SAP संबंधित कोर्सेस बद्दल माहिती हवी आहे

Submitted by _आनंदी_ on 26 September, 2013 - 02:28

मी इलेक्ट्रिकल ईंजिनीअर..
पहिल्या पासुनच सॉफ्ट वेअर प्रोग्रॅमिंग मध्ये इंट्रेस्ट होता...
इलेक्ट्रिकल ईंजिनीअरिंग शी संबंधित कंपनीत काम करते..
इथे SAP ("Systems, Applications and Products in Data Processing") शी संबंधित काही डिपर्ट्मेंट आहेत .. त्यामध्ये काम करयचि इच्छा आहे..\
काही SAP संबंधित कोर्सेस बद्दल शोधाशोध केली .. अशे कोर्सेस उपलब्ध आहेतच पण खुपच पैसे घेतात..
आणि SAP संबंधित कोणती संस्था चांगली कोर्स करण्यासाठी ते ही कळत नाही..
कुणी असे कोर्सेस मुंबईत केले असल्यास माहिती द्यावी..
धन्यवाद

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी २०१० मधे Genovet मधुन MM मधे Certification केले आहे.
२०१० मधे मार्केट चांगले होते ,मला २ महिन्यातच ५ job ऑफर मिळाल्या होत्या.

माझा Teaching मधे १९९९-२००७ असा मोठा अनुभव असुन हि मला as a Fresher च Treat केले गेले.
(अर्थात याची मला कल्पना होती आणि मी एक वेगळ्या career च्या शोधात हि होते)
तुम्हाला as a Fresher च Treat करने हे फक्त ऑफर देवु पर्यन्तच असते,
जर तुम्हि चान्गला performance दिला तर growth हि पटकन मिळते.
तसेहि मला SAP Trainer बनायचे होते आणि त्या साठि मी Certification व हा सद्याचा job करते आहे.

आता SAP संबंधित कोर्सेस आणि संस्था बद्दल-
यात दोनच प्रकार आहेत-
१)SAP academy parteners-
2)Others

पहिला प्रकार जो आहे तो खुप खर्चिक आहे,पन फसवा नाही.
यात जर तुम्हि अभ्यास नीट केला तर Certification मिळते ते Global level che आहे.
हा अभ्यास खुप जास्त असतो(कारण तयारी साठि खुप कमी वेळ आणि खुप मोठा अभ्यासक्रम एकाच पेपर मधे पार पाडावा लागतो)
माझ्या वेळी आम्हा ८ पैकी फक्त २ जन पास झालो.

Job साठि assistance मिळतो पन garranty नाहि,
त्या नंतर Interview तुम्हि तुमच्या परिनेच पार करावा लागतो.
मी Interview ला माझ्या आधीच्या बॅचच्या काहि जनांना हि भेटले,
३जन तर २००८ चे होते,
त्यान्चेच Interview मी मागच्या महिन्यात घेतेले,(They are still searching for a job in SAP),
पण ईतका काळ लोटल्यामुळे कदाचित ते Techinicaly pass नाहि होउ शकत.

माझ्या बाबतीत मला Job मिळन्याची भीती नव्हती कारण as a SAP Trainer मला offer certification dayलाच मिळाली होती.

२)आता Others बद्दल-
यात हि दोन प्रकार आहेत-
अ)फक्त ट्रेनिंग देणारे(जरि On Job वगैरे म्हटले असले तरी)-
हा प्रकार स्वस्त आहे आणि धोकदायक सुध्दा.
यात तुम्हि किती पैसे देता यावर पुढचा क्रम ठरवतात.
(खोटे experince cerificate,background Check saathi prep n all)
बरेच गुल्टे बन्धु असेच येतात.
यात बर्याच वेळा Interview support(In telephonic Interview ,institute person clears technical interviw on your behalf)आनि job support(the institute person works for you in back ground,you will call him and tell him the issue and he will guide you on how to resolve it,in exchange Institute asks you a percentage of your salary) दिले जाते.

वरच्या दोन्हि बाबि चांगले मॅनेजर हातोहात पकडतात आणि हाकलतात.

ब्)खरोखर On Job वाल्या संस्था-
हे नंतर लिहिन
सवडिने....

meeradha.. धन्यवाद खुप छान माहिती दिलीत...
भारतात काही चांगल्या संस्था आहेत का?
असल्यास प्लिज सांगा..
<<ब्)खरोखर On Job वाल्या संस्था->> या बद्दल वेळ मिळेल तेव्हा प्लिज लिहा..

पार्ट टाईम कोर्सेस स्कुल्स आहेत का?
असल्यास सांगा..

पुन्हा एकदा धन्यवाद... Happy