बॉन्डस

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बॉन्ड ही एक डेब्ट सिक्युरिटी आहे. जेव्हा तुम्ही शेअर धेता तेव्हा काही अंशी तुम्ही त्या कंपनीचे मालक होता पण जेव्हा बॉन्ड विकत धेता तेव्हा त्या कंपनी चे घेनेकरी ( creditor ) होता.
कंपन्या, सरकार, बैंन्का, Financial Institutions हे सर्व बॉन्ड ईशु करु शकतात. बॉन्ड विकत धेतल्याच्या बदल्यात बॉन्ड धारकाला व्याज मिळते. हे व्याज पुर्वनियोजीत दरानेच मिळते. त्यामुळे Bond Income हे Preditable असते त्यामुळे ज्या गुंतवनुकदाराला fixed income पाहीजे असते त्याने बॉन्ड मधे गुंतवनूक करणे योग्य.

बॉन्ड मधे गुंतवनूक करन्याआधी लक्षात घ्यायचा गोष्टी.
१. व्याजदर floating or fixed वरिल दोन्ही प्रकारच्या व्याजदराचे बॉन्डस मिळतात. Fixed नावा प्रमाने Fix Rate वर असतात. व्याज कधी मिळते त्या हे देखील महत्वाचे आहे. सहामाही, वार्षीक वा on muturity .

२. Muturity बॉन्ड मैचुरीटी ही एका दिवसापासुन ते अनेक वर्षे जसे की ३० किंवा अगदी १०० वर्षे पण असु शकते.
- short term notes/bonds मैचुरीटी ५ वर्षे पर्यंत
- intermediate term notes/bonds मैचुरीटी १२ वर्षे पर्यंत
- Long term note/ bonds मैचुरीटी १२ वर्षे पासुन अनंत काळापर्यंत

३. Redumption Features मैचुरीटी होतानाचे अनेक प्रकार आहेत जसे की
call provisions ही प्रोवीजन मैचुरीटी कालावधी यायच्या आतच गुंतवनुक दाराचे पैसे वापस देन्या साठी आहे. समजा बॉन्डस ८ टक्क्याने ईशु केले असतील व सध्याचा interest rate ६ असेल तर bond issue करनारी कंपनी बॉन्ड रिडीम करु शकते.
Put Provistion ह्या option मधे investor आपला बॉन्ड कधीही ( जेव्हा त्याला पैशांची गरज लागेल तेव्हा) बॉण्ड वापस करु शकतो.
Credit Rating भारतात पण बॉन्ड इशु साठी credit rating असते.
यिल्ड यिल्ड म्हनजे बॉन्ड मधे पैसे गुंतविल्यानंतर मिळनार परतावा.
tax savings - याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही पण काही भारतीय बैन्का Tax saving bond पण इशु करतात. भारतात नोकरी असेल तर हे बॉन्डस विकत घेतल्यावर फायदा होईल.

बॉन्ड दोन प्रकारे विकत घेता येतो.
१. बॉण्ड देनार्‍या कंपनी कढुन. यात तुम्ही तो बॉण्ड विकत घेता व सर्व गोष्टी जसे की maturity, interest हे सर्व माहीत असते.
२. बॉण्ड म्युचवल फंड मधे गुंतवनुक करुन. बहुतेक सर्व म्युचवल कंपन्याचा बॉन्ड फंड असतो. यात त्या कंपन्या गुंतवनूक करतात, तुम्ही फक्त त्या कंपनीचे units विकत घ्यायचे.

प्रकार: 

please give me more and more information about market ( Bond, MF, IPO, FD)

केदार खूप टायपो झालेत.
बाँडच्या इन्कमच्या टॅक्सेबिलिटीबद्दल आणि सेकंडरी मार्केटबद्दल पण सांगा. तसेच झिरो कुपन बाँड आणि कन्व्हर्टिबल बाँड्स
हे सगळं उडत उडत कानावरून गेलेलं...तुमच्याकडून संकल्पना पक्क्या होतील.