संतोष माने केस -पुन्हा सूनावणी आवश्यक आहे का ?

Submitted by टिंबक टू on 23 September, 2013 - 04:22

२५ जानेवारी २०१२ , तब्बल ९ ठार , ३७ जखमी - हा कोणता अपघात नव्हता , जाणूनबुझून केलेला मुर्खपणा
, आरोपी संतोष माने, बसचालक याने या एवढ्या लोकांच्या अंगावर शुद्धीत बस चढवली. त्या दिवशीचा तांडव थरार आणणारा होता .

पुणे कोर्टाने आरोप निश्चित करुन फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पुन्हा सूनावणीची खरच आवश्यकता आहे का ?

आरोपींना शिक्षा होण्यासाठी करावी लागणारी खटाटोप पोलीसांबरोबरच मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना मनस्ताप देणारी असते.

वरच्या न्यायालयात अपील करण्याचा हक्क असला पाहिजे हे मान्य पण एकदा घेतलेली सूनावणी नव्याने घेण्यात काय अर्थ आहे, पुणे कोर्टाने दिलेला निर्णय योग्य नाही असे उच्च न्यायालयाला वाटत असेल तर पुण्यात घडणा-या गुन्ह्यातील आरोपींना थेट उच्च न्यायालयात उभे करावे आणि पुण्याच्या वकील ,न्यायाधिशांना कायमची सूटी द्यावी ...............................

टिंबक टू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदरचा धागा चूकून कविता विभागात उघडला गेला आहे, माबोवर नविन असल्याने ग्रूप कसा बदलावा माहित नाही . कृपया माहिती द्यावी ..................

ज्या ग्रूपमध्ये हे लिखाण हलवायचे असेल, त्याचे सदस्यत्व घ्या. मग या लेखावर येउन संपादन कळ दाबली की सगळ्यात शेवटी तुम्हाला ग्रूप्स दिसतील, त्यातुन निवडा.

मला वाटतं त्याच्या मानसिक अस्थिरतेचं कारण त्याने त्याच्या सिनिरना लेखी दिलं होतं.त्याच्यावरती सुरू असलेले ट्रिटमेंट्स सर्वांना माहिती होत्या.तरीसुद्धा त्याला लाँग ट्रीप देलेल्या होत्या.आपण साधी कार जरी कार जरी पुणे-कोल्हाप्र नेली- आणली तरी डोकं जड होतं.
u know about ST and its consequences.Hot engine cabin,seat for driver and noise-sound,have u ever experienced what happen when you sit nearby driver.

The person was under too much furstration.Tyacha chukicha aahe hi goshta khari pan ST mahamndalane yatun kahi dhada ghetala aahe ka?We are talking over the case but what is the output driven?

Mane had already told about his condition.His furstrations.By my point of view revise the case is not an answer.Je zala aahe te zalach...pan he is not single Mane.I have talked with bus drivers n conductors.In front of me two three cases of Fits n cardiac arrest have happened with very young of those Bus drivers.There are many...No body wants to concentrate on these issues.

(Please dont start discussions now,because India is country of conferences and fruitless concluders.Pudhe koni nko mhanayala ata Maybolivar Nusate Dhage nightat aani discussins hotat.)

टिंबक टू, उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावताना न्यायालयीन कामकाजात घडलेल्या तृटींच्या संदर्भात ही केस पुन्हा खालच्या न्यायालयाकडे पाठवली आहे. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलेला असून शिक्षेची सुनावणीकरण्यादरम्यान आरोपीस वा त्याच्या वकिलांस सुनावलेल्या शिक्षेबद्दल आपले म्हणणे मांडण्याची संधी न मिळाल्याने ती संधी आरोपीस मिळावी ह्यासाठी केस खाली पाठवली आहे. म्हणजे सत्र न्यायालयात केवळ दिलेल्या शिक्षेवर म्हणणे मांडले जाईल. ह्यात कुठेही पोलिस/मृत-जखमींचे नातेवाईक इत्यादींना पुन्हा गुन्हा शाबित करावा लागणार नाहिये.