहेत.एरवी ' सरकारी काम आणि ६ महिने थांब 'अशी प्रवृत्ती असलेली यंत्रणा या मोहिमेला लगेच सिद्ध होते तेही एका स्वप्नावर विश्वास ठेवून. हे अचंबित करणारे आहे.
एकीकडे चंद्रावरच्या , मंगळाव्ररच्या मोहिमा केल्या जातात,आखल्या जातात.
तांत्रिकदृष्ट्या किती प्रगती होते आहे आणि दुसरीकडे एका स्वप्नाच्या आधारे अशी 'सोन्याच्या खजिन्याची शोध मोहीम' ही सरकारी खर्चाने हाती घेतली जाते.:अओ:
असा हा विरोधाभास. तुम्हाला काय वाटतं ?
काही लिंक्स -
http://hindi.pardaphash.com/news/--745180/745180.html
http://aajtak.intoday.in/story/spokesperson-of-baba-shobhan-sarkar-om-ba...
(तपशीलात काही त्रुटी असतील तर चुकभूल देणेघेणे).
एक भाबडा प्रश्नः जर १०००/
एक भाबडा प्रश्नः जर १०००/ २५०० टन सोने सापडलेच तर सोन्याची किंमत घसरेल ना?
एक भाबडा प्रश्नः जर १०००/
एक भाबडा प्रश्नः जर १०००/ २५०० टन सोने सापडलेच तर सोन्याची किंमत घसरेल ना?
>> नॉट नेसेसरी/ अर्थात थोडीफार घसरेल पण जगात एकुण १७१००० टन सोने आहे त्यापैकी जवळ जवळ १००००० टन माइन केले आहे यामुळे हे एक टक्का सोनेच वाढेल आणि हे सर्व लगेच मार्केट्मध्ये येणार नाही.
----------------------------------------------------------------------------
मला लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली. एक गाव असते तिथे सर्व गरीब असतात. तिथे एक साधु महाराज येतात आणि सांगतात इथे खुप सोने आहे. मग गावातले सावकार तिथे खणायला घेतात.
असे खुप दिवस जातात. आजु बाजुला करुन बरीच लांब रुंद जागा खणुन होते. यामुळे गावातल्या गरिब लोकांना रोजगार मिळतो.
पुढे खणता खणता त्या जागेला पाणी लागते आणि मग पावसात तो तलाव भरुन जातो. शेवटी साधु महाराज सर्वांना सांगतात तुमचे कष्ट हाच खरा खजिना.
कोणाला ही गोष्ट आठवते?
मला आता दुपारी स्वप्न पडले (
मला आता दुपारी स्वप्न पडले ( दिवास्वप्ने खरी होतात) सीएसटी इमारतीखाली सोने दडवले आहे .माननीय मुख्यमंत्री याबद्दल विचारविमर्श करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत .यापूर्वीच बातमी पसरली आणि बऱ्याचजणांनी हक्क सांगितले आहेत .
ऐकल्या ना बातम्या
ऐकल्या ना बातम्या ?
जीएसआयच्या सर्वे मध्ये इथे मेटल आहे असा अहवाल आलेला आहे. तो अहवाल त्यानी एएसआयला पाठवला. त्यांच्या रिपोर्टच्या आधारे उत्खनन सुरू झालं आहे. उत्खननात सोनंच मिळेल अशी काही अपेक्षा नाही. एएसआय म्हणजे जमिनीतून धातू काढणारी संस्था नाही हे जाणतोच आपण सगळे. आजपर्यंतचं त्यांनी सोनं काढण्यासाठी काम केलेलं नाही. उत्खननात जे काही मिळेल त्याचा दस्तावेज तयार होईल. पुरातन संस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने हे उत्खनन महत्वाचं असतं. अमूक एक किंमतीचं सोनं काढून देशाची अर्थव्यवस्था सुधारणे छापाच्या बातम्या या माध्यमांच्या उथळपणाचा आणखी एक नमुना आहे. स्वप्न, अफवा ही वरतून फोडणी दिलेली दिसते. एखाद्या ठिकाणी खजिना असल्याची दंतकथा असते. काही वेळा ती खरी असते, काही वेळा चुकीची.
त्यावरून जे काही चाललंय ते सगळं उद्वेगजनक आणि हास्यास्पद आहे. मोदींपासून काँग्रेसपर्यंत सर्वांनी आपापले तारे तोडले. ते बिचारे पुरातत्त्व खात्याचे लोक नियमाने तोंड बांधले असल्याने मेडीयाशी बोलू शकत नाहीत. शक्य झाल्यास ही अशी खोडसाळ वार्तांकने करून देशभरात गोंधळ माजवणा-यांवर कारवाई व्हावी. अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा सामान्यांसाठी असेल तर या मंडळींना सूट का ?
या प्रकरणाला राजकारणाचा रंग चढत चाललाय. कुणाच्या स्वप्नावरून उत्खनन करणे हास्यास्पद आहे म्हणणा-या भाजपाने काही वर्षांपुर्वी त्या वादग्रस्त जागेवर मंदीर आहे असा आमचा विश्वास आहे म्हणून तिथे एएसआय कडून उत्खनन व्हावं अशी भूमिका घेतली होती त्याची त्यांना आठवण करून द्यावी.
बाबरी रामजन्मी प्रकरणाशी
बाबरी रामजन्मी प्रकरणाशी ह्याची तुलना करणे अत्यंत उथळ आहे. कसे ते बघू.
१. राम हा अयोध्येत जन्मला हे काही भाजपाने प्रथम म्हटलेले नाही. अनेक प्राचीन लोककथा, श्लोक, आख्यायिका, काव्ये असे म्हणतात. रामायण हे भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे ह्यावर दुमत नसावे.
२. राम जर अयोध्येत जन्मला अशी बहुतांश भारतीयांची श्रद्धा असेल तर तिथे त्याचे मंदीर होते असे वाटणे इतके अतर्क्य आहे का?
३. मुस्लिम आक्रमणांचा इतिहास हा सर्वमान्य आहे. त्यातही शंकेला जागा नाही. आज कितीतरी भग्न, बाटवली गेलेली हिंदू धर्मस्थळे अस्तित्त्वात आहेत. तसेच अयोध्येतील राम मंदीराबाबत घडले असेल असे कुणाला वाटले तर ते इतके अशक्यप्राय आहे का?
४. दोन धर्माचा वाद आहे म्हणून पुरातत्त्वखात्याने तिथे संशोधन करुन खरेखोटे करावे हे मागणे (जे त्यांचे कामच आहे) हे कुण्या एका महाभागाच्या स्वप्नाचा आधार घेऊन पुरलेल्या सोन्याचा शोध घेण्याची मागणी करण्याइतके अप्रस्तुत आहे का? मला तसे आजिबात वाटत नाही.
उगाचच ह्या आचरटपणाला रामजन्मभूमीच्या वादाच्या बरोबरीचे लेखण्याचा प्रयत्न हास्यास्पद नि क्षीण वाटतो.
अहो शेंडेनक्षत्र,
अहो शेंडेनक्षत्र, तुमच्यासारख्या जातीयवादी, धर्मांध आणि दंभिक माणसाला समजावणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. कालच्या भाजपाच्या प्रतिक्रिया या इतक्या उथळ आणि अबानश्यक होत्या कि त्यांना विश्वासाच्या आधारावर उत्खनन करणे गैर वाटले नव्हते हे सांगावेसे वाटले यात तुम्ही आकांडतांडव करण्यासारखे काही नाही. आचरटपणा आणि उथळपणा तर तुमच्या पोस्टीतून दिसून येतोय. आपल्याला हवे ते बुद्धीवादी आणि इतरांचे ते आचरट, उथळ अशा मानसिकतेतून बाहेर या आधी. खोलात जाण्याची गरज नाही.
अयोध्येत ११७ आखाडे आहेत आणि त्यातल्या प्रत्येक आखाड्याचे म्हणणे आहे कि रामाचा जन्म इथेच झाला होता. मग बाबरी मशिदीच्या इथेच रामाचा जन्म झाला होता हे कशाच्या आधारे म्हटलं जातं ? त्या ११७ आखाड्यात उत्खनन का नको ? जरा तरी विचार करायचा ना. बरं, तुमच्या समाधानासाठी जर उत्खनन केल्याने देशाची फसवणूक होणार नसेल तर काही कागदपत्रांच्या आधारे कुणी केलेला दावा तपासून पाहण्यास उत्खनन करण्यात गैर काय ? जिऑलॉजिकल सर्वेच्या रिपोर्टच्या आधारे चाललेलं उत्खनन जसं तुमच्या आवडत्या पक्षाला हास्यास्पद वाटतंय तसंच तुमचं चाललय. तुम्ही ठरवू नका कुठली तुलना हास्यास्पद आहे ते. तुमची ब्बुद्धी कशी आणि कुठवर चालणार हे सांगायला नको. तुमच्या आकलनाच्या पलिकडची तर्कदुष्टता आहे म्हणून उथळ, पांचट अशी विशेषणं लावत बसलात होय ? त्यातून तुमचा दुटप्पीपणा आणि भंपकपणा ठळक होतोय, आणखी काही नाही.. आपण कधी काळी केलेली विधाने आपल्या आजच्या विधानाशी विसंगत आहेत याचीही शुद्ध न राहीलेल्यांना तसं विचारल्याने त्यांना उतर तरी काय देता येणार आहे ? त्यातून मग ही तुलना उथळ आहे वगैरे वगैरे सुरू होतं.
यात कुठेच रामजन्मभूमीवर टीका करण्याचा उद्देश नसताना तुम्ही त्याला तसा रंग देताय. शिकवणुकीला जागताय. तुमच्याकडून अपेक्षा ठेवण्यातही अर्थ नाही आणि या आणि अशा बथ्थड आणि स्टिरीओटाईप बडबडीला उत्तर देण्यातही.
सापडले का सोने ?
सापडले का सोने ?
सापडणार नाही. शुक्रवारी सकाळी
सापडणार नाही. शुक्रवारी सकाळी अकरा वाजत खोदकाम सुरु केले. रेवती नक्षत्रावर गुप्तधनाचा शोध सुरु करायची आयडिया कुणाची ?
तेही व्याघात योगावर? धन्य ते सरकारी अधिकारी. निदान कृष्णमूर्ती पद्धतीने तरी चांगले दिसेल म्हणून उन्नाव गावची कुंडली मांडली आणी हाय रे कर्मा ! रुलींगमध्येच शनी. अवघड आहे.
मला तो डायलॉग आठवला. 'सोना
मला तो डायलॉग आठवला.
'सोना किधर है?'
'इतनी सारी जगह है, किधर भी सो जाव. '
कालच्या एनडीटिव्ही वरच्या
कालच्या एनडीटिव्ही वरच्या चर्चेतुन एक निष्पन्न केलेले की त्या ठिकानी एएसआय ने त्याभागात आधीच सर्वेक्षण करुन ठेवलेले आणि त्यांना जमिनीमधे धातुसदृश्य काहीतरी आहे याचा पुरावा सापडलेला. त्या आधारेच हे काम सुरु होणार होते. मधेच हे स्वप्नाचे कारण मधे आले.. आता पुरावा सापडला ही बातमी त्याभागात पसरणारच.. त्याचाच फायदा उठवुन शोभन सरकार इत्यादी मंडळींनी स्वप्न पडले .. राजा आला स्वप्नात सोने सांगितले तस्सम अफवा वगैरे उठल्या...
आता एएसआय कडे पुरावा आधीपासुनच होता आणि काम देखील सुरु होणार होते.. आता त्यात राजकिय हस्तक्षेप आला.. यावरुन मंत्रींनी विचारणा केली.. पुरावे सापडले आहेत आम्हाला आणि खोदकाम होणार आहे हे स्पष्ट झाले..
मिडीया तर उलटेसुलटे बोंब मारण्यास प्रसिध्द आहे.. त्यांनी हे दाखवले नव्हते की एएसआय ने आधीच सर्वेक्षण केले आहे आणि पुरावा सापडलेला .... त्यांनी उलट हे प्रसिध्द केले की " एका साधुला स्वप्न पडले आणि ते पुर्ण करण्यासाठी खोदकाम सुरु केले." अत्यंत बालिश आणि मुर्खपणा मिडीयाने सुरु केला.. जे काम शांततेत पार पाडणार होते ते मिडीयाने उगाच स्वतःच्या टीआरपी वाढण्यासाठी काहीतरी सनसनाटी उठवण्याकरीता याचा देशभर बोंबाटा केला..
परिणामी मुळ कारण वगैरे बाजुला राहुन "साधु, स्वप्न, खजिना" यावरच देशाची दृष्टी लागली..
जर का क्रम उलटा लावला ...साधुला स्वप्न पडले मग शोध सुरु केला.. ते ही योग्य म्हणावे लागेल.. कारण त्या भागात आधीपासुनच या विषयी दंतकथा प्रसिध्द आहेत.. "एएसआय" पुरातन खाते अश्या दंतकथेच्या माहितीच्या आधारावरच काम करत असते.. "गुजरात मधले द्वारका" ही सुध्दा दंतकथाच आहे.. त्यावरुनच शोध घेतला आहे .... प्राथमिक पुरावे सापडले आहे......जर का फक्त दंतकथा वगैरे थाप अफवा असे मानले गेले असते तर आता पर्यंत काहीच शोधले गेले नसते...
रामसेतु हे सुध्दा दंतकथाच आहे.. मग सगळ्या दंतकथेला सारखा न्याय लावा...... स्वतःच्या सोईनुसार लाभ कशात होईल सध्या हेच बघणे चालु आहे.........
जेव्हा पुरावे स्पष्ट स्वरुपात मिळाले आहेत तेव्हा यावरुन बोंबाबोंब करत बसण्यापेक्षा त्यांना त्यांचे काम शांतपणे करु द्यावे
ठं हे तपासणा-यांच्या पोष्टी,
ठं हे तपासणा-यांच्या पोष्टी, मग त्यांच्या मल्लिनाथ्या !
>>>
मला पहिले हे सांगा ,मल्लीनाथी चे अनेक वचन मल्लीनाथ्या होते काय? असल्यास कशावरून? नसल्यास का नाही? ईकारान्त र्स्त्रीलि.न्गी सर्वनामाचे अनेक वचन करण्याचे नियम काय आहेत?
मुख्य म्हनजे शोभनबाबू सोरकार हेंचा मल्लीनाथेबद्दल काय म्हणणे आहे..
होरा भूषण लिम्बाराम सोने प्रकरणी गप्प का आहेत.? स्वप्नचिकित्सा हा त्यांच्या ग्रंथातील उतारे ते अजून का देत नाहीत?
@ रॉहू जरा समजावून सांगता का
@ रॉहू
जरा समजावून सांगता का प्लीज ? ( बुद्धी कमी असल्याने विद्वानांचे म्हणणे चटकन लक्षात येत नाही).
सोने किलोवर आणि कांदा
सोने किलोवर आणि कांदा तोळ्यावर मिळणार
sone sapadale ka? whats the
sone sapadale ka? whats the latest on this?
भारतात सर्वत्र सोने सापडणार
भारतात सर्वत्र सोने सापडणार आहे. शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, रास्तेवाडा, सदाशिव पेठेतले सर्वच जुने वाडे, मुळा मुठा नदीच्या पात्रात शंभर मीटर खोल खणल्यास कुठेतरी, पर्वती टेकडीच्या पोटात, पाचगाव टेकड्यांमधे, दिए घाटातील मस्तानी तलावाखाली, सर्व प्रमुख देवळांखाली सोने पुरून ठेवल्याची स्वप्ने अनेकांना पडत आहेत. डेंग्यु, मलेरिया याची साथ यावी तसं झाले आहे. खणणारे मजूर महाग होत आहेत. पूर्वी इथे सोनंच सोनं होतं. चूल पेटवायला सोनंच जाळत असत. त्यामुळं सोन्याचा धूर निघत असे हे खरं असल्याची सर्वांची खात्री पटत चालली आहे.
>>पीपली लाईव २<< अगदी
>>पीपली लाईव २<<
अगदी अगदी.
खोदा पहाड निकला चुहा होण्याची चिन्ह नाकारता येत नाही....
जर तसे नसेल तर अमेरीकेतली बाड बिस्तरा गुंडाळून निघायची तयारी ठेवा.
Pages