टक्कल पडने एक समश्या-उपाय

Submitted by राह on 30 September, 2013 - 08:11

टक्कल पडने एक समश्या-उपाय
अनुवाशिकतेने टक्कल पडने हि एक मोथि समश्या होत चाललि आहे.साधारण वयाच्या २० ते २२ पासन अनेकान्ना अनुवाशिकतेने टक्कल पड्न्यास सुरुवात होते.ईथे हेअर ट्रान्सप्लान्ट सोडून चर्चा करने.उपाय सुचवने.
म्हनुन सदर विशयावर व्यापक चर्चा करने गरजे चे आहे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा उघडल्याबद्दल धन्यवाद!

हेयर ट्रान्सप्लान्ट हा देखील खात्रीलायक उपाय आहे का? त्याचे रिझल्ट कसे येतात? कोणाला काही अनुभव आहे का?

धिरज,

हेयर ट्रान्सप्लान्टचे रिझल्ट, अनुभव असतील तर कृपया शेयर करा.

हेयर ट्रान्सप्लान्टचा एकंदरीत खर्च(८०,०००-१,५०,०००) पाहता सर्वसामान्यांना हा उपाय शक्य नाही, म्हणूनच इतर उपायांची विचारणा धागाकर्त्याने केली असावी.

टोपी

विग.

बीना केसांचे ( पूर्ण अप्पर डिप्पर) अमोल बावडेकर, कमलाकर सातपुते वगैरे छान दिसतात्.:फिदी:

खरेच पूर्ण टक्कल असेल तर विगशिवाय पर्याय नाही. हा फक्त पुरुषांचाच प्रश्न आहे असे नाही, तर बायकांना पण माथ्यावर केस विरळ होण्याची समस्या आहे.

टकलांचे प्रकार

१. V प्रकार : या मधे कपाळाच्या मधे केस राहून दोन्हि बाजूने विरळ होतात ..

२. डोक्याच्या मध्यभागी टाळूवरचे केस जाणे

३. डोक्याच्या मागचे भोवर्‍या वरचे केस जाणे ..

हे ३ प्रकार मुख्यतः आढळून येतात..बादवे टेलीब्रँड्स च्या एका जाहिराती मध्ये एका ने वि चारला होता ..माने पासून वरती केस , किंवा कानावरचे कल्ले .. इथले केस लौकर का जात नाहीत ? टक्कल असएल तरी हे केस शाबून असतातच !!

टक्कल पडायला सुरुवात झाली की..
१. केस खुप बारीक कापावेत ..
२. रोज डोक्यावरून अंघोळ करू नये ..
३. मिंटॉप लावावे..( केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सर्व साइड एफ्फेक्टस तपासून मगच वापरा ..)
४. कोंडा असेल तर त्याची ट्रीटमेंट घ्यावी ..
६. एकच तेल / शांपू ची सवय ठेवा !
६. अति गरम पाणी डोक्यावरून घेउ नका ..
७. शिर्षासन करा ( रोज करा ) फरक जाणवेल ..
८. फार विचार करू नका ..अजून पडेल

शाहिर,

मिनॉक्सिडील सारखी औषधे आपल्या देशात ओव्हर द काऊंटर मिळतात, हे दुर्दैव आहे.

लोक तशी औषधे त्यांच्या इफेक्ट/साईड इफेक्टबद्दलची काडीचीही माहीती नसताना एकमेकांना सांगतात, हे अधिक मोठे दुर्दैव आहे.

असले सल्ले वाचून लोक ती औषधे वापरतातही, हा अतीशय उद्वेगजनक प्रकार आहे..

पब्लिक फोरमवर असली औषधे सुचवताना किमान त्यांचे अ‍ॅडव्हर्स इफेक्ट्स गूगलून पहात जा. माबोवर जे लोक स्वतः डॉक्टर आहेत असे सांगतात, ते कधीही असली नेट कन्सल्टेशन्स करीत नाहीत, याचे कारण आमचे दुकान चालू रहावे हे नसून, तपासल्याशिवाय औषध सांगितल्यास, त्याच्या सर्व परिणामांची जबाबदारी आमच्यावरच असते, हे आहे. पहा विचार करून मी काय म्हणतोय ते लक्षात येते आहे का?

टक्कल जर अनुवांशिक असेल तर कठिण आहे.
प्रत्येक वेळी टक्कल खराबच दिसतं असं काही नाही. संगीतकार राहुल रानडे , अनुपम खेर टक्कल किती ग्रेसफुली कॅरी करतात.
BTW माझे एक सत्तरीचे नातेवाईक आहेत. डोक्यावर पांढरे भरघोस केस आहेत.त्यांच्या वडिलांचेही असेच होते .
आणि त्यांच्या मुलाचे वय २८ वर्षे आणि अर्धे टक्कल आहे !

Minoxidil Adverse Reactions

Mintop Forte Side Effects

Spontaneous tachycardia, hypertrichosis, fluid preservation (along with, oedema, weight gain, and sometimes worsening of existing cardiac ailments and alterations in the ECG). Nausea, Headache, breast tenderness and gynaecomastia, thrombocytopenia skin rash, polymenorrhoea. Topical: complete results may also take place; pruritus, contact dermatitis, flushing, local burning; modification in hair color or quality.

Potentially Fatal: Ischemic heart disease; angina pectoris may be irritated or exposed; pericardial effusion developing to tamponade and even death; pulmonary hyper tension; Stevens-Johnson signs.

Precautions

(a) Observe electrolyte and fluid equilibrium along with body mass.

(b)Monitor subjects for symptoms of pericardial effusion.

(c) Apply after myocardial infarction - Mintop Forte (Minoxidil) has not been applied in subjects who have had a myocardial infarction inside a month. It is probable that a decrease of arterial force with Minoxidil may additionally hinder blood flow to the myocardium, even though this might be remunerated by reduced oxygen demand as a result of decreased blood pressure.

(d)Hypersensitivity -probable allergic reaction to Mintop Forte (Minoxidil), apparently as a skin rash, has been reported in less than 1 percent of patients; whether the medication should be stopped when this happens depends on therapy substitutes.

(e)Renal failure or dialysis subjects may necessitate smaller dosage of Minoxidil and ought to have close therapeutic management to thwart exacerbation of renal impairment.

विकी:

ड्रग्ज.कॉम. हे जास्त डीटेल आहे. वाचण्याचे कष्ट घेतलेत तर बरे. नुसते स्क्रॉल करून पाहिलेत तरी चालेल.µ Happy

डाॉक्टरांच्या कडून औषध घेताना बहुतेक डाॉक्टर औषधाचे साइड इफेक्ट कधीच सांगत नाहीत. Sad
मध्यंतरी लहान मुलांना सररास ‘नाइस’ (निमसुलाइड) दिले जात हाोते. (तेव्हा अन्यत्र ते बॅन हाोते पण डाॉक्टरांनी गुगलून पाहण्याचे कष्ट घेतले नव्हते)

हरिहरजी,

असे anecdotes(किस्से) सांगताना 'त्या' डॉक्टरांची डिग्री, व ते कोणत्या 'पॅथी'चे आहेत, हे लिहित जावे अशी तुम्हाला व सगळ्यांनाच विनंती करतो.

ते महोदय "अ‍ॅलोपथीचे" औषध काय म्हणून लिहित होते? स्वतः मॉडर्न मेडिसिनचे पदवीधर असतील तर त्यांचे ज्ञान आऊटडेटेड आहे, हे शक्य असते. असे असणे deplorable (निषेधार्ह)च नव्हे, punishable (शिक्षा करणेयोग्य) असू शकते. असे होऊ नये म्हणून, सध्या सर्व मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांना आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी दर वर्षी किमान ६ क्रेडीट अवर्स = घड्याळाचे ७२ तास करंट मेडिकल एज्युकेशन घेणे कंपल्सरी करण्यात आले आहे.

रच्याकने,
१. निमेसुलाईड काँट्रावर्सी वेगळी आहे.
२. तुम्ही काय वापरून टाईप करता?" डाॉ क्टर" हे असे गमतीदार दिसते. कदाचित तुमच्याकडे नीटच दिसेल.

माझेही अर्धे टक्कल पडले आहे मला काहीही समश्या वाटत नाही !
पण ही एक अशी जागा आहे एकदा नापिक झाली की हर उपयानी काय पण फरक पडणार नाय?

कायम डोक्यावर ट्क्कल (कट) ठेवा , ही समस्या नाही ,

कुणी तुम्हाला टकल्या चिडवत असेल तर तुम्ही त्याला केसाळ्या चिडवा........... Rofl

चुकीची औषध सुचवले आहे ,,म्हणून सॉरी !
ओव्हर द काउंटर , कोणत्याही प्रीस्क्रीप्शन शिवाय मिळते म्हणोन सुचवले..आणि मला चांगला अनुभव आला होता ..

टक्कल असणे हे आपल्याकडे अ-सुंदर असणे समजतात. तसेच बरेच लोक टिंगल टवाळी करतात. त्यामुळे टक्कल असणार्‍यांना न्यूनगंड येऊ शकतो. लग्न जुळताना देखील अडचणी येतात.

माझ्या माहितीनुसार अनुवांशिक टक्कल पडणे बरे नाही होऊ शकत, फक्त टक्कल पडण्याची गती कमी करु शकतात.
पण हे अनुवांशिक टक्कल मला थोडे चमत्कारिक वाटते कारण अनेक लोक पाहण्यात आहेत ज्यांच्या वडील, आजोबांना अगदी दाट केस आहेत आणि मुलाला टक्कल. वर माशा यांनी उदाहरण दिलेच आहे.
राकेश रोशन, राजेश रोशन यांना टक्कल आहे तर हृतिक रोशनला छान केस आहेत. Happy

अगदी तुळतुळीत टक्कल पडले असेल तर त्यावर केस नाही उगवून येत. अनेक भोंदू वैदू टक्कलावर केस उगवून देण्याचा दावा करतात. टक्कलावर बारीक लव असते, तिलाच हे लोक केस म्हणतात आणि सांगतात की केस उगवून दाखवले.
टीव्हीवर देखील आता जपानी तेलाच्या जाहिराती लागतात, ज्यात सहारा वाळवंटासारखे टक्कल असलेल्या माणसाला अ‍ॅमेझोनच्या जंगलासारखे दाट केस उगवून येताना दाखवले आहेत.
कृपया अश्या लोकांच्या/जाहिरातींच्या नादी लागू नये.

श्शी! नको त्या वेळी नको ते आठवले. मैत्रिणीच्या भावाने विडंबन केले होते गोरी तेरा गाव बडा प्याराचे.:फिदी:

पोरी तुझा बाप किती टकल्या
खातो किती चकल्या येता जाता रे, येता जाता रे.:फिदी::दिवा: