कायद्याला कोण वाली

Submitted by Prashant Pore on 26 September, 2013 - 02:21

कायद्याला कोण वाली आज नाही
हाय त्याला जाळणाऱ्या लाज नाही

दुर्बिणीने शोध घ्या अन दाखवा मज
एकही नेता जयाला माज नाही

लोकशाहीची निघाली अंत्ययात्रा
हाय रडण्याचा कसा आवाज नाही

राष्ट्र माझे चालते घेवून कुबड्या
पाय कुठला मोडला अंदाज नाही

राजकारण चालते येथे धनाने
सागराची लाट आहे गाज नाही

कर्जबाजारीच आहे देश माझा
मागण्याची भीक गेली खाज नाही

आठवा रे मायभूमीने दिलेले
कोणते हे कर्ज ज्याला व्याज नाही

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली