Submitted by जयदीप. on 25 September, 2013 - 16:15
तू यावे म्हणून केले मी लाख बहाणे होते
तुझ्याकडे ना येण्याचेही ते एक गाणे होते
उंबरठ्यात संपले होते ते माझे घर नवखे
पुन्हा तेच जुने आकाश नव्याने पहाणे होते
मी का कसा कोणावरही आळ चोरीचा घेऊ?
नशीबाने भाग्यच लिहिले भलते फलाणे होते
तळहाताच्या रेषांवर भविष्य चाललेच नाही
त्या ओसाड रस्त्यांकडेच माझे वहाणे होते
पाठीवर सांत्वनाचे बरेच हात फिरले होते
काढता पाय घेण्यात ते झाले शहाणे होते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लवकरात लवकर तंत्र शिकायला
लवकरात लवकर तंत्र शिकायला घ्या...अनेक चंगले चांगले खयाल उगाचच वाया जातात सुरुवातीला लक्षात येत नाही पण नंतर तंत्र जमू लागले की खेद होत राहतो की त्या वेळी आपण अगोदरच तंत्र शिकायला हवे होते म्हणून...
तंत्र जमेपर्यंत केवळ सराव म्हणून मोजकेच लिहावेत
मलाही सुरुवातीला हे समजले नाही आता थोडे थोडे जमू लागल्या सारखे वाटत असताना (हे वैयक्तिक मत !!) उपरती होते आहे म्हणून केवळ आपणास मनातले बोलून दाखवले इतकेच
गैरसमज नसावा
वैभवांशी अगदी अगदी सहमत. खरच
वैभवांशी अगदी अगदी सहमत. खरच चांगले खयाल आहेत पण गजलचं व्याकरण नाही.
pls i am asking once
pls i am asking once again...where are the mistakes? u guys can spot it. i cant. as i have written this from whatever i could gather. his means here is a gap in understanding.
i ve kept feeling like that boy from TZP, who knows hes wrong but no ones ready to point out exactly where the mistake is. read it from ..... is not helping me...(u can lolz) but after reading i wrote this.
so, i had asked ppl to point out the mistakes precisely..i know, no one will spare so much of time, as i have not been writing good enough. just quantity.
this so called gazal i have put in kavita section and not gazal...because i know, there are certain faults which u guys r able to easily figure out. i am not. will someone please point out the exact mistakes? (sorry for being so selfish)..typing on cell..hence english.
या कवितेत... १.प्रत्येक ओळीत
या कवितेत...
१.प्रत्येक ओळीत २८ मात्रा आहेत
२.'होते' रदीफ आहे
३. 'गाणे', 'फलाणे' , 'वहाणे' .... काफिये आहेत
४. अलामतही आहे 'आ'
लय चुकली आहे का? का (so called) शेर जमले नाहीत??
नक्की काय चुकलं आहे?