किल्ले दुर्गाडी - कल्याण

Submitted by अमोल सूर्यवंशी on 17 October, 2013 - 01:56

किल्ले दुर्गाडी - कल्याण:

किल्याचा प्रवेशद्वारः
entrygate_1.JPG

किल्याचा प्रवेशद्वारः
entrygate.JPG

किल्याकडे जाण्याचा रस्ता:
waytofort.JPG

किल्यात वरती गेल्या वर देवीचे छान मंदिर आहे. त्याच मंदिराचा हा कळसः
Kalas.JPG

मंदिराच्या एका भींति वरती एक छान शिवमुद्रा कोरली आहे.
shivmudra.JPG

या किल्ल्यावरती पहिले मुसलमानांचे राज्य होते. त्यावेळची ही मझ्झिद आहे पण आता फक्त एकच भिंतिचा भाग उरला आहे.
mazzid.JPG

मझ्झीदीची भिंत
mazzid_1.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा अमोल, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. प्रचि तर छान आहेतच पण नुसत्या धाग्याच्या नावानेच जुन्या आठवणी जाग्या झाल्या... मी आणि माझी मैत्रीण १०वीच्या परिक्षेनंतरच्या सुट्टीत मॉर्निंग वॉकला जायचो दुर्गाडीला. माझ माहेर कल्याणच. लग्नानंतर पुण्यात आले आणि आता आईबाबा पण इथेच आले आहेत त्यामुळे गेल्या २ वर्षात कल्याणशी आणि पर्यायाने दुर्गाडीशी संबंधच नाही आला...... तुमचे फोटो बघुन अपडेट झाल्यासारख वाटल आणि इतक्या वर्षात किल्ल्याला दिलेला रंग हा भाग सोडल्यास बाकी गोष्टी जश्याच्या तशा आहेत हे बघुन बर वाटल.

प्रितीभुषण, कल्याण स्टेशनवरुन रिंगरोड/ रिंगरुट(स्टेशन टु स्टेशन) बस आहे K.D.M.C.ची त्या बसने जाता येईल, दुर्गाडी नावाचा बस थांबा आहे. हा बसथांबा एका चौकात आहे तिथे उतरुन रस्ता ओलांडुन पायी साधारण ५-१० मिनीटात तुम्ही दुर्गाडीला पोचु शकाल किंवा शेअर रिक्षा करुनही जाता येईल पण मला वाटत शेअर रिक्षा फक्त लाल चौकीपर्यंतच आहेत. सध्या पुढेपण जात असतील तर माहित नाही.
बाकी सध्याच्या कल्याणकरांनी ताजी माहिती शेअर करावी.....

<< कल्याण स्टेशन पासुन दुर्गाडीला कसे जायचे ? >>
कल्याण स्टेशन बाहेर भिवन्डि कडे जाणार्‍या शेअर रिक्शा आहेत.

हो अमोल, तिथे जत्राच भरलेली असते मी लहान असताना एकदा गेले होते या जत्रेला. Happy दिवाळीच्या पहिल्या दिवशी (अभ्यंगस्नानाच्या) पहाटे बरेच जण इथे देवीच्या दर्शनाला येतात पण यामागच कारण माहित नाही... तुम्हाला माहित असेल तर सांगा प्लीज.

अमोल ही मशीद नसून इदगाह वाटतोय. इदला सर्व समुदायाला एकत्र प्रार्थना करण्यासाठी मशिद छोटी पडते त्यामुळे बहुतेकवेळा गावाबाहेर मोकळ्या पटांगणावर इदगाह भिंत असते.

अमोल, फोटो मस्तच! मी पण कल्याणची आहे. लग्न करून पुण्यात आले. त्यामुळे माहेरचे फोटो पाहून खूप आनंद झाला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी, त्रिपुरी पौर्णिमेची आरास बघायला तर दरवर्षी जायचोच. खाडीवर पोहायला जायचो. तेव्हा कल्याणला फिरायला जाण्यासारख ठिकाण दुर्गाडी आणि खाडी हेच. माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात कल्याणला झाली (माहितगारांनी चूक असल्यास ती दुरुस्त करावी, ही विनंती!)

असेच खाडीचेही फोटो काढून आजी-माजी कल्याणकरांचे डोळे तृप्त करण्याचे मनावर घ्याल का?

पारनाका. सिद्धेश्वर आळी. शाळा ओक हायस्कूल. विशेष आवडत्या जागा: खिडकी वडा, सुभेदार वाडा गणपती, खाडी आणि खूप प्रेमाची माणस!

नेहमीप्रमाणेच एखाद्या प्रसिद्ध मंदीराजवळ मशिद पाहून काहीच आश्चर्य वाटले नाही.

बाकी फोटो मस्तच.

अनयाआआआआआआ सिद्धेश्वर आळीइइइइइइइ कुठे???????? (आनंदातिरेकाने नाचणारी बाहुली)
मी सिद्धेश्वर सोसायटीत 'बी' विंग मध्ये रहात होते.... तु कधी १० पास झालीस माझी खासम खास मैत्रीणपण ओक हायस्कुलमध्ये होती. मी सुभेदार वाड्यात होते.

पियु, माझी आतेबहीण असते अंनाथला. तु इस्ट की वेस्ट??? ही स्मायली कुठुन मिळवलीस एकदम भारी आहे.

मस्त! लहानपणीच्या आठवणी जागवल्या. माझं माहेर डोंबिवली, त्यामुळे कल्याणला, दुर्गाडी किल्ल्यावर अनेकदा जाणं व्हायचं. किल्ल्याचे अजून फोटोज असतील तर टाका ना.

मी कल्याणची मुलगी. लहानपणापासून दुर्गाडी ओळखीचा. त्रिपुरी पौर्णिमेला सुंदर आरास असायची. खाडीवर पोहायला जायचो ते दुर्गाडीच्या पायांशी.
खरंच फोटो टाका. आवडतील‌ बघायला.

<<शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात कल्याणला झाली>>
बरोबर आहे. दुर्गाडीलाच मराठा आरमाराची स्थापना झाली होती. त्याची आठवण म्हणून भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या टी-८० गस्ती नौकेला लवकरच संग्रहालयाच्या रुपात इथं जतन करून ठेवलं जाणार आहे.