या रविवारी (दि. २२ सप्टेंबर) न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमधे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून प्रायोजीत, दिपोत्सव साजरा झाला. जगातल्या सगळ्यात गजबजलेल्या या चौकात या दिवशी महाराष्ट्राची संस्कृती झगमगली. लावणीपासून गोविंदापर्यंत आणि मेंदी पासून ताज्या भज्यांच्या खमंग वासापर्यंत मराठी संस्कृतीनं, तिथे जमलेल्या साडेतीन लाख देशी विदेशी पाहुण्यांना आपलंसं केलं. या कार्यक्रमात सहभागी झालेले बृहन्महाराष्ट्रमंडळाचे विश्वस्त श्री आशिष चौघुले यांच्याकडून यांच्याकडून मराठी माणसाला अभिमान वाटावी आणि कायम स्मरणात रहावी अशी ही प्रकाशचित्रे
१. टाईम्स स्क्वेअरमधे गोविंदा. सर्व छायाचित्रे श्री आशिष चौघुले
२. टाईम्स स्क्वेअरमधे गोविंदा
३. व्यासपीठावर मान्यवर
४. श्री छगन भुजबळ आणि श्री आशिष चौघुले
५. अस्सल मराठमोळ्या वेषात न्यूयॉर्कचे श्री सतीश वारे आणि श्री मुकंद खिस्ती, श्री आशिष चौघुले यांच्या बरोबर.
ह्या आशिष चौघुलेंना आपले फोटो
ह्या आशिष चौघुलेंना आपले फोटो द्यायची फार हौस दिसत्येय.
नाही त्यांनी फोटो दिले नाहीत.
नाही त्यांनी फोटो दिले नाहीत. मी त्यांना मागून घेतले आहेत. टाईम स्क्वेअर मधे मराठी संस्कृती दिसली याचे मला अप्रूप वाटले म्हणून.
महाराष्ट्र मंडळाच्या
महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात छगनराव इंग्रजीत बोलतात... अरेरे.... बाकी सावळा गोंधळ सगळीकडे सारखाच असतो म्हणायचं.... मग ते मराठी असो की अजुन कोणी (भारतीय).
कढई-स्पोर्टस नावाचा (वॉटर-स्पोर्टसारखं) एखादा खेळ असेल हो केदार.
बाकी फेटे बघुन मस्त वाटलं... एकदम तुर्रेबाज.
बायदवे, फेटा कसा बांधतात याचा कुठे व्हिडीओ आहे का?
@विजय देशमुख कार्यक्रम मराठी
@विजय देशमुख
कार्यक्रम मराठी मंडळाचा नव्हता. अधिक विदेशी पर्यटक महाराष्ट्रात यावे म्हणून होता. त्यांच्या समोर मराठी बोलून कसे चालेल हो?
अजय, पण 'we have oos and
अजय, पण 'we have oos and kaapoos' असलं इंग्रजीतरी काय उपयोगाचं?
ओह, असं आहे का. मग ठीक आहे.
ओह, असं आहे का. मग ठीक आहे. पण तरी त्यांचं इंग्रजी कोणालाच कळलं नसणार हे नक्की.
त्यापेक्षा त्यांच मराठी भाषण आणि (अमेरिकन) इंग्रजीत इतर कोणी नंतर वाचुन दाखवलं असतं तर बरं वाटलं असतं. उगाच मराठीचा अभिमान म्हणुन (नसलेल्या) कॉलर ताठ केल्या असत्या.
अवांतर म्हणुन लिहितो. इथे कोरियन सरकार आंतरराष्ट्रिय विद्यार्थी/कामगार संमेलनं भरवते. त्यात ज्याला कोरियन बोलता येत नाही, तोच फक्त इंग्रजी बोलतो, बाकी सगळं कोरियनच. असो.
तुमचा उत्साह बघुन चांगलं वाटलं. आम्ही इथं १०० मराठी लोकही जमा नाही होऊ शकत. तेन्व्हा उगाच खोड्या काढण्यात मजा नाही.
पुढच्या वर्षी अधिक जोमात होऊन जाऊ द्या. शुभेच्छा.
स्वाती, खरंय तुमचं म्हणणं. पण
स्वाती,
खरंय तुमचं म्हणणं. पण इतक्या सगळ्या अडचणीतून , टाईम्स स्क्वेअर मधे असा कार्यक्रम करण्याच धाडस कुणितरी केलं याचं मला तरी कौतुक वाटलं. मी प्रत्यक्षात तिथे नव्हतो पण या व्हिडीओत तरी, गर्दी बरीच मोठी दिसते आहे.
इतक्या सगळ्या अडचणीतून ,
इतक्या सगळ्या अडचणीतून , टाईम्स स्क्वेअर मधे असा कार्यक्रम करण्याच धाडस कुणितरी केलं याचं मला तरी कौतुक वाटलं. >>>>>> +१
इतरत्र नीटनेटके कार्यक्रम होत असतांना सरकारी (कदाचित म्हणुनच) असा कार्यक्रम व्हावा याचं वाईट वाटतं. तिथल्या स्थानिक मराठी लोकाम्ची मदत कमी पडली का घेण्यातच आली नव्हती, हे कळलं नाही. विस्तृत वृतांत असता तर बरं झालं असतं ..... एखाद्या परिक्षणासारखा. असो. तुम्ही नव्हता तिथे, तरी तुम्हाला ही बातमी टाकावीशी वाटली, हेच प्रेम गरजेच आहे.
फेटेवाले SPIDER माने - फोटो
फेटेवाले SPIDER माने - फोटो Coutesey माझा चुलत भाउ
Pages