Submitted by जयदीप. on 29 September, 2013 - 07:08
विझले कधीच वणवे, का भ्रम जळत आहे
तो कोळसा कधीचा, का आज सलत आहे
पाने जशी उलटती, सारी न वाचलेली
निर्दोष कालचा ही , दोषीच दिसत आहे
तोडून खास गेले ते घाव आठवांचे
तो मोडका जिव्हाळा,का आज कण्हत आहे
ते डावलून गेले, जे आपलेच होते
कोणी अनोळखी तो , का देव बनत आहे
बोलून ही न कळले, ते गूज मजमनीचे
का मौन हे पसारे भलतेच विणत आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी नसे तरीही, सय सोबतीस
कोणी नसे तरीही, सय सोबतीस आहे
पेरून आठवांना जवळी रुजत आहे
अरे वा!
अरे वा!
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!