''वल्कले''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 October, 2013 - 22:56

भेटलो इथे न भेटणार ह्यापुढे
आठवण तुझी समेटणार ह्यापुढे

ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार ह्यापुढे

टाळतोय गुदगुल्या तुला न स्पर्शिता
स्वप्नरंजनात खेटणार ह्यापुढे

घाम फार पाहिला उन्हामधे चिते
पावसामधेच पेटणार ह्यापुढे

ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार ह्यापुढे

--डॉ .कैलास गायकवाड

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार या पुढे

व्वा.

वेगळ्या खयालांबद्दल बेफिंशी सहमत.

धन्यवाद सर्वांचे...

जुने जग आणि नवी वल्कले यातला भाव पोचेल की नाही या बाबत साशंक होतो. पण बेफिकीर आणि विदिपा...आपणा दोघांचे प्रतिसाद सेज इट ऑल.

मनःपूर्वक आभार.

आवडली

ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार ह्यापुढे ==> सुंदर….टायटल शेर खूपच झकास.

ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार ह्यापुढे ==> क्या बात है…

गझल मस्तच आहे.
शुभेच्छा.