होते

Submitted by ashishcrane on 30 September, 2013 - 07:11

थुंकूनी जे गेले,
ओठ ओळखीचे होते
होते गच्च हात धरलेले,
आतुनी पोकळीचे होते

चंचल भुंगे मनात होते,
रस्ते मनाचे नजरेहून वेगळे,
मृगजळाशी नाव उभी वेडी,
भरलेले घर आमुचे मोकळेच होते

शब्द वचनांचे बाजारात विकले होते,
असतील गळले.. केस आठवणींचे पिकले होते,
कळले...ओठ मी परक्या कपाळी टेकले होते,
पाहीले मी...सरणावरही त्यांनी हात शेकले होते

--आशिष राणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही वरची लिंक का पाठवली ते नाही कळले मला
मी जे लिहिलंय ते गझल या प्रकारात मोडत नाही का?
मला काही अंदाज नाही
तसे नसेल
तर मी ती कविता म्हणून पोस्ट करतो