Submitted by सुशांत खुरसाले on 29 September, 2013 - 10:31
लावला नसल्यामुळे मी धाक राणी..
बिघडला आहे तुझा स्वयपाक राणी !
मी कसे याला दही म्हणु ते कळेना..
वाटते की प्यायलो मी ताक राणी!
पाणचट सारे वरण हे जाहलेले..
यात थोडेसेच पाणी टाक राणी !
तू जरा स्वयपाक सुधरुन दाखवी मज
मग कसे मुरडेन मी हे नाक राणी !
अभिरुचीसंपन्न होती जीभ माझी..
बाटवीले तू तिला हकनाक राणी !
=======================
हा असा स्वयपाक तू करशील तर मग..
खायचा नाही तुझाही बाप राणी !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'मतला. नाक, हकनाक
माझ्याही दोनोळी
-----------------------------------------------------------
येत आहे मित्र खासा भेटण्याला
दे चहा तरि, लाज माझी झाक राणी
मी ही गझल खूप आवडल्याने
मी ही गझल खूप आवडल्याने बायकोला ऐकवली. आता माझे जेवायचे वांदे आहेत.

मी येतोय तुमच्याकडे जेवायला. :p
हवे तेव्हडे तुही मजला छळून
हवे तेव्हडे तुही मजला छळून घे,
पण करू नको पोटाचे माझ्या हाल राणी
अमेयजी, जयजी , मधुरा सर्वांचे
अमेयजी, जयजी , मधुरा सर्वांचे आभार !
निवडक दहात ही रचना टाकल्याबद्दल जयजी आपले विशेष धन्यवाद .
मी येतोय तुमच्याकडे जेवायला.<<< जरूर या माझं लग्न झाल्यावर.....मी ही गझल केवळ लग्न झालेल्यांकडे बघून लिहिली आहे .
गझलेच्या प्रतिसादांत स्त्रियांनीही पुरूषांविरूद्ध आगपाखड केली तरी चालेल ..त्यांच्या शेराची रदीफ 'राजा' असायला हरकत नाही.

हा हा हा...हझल
हा हा हा...हझल
मस्तच!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!
(होणा र्या) बायकोला
(होणा र्या) बायकोला लग्नापुर्वी ही गझल दाखवू नका....:p
गझलेच्या प्रतिसादांत
गझलेच्या प्रतिसादांत स्त्रियांनीही पुरूषांविरूद्ध आगपाखड केली तरी चालेल ..>>>>
कदाचित हे कठीण आहे......गझलेत मावणार नाही इतकी आग आहे!!
आणि कशाला स्वतःहून पायावर हातोडा मारून घेताय?
धन्यवाद !
धन्यवाद !
>>>>>कदाचित हे कठीण
>>>>>कदाचित हे कठीण आहे......गझलेत मावणार नाही इतकी आग आहे!!+१
हा हा हा हा. मस्त मजा आली हझल
हा हा हा हा. मस्त मजा आली हझल वाचून.
प्रतिसादातल्या दोनोळ्या पण मस्तच.
'राजा' घेऊन दोनोळ्यांचा
'राजा' घेऊन दोनोळ्यांचा जवाबाचा प्रेत्न ...ऐक्का!!!
------
राजा..!
मला कसला तुझा रे धाक रा॑जा
तूच कर जा उरलेला स्वयपाक राजा !
कान काय फुटले होते जेव्हा म्हणाले
संपवून टाक उरलेले ताक राजा !
वरण आज केले तुझ्याच रे माऊलीने
वाटचे माझ्याही गटकावून टाक राजा
तारीफ करती सर्व, सदा माझ्या गुणांची
तुच का रे मुरडतो तव नकटे नाक राजा !
देऊ नको उगा दुहाई तव 'अभिरुचीं'ची
राहशील ऊपाशी उद्या हकनाक राजा !
===========
ही अशी सारखी कटकट जर तू करशी
घेऊन जाईल माहेरा मज बाप माझा !
वा!! अविकुमार जी.....खूप
वा!! अविकुमार जी.....खूप छान!!!! जास्त आवडली.
इसको कहते है, 'इट का जबाब पत्थर से!!!'
मस्त प्रतिसाद अविकुमार
मस्त प्रतिसाद अविकुमार
मस्त हझल ... अविकुमार मस्त
मस्त हझल ... अविकुमार मस्त उत्तर
मस्त जुगलबंदी.
मस्त जुगलबंदी.:हाहा:
मस्त हझल ... अविकुमार मस्त
मस्त हझल ... अविकुमार मस्त उत्तर +१
अविकुमार मस्त उत्तर +2
अविकुमार मस्त उत्तर +2
धन्यवाद मंडळी! सर्व श्रेय मूळ
धन्यवाद मंडळी!
सर्व श्रेय मूळ गझलेचंच, पर्यायाने सुशांत खुरसाले यांचेच. मधुरा कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे "गझलेत मावणार नाही इतकी आग आहे!!" या विषयातच! माझा आपला उगीच आगीत तेल ओतण्याचा थोडासा प्रयत्न!
(No subject)
.
.
अविकुमार मस्त उत्तर +३
अविकुमार मस्त उत्तर +३
(No subject)
झकास आहे...
झकास आहे...
(No subject)
(No subject)
कम्माल सवाल जवाब..
कम्माल सवाल जवाब..
अर्रे...इथे अजूनही बरसात
अर्रे...इथे अजूनही बरसात चालूच आहे..छान छान!
आज वाचलं हे.
आज वाचलं हे.
मान गये अविकुमारजी , अतिशय
मान गये अविकुमारजी , अतिशय समर्पक उत्तर दिलंय तुम्ही.... ...जियो !
शब्द आणि माबो बाहुले यांद्वारे प्रतिसाद देणार्या सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे .
Pages