ती रात्र एक गाथा नवखी लिहीत होती...

Submitted by जयदीप. on 24 September, 2013 - 04:29

तो मंत्रमुग्ध होता ती ही लयीत होती
श्वासांत गुंफलेली ती रात्र गीत होती

रंगात रंगलेले का चित्र ते दिवाणे
काहून रंगलेली ती धुंद प्रीत होती

सुरुवात शेवटाची कोणास शुद्ध होती
ती रात्र ही विसरली सारीच रीत होती

नि:शब्द वादळे ती,ते बोलके उसासे
बेधुंद रात प्याले जवळून पीत होती

त्या स्पंदनात होते आभास पालवीचे
ती रात्र एक गाथा नवखी लिहीत होती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रशांत...मी नुकताच गझल लिहायचा प्रयत्न करु लगलो आहे. त्यामुळे तंत्रात चुका असण्याचे ९५% chances आहेत.

पण इथे स्वर काफीया आहेत..अ ...

मतला का नाही आहे ते सांगाल का pls...

स्वर काफिया घेऊन लिहिली असेल तर ठीक आहे. माझ्या लक्षात आले नाही. क्षमस्व.
पण स्वर काफिया हा माझ्या मते तीन क्रमांकाचा काफिया आहे. आपण जर नवीन लिहित असाल तर शक्यतो स्वर काफिया टाळता आला तर पहा.
पुनश्च एकवार क्षमस्व...

मला मतला,मात्रा वगैरे काही कळत नाही हो
मला गझल आवडते किंवा आवडत नाही
क्वचित एखादी फार फार भावते... माझा आणि गझलेचा संबंध इतकाच!

धन्यवाद रियाजी. आपल्या प्रांजळ मताबद्दल... आपल्यासारख्या रसिकांच्यामुळेच लिहायला बळ येते.

जय जी स्वरकाफिया चालतो पण फक्त अ हा स्वर अंती योजून आलेले काफिये अनेक तज्ञ मान्य करत नाहीत त्याला तसे ठोस कारणही आहे पण आत्ता त्यावर चर्चा करून तुम्हाला अजून गोंधळात पाडायचे नाही म्हणून आत्ता सांगत नाही
अभ्यास चालू ठेवा तंत्र नीट समजून घ्या
शुभेच्छा

हीला गझल म्हणता येणार नाही व म्हटले तरी खूपच सदोष व तृटीपूर्ण गझल म्हणावे लागेल
पुनश्च शुभेच्छा

बाय दी वे अभ्यास कश्या पद्धतीने करत आहात ? म्हणजे गझल शिकायची म्हणून काय काय करत आहात आता / केले आहे आत्ता पर्यंत ?,,,आम्हाला कळेल का !!!

Happy Happy

थोडा बदल करून काफिया 'त' केला आहे..<<<<
आता सर्व काफिया असलेल्या ओळीत त्या त्या शब्दात त्या त च्या आधीच्या अक्षरावर (व्यंजन) एकच समान स्वर (अलामत) येईल असे पहावे Happy

बेफीजींनी दिलेली लिंक वाचावीत त्या खालचे प्रतिसादही सावकाशीने वाचावेत ही विनंती

वैभवजी...आता...
१.वृत्त : आनंदकंद
२.रदीफः होती
३. काफिये : लयीत, गीत, प्रीत ...
४. अलामत : ई

अजून काय तांत्रिक चुका आहेत?

वाह !!! आता वृत्त काफिये रदीफ जमल्यासारखे वाट्त आहेत

आधीच तयार असलेल्या ओळींमध्ये चपखल काफिये बसवणे मला अवघड वाटत आले आहे आजवर पण तुम्हाला जमले यासाठी अभिनंदन!! (तरी अजून बाकीच्या बर्‍याच नाजुक साजुक बाबी असतात हळू हळू आपल्याला आपोआप समजत जातीलच )

तंत्रानंतर मंत्र हा विषय तो प्रत्येकाला आपल्याआपण अभ्यासावा लागतो

असो
अश्याच वेगवेगळ्या जमीनी पादाक्रांत करत रहा
शुभेच्छा

मतला आणि शेवटचा शेर आवडला...
लिहित रहा ..आपण छान लिहू शकता .
शुभेच्छा ! Happy

सर्वांचे आभार.
प्रोत्साहनासाठी धन्यवाद.

Happy