Submitted by जयदीप. on 4 October, 2013 - 01:23
कोण तो उरला खरा जगतात आता
टाकतो जो तो स्वत:ची कात आता
कोणत्या वचनांवरी मी घर उभारू?
टाळतो जो तो स्वत:ची बात आता
टाकले ना एकटे मी आज त्यांना
राहिलो त्यांच्या न मी गणितात आता...
भोगतो शिक्षा न मी माझ्या मनाची..
राहिलो माझ्या न मी नियमात आता...
शेवटाचे ध्यास ते त्यांच्या मनाला..
हाय! मी मागू कशी सुरुवात आता?
मूळ रचना
==========================
कोण तो उरला खरा जगतात आता
टाकतो जो तो स्वत:ची कात आता
कोणत्या वचनांवरी मी घर उभारू?
टाळतो जो तो स्वत:ची बात आता
ते लढ्यांचे ही फुका फतवे निघाले
झोपले सगळेच ते थडग्यात आता
दोष मी जगण्यातला कोणास देऊ?
रहिला ना बापही स्मरणात आता..
ते पुरावे मागती त्या जीवनाचे
अर्थ ही उरला न ज्या मरणात आता
===================================
ना मिळे युद्धाविना स्वातंत्र्य आता
'मी' च 'मज'ला देतसे ही मात आता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गझल लिहिण्याचा सराव पुरेसा
गझल लिहिण्याचा सराव पुरेसा झाला, असे वाटते.
मला वाटतं आता कविता लिहिण्यासाठीचा रियाज करायला हवा.
आपण काय जगतो, काय लिहितो ह्यावर विचार व्यायला हवा.
आपले लिखाण आपल्या आयुष्याशी सुसंगत आहे की नाही हे तपासले गेले पाहिजे.
शकील म्हणतो, मुझे फक्र है मेरी जिंदगी, मेरी शायरीसे जुदा नही
आवडी आणि सवडीनुसार मोठे कवी, लांब पल्ल्याच्या कविता वाचायला हव्यातच.
आडातच नसेल तर पोह-यात कुठून येणार, असे म्हटले आहेच.
सल्ला उद्दामपणाचा वाटल्यास सोडून द्यावा.
समीर
कवितेकडे आणि मुख्य म्हणजे
कवितेकडे आणि मुख्य म्हणजे जीवनाकडे पाहण्यासाठीचा 'गंभीर दृष्टीकोन'च आपल्याला चांगल्या कवितेपर्यंत नेऊ शकतो हेच सत्य आहे.
समीरशी सहमत आहे. आपण विचार करालच.
काजवे आहेत, जरी या ना
काजवे आहेत, जरी या ना मशाली
बघ अशी उजळू पहाते रात आता...
विजयजी, समीरजी: माझ्यामुळे
विजयजी, समीरजी:
माझ्यामुळे तुमच्या वाचनात जे काही रद्दड शेर/ गझला येतात त्या बद्दल दिलगिर आहे.
माझ्या सरावाची शिक्षा या पुढे तुम्हाला होणार नाही याचा मी प्रयत्न करीन.
त्यातून जर मला नाहीच जमलं, तर मला माफ करा.
तुर्तास माझ्या आयुष्याशी को रिलेट करून लिहिण्याचा ट्राय करतो.
वाचन करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करतो.
छान प्रतिसाद जोशी साहेब
छान प्रतिसाद जोशी साहेब
समीरजी व कणखरजी यांसारख्या तज्ज्ञ व्यक्ती अपणास सांगत आहेत ह्याचा अधिकाधिक लाभ घ्या
शुभेच्छा