(नको माप घेऊस माझ्या मनाचे)

Submitted by निनाद on 9 October, 2013 - 23:06

भावनाविवश झाल्यावर आता अ‍ॅटिडोट!
माप काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते हो!
जय ची क्षमा मागून! Happy
---------------------------------------
तसा मी कधी फार झोपलोच नाही
पुरेसा तसा आज उठलोच नाही

नको माप घेऊस माझ्या तनाचे
तसा मी तुला पूर्ण दिसलोच नाही

पुन्हा खाच सारे जरा तू फिरूनी
नको बोलू ..मी काल चरलोच नाही

तसा मी इथे सोम गाळीत नाही
तसा मी या गुत्त्यात बसलोच नाही

तसे नागमोडीच रस्ते जगाचे
पेला सोडुनी मात्र पडलोच नाही
-----------------------------------------

एकहाती केली आहे वृत्तबित्त पाहिलेले नाही...
सुचवण्याचे स्वागत असेल डोळा मारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा खाच सारे जरा तू फिरूनी
नको बोलू ..मी काल चरलोच नाही

तू परत परत खा हेच परतूनी
मला नको म्हणू मी कालही हे चरलो नाही.

Happy

खाच ची फोड करायला हवी होती बहुदा.
टाकायची घाई... Wink

दाद यांचे म्हणणे ऐकले पाहिजे
विडंबनही पिकायला ठेवले पाहिजे

Happy

ओय, मी कुठे काय म्हटलं?
विडंबन जमलय... जमलय.
ते खाच.. मलाही टाच बसलीच. मग ते चरण्याचं वाचल्यावर कळ्ळं.