जीवन

Submitted by Prashant Pore on 5 October, 2013 - 05:48

फुकटे येथे राव किती?
चोर किती अन साव किती?

मी बुडताना मज हसले
काठावरती गाव किती?

लिहिताना पत्र सखीला
चुरगळले मी ताव किती?

नयनांचे पाणी सांगे
हृदयावरती घाव किती?

वेडे ते पुसती मजला
तव प्रेमाचा भाव किती?

प्रेताच्या टाळूवरचे
लोणी खाती राव किती?

ओझे भरता पापांचे
बुडते अलगद नाव किती?

दो हातांवर लक्ष्य तरी
बाकी आज पडाव किती?

दुनिया ही क्षणक्षण बदले
जीवन हे भरधाव किती?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दो हातांवर लक्ष्य तरी
बाकी आज पाडाव किती?..............वृत्त भंग झालाय प्रशांत.

लिहिताना पत्र सखीला
चुरगळले मी ताव किती?........... पत्र सखीला वाचताना लय जाते. त्र मधली एक मात्रा आणि स ची एक मात्रा अशा मिळून ''गा'' उच्चारावा लागत आहे. दोन लघुचा एक गुरु करताना शक्यतो एकाच शब्दात हे दोन्ही लघु असतील असे पहावे.

बाकी मतला ज..रा कमी आवडला. बाकीची गझल छानच. Happy

शेर काफियानुसारी असणे वाईट नाही पण त्या परिस्थितीत शेर कृत्रीम वाटणे टाळायची ते जास्तीत्जास्त नैसर्गीक वाटू देण्याची शायराची जबाबदारी वाढते
ही कला यायलाच हवी

धन्यवाद सर्वांचेच..

डॉ. साहेब... टायपो गडबडलाय.. "पडाव" असे आहे.. दुरुस्त करतो आणि बाकी सूचनांचे पालन.. Happy

@ वैभव : अगदी सुरुवातीच्या वेळेसची गझल आहे. पण मी या कारणांमागे लपणार नाही. आपल्याही सूचनांचे पालन करीन.