दिवसामागून दिवस Growing up

Submitted by रमा. on 22 September, 2013 - 06:39

बालपण ..

आपला जन्म होतो. आपण म्हणजे आई- बाबांच सगळ्यात precious गिफ्ट. त्यांच्या अंगाखांद्यावरून खेळत हळूहळू आपल्याला येतं एक बालपण. सुंदर, समाधानी आणि गमतीशीर बालपण. जेव्हा आपण आईबाबांच्या सुरक्षित पंखाखाली निर्भीडपणे जगात असतो. छान छान गोष्टी, बालगीते, कविता, वाळूचे किल्ले, पऱ्या- राक्षस, ससा- कासव, घसरगुंड्या, सापशिडी, पकडापकडी, पडणे- धडपडणे, रडणे, पाउस, बेडूक, सर्दी- खोकला, शाळेला बुट्ट्या, भावला-बाहुलीचा लग्न अशा सगळ्यात रमण्याचे दिवस. सगळं कसं छान.. आई बाबा सांगतील, दाखवतील एवढंच आपलं जग.

वेडं वय

आपण शरीराने वाढतो, पण मनाचा तेवढा विकास नसतो झालेला. आई - बाबांच्या सुरक्षित पंखांखाली आपण मावेनासे होतो. अर्धवट फुटलेल्या पंखाना गगनभरारी घेण्याची वेडी उर्मी आलेली असते. वेड्यागत कविता स्फुरतात. SMS च्या वह्याच्या वह्या भरलेल्या, प्रेम वगेरे होतं काहीना कित्येकदा . संदीप खरे जगातला बेस्ट कवी आहे, आणि माझेच म्हणणं तो गातोय असे काहींचे समज असतात. आणि मग चोरटे कटाक्ष, बहाणे, इशारे यांनी मन फुलून येतं. पालकांचे बोलणे burden वाटू लागतं. माझंच खरं आणि मी ते करून दाखवणारच असा वेडा हट्ट असतो. चहाच्या टपर्या आणि खास अड्ड्यांचे हे दिवस. घरापेक्षा बाहेरच जास्त वस्ती. माझी माणसं मी निवडणार आणि ती चांगलीच असणार असा वेडा विश्वास असतो. घरातल्यांनी मित्र-मैत्रिणींसमोर shortform मध्ये अक्ष्या, सुंद्र्या वगैरे केलं कि घोर अपमान होतो. अभ्यासाचे काय चालू आहे असा विषय काढायचा अवकाश कि आपली उलटतपासणी चालू आहे असा काहीतरी समज करून, 'तुमच्या वेळेला असं नव्हतं' पासून 'शिक्षणव्यवस्थाच किती घाणेरडी आहे' या कुठल्याही विषयावर आपला माथा आपण फोडून मोकळं झाल्यासारखं करतो. नव्या bike किंवा mobile चे हट्ट असतात. केस कापले असोत वा नसोत, कपड्यांना इस्त्री असो किंवा नसो. सर्व काही fashion सदराखाली येतं. पावसाळी ट्रिप्स, कॅन्टीनवर पडीक असणे हा नित्यक्रम असतो. मग कधी चहासोबत झुरके कधी बुरखे. एक पेग वरून एक खम्ब्यापर्यंत कधी पोचलो कळतही नाही. त्यात काय एवढं असं. छे,सोपं तर आहे जगणं!! 'ही मोठी माणसं उगाच छोट्याछोट्या गोष्टींचा issue करतात'.. ' कुणी मला समजूनच घेत नाही ' हे ब्रीदवाक्य होऊन जातं. Degree झाली पार Masters पर्यंत. मग आपण husshhh म्हणून झोपून जातो.

तरुणपण

झोपेतून एक दिवस जाग येते आणि कळत आपण मोठे झालो, आपल्याला आपले पंख फुटले आहेत. आता आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, आता आपण आपलं वेगळं आकाश भरारू शकतो. सर्वसाधारण मध्यमवर्गीय वगैरे असलो तर नोकरीसाठी वणवण, स्वतःला prove केलंच पाहिजे हा ध्यास. नाहीतर पालकांचा ' तरी मी/ आम्ही सांगत होतो'..........इत्यादी ऐकून घ्यावा लागतं.अचानक 'रंग दे बसंती' मधला dialogue आठवतो, "कॉलेज दे गेट दे इस तराफ हम life को नाचाते है, तो दुसरी तराफ life हमे नाचाती है' याची प्रचीती येते. 'जर असे वागलो असतो तर???...' असे सारखे वाटू लागते. आपली आपली माणसे त्यांच्या त्यांच्या विश्वात रमू किंवा लढू लागतात. आणि 'काफिला साथ और सफर तनहा' हे कळू लागतं. जुनं सारं flashback सारखं तरळून जातं. सारा बालीशपणा संपून संघर्ष सुरु होतो. आपल्या वागण्या-बोलण्यात, तत्वात, विचारात बदल झालेला असतो. एक प्रकारची प्रगल्भता येते, आणि 'आयुष्य एवढं सोपं नाही,गड्या' याच आकलन होतं. आपल्या पालकांशी आपण जास्त relate करू शकतो पण ते त्याहून प्रगल्भ जगात तोवर पोचलेले असतात. सर्दी-पडसे झाले म्हणजे लहानपणी शाळेला दांड्या मारण्याची मजा नोकरीच्या काळात मात्र सजा वाटू लागते. आपण धकाधकीचं जीवन स्वीकारून पळू लागतो. कश्याच्या मागे हे न उमजता. छोटे छोटे आनंदाचे क्षण आपल्या धावेच्या झपाट्यात कधी निसटून जातात कळतही नाही. 'थोडा और चलेगा' यात भरच भर पडत राहते. 'हे' हवं, 'ते' हवं, ते हवं आणि तेही अशा काहीशा वेडाच्या गर्तेत आपण हरवून जातो.

आपल्या मुलांना ससा- कासवाची गोष्ट सांगण्यापेक्षा TV वर Doremon लावून देणं सोयीस्कर वाटतं. दमून घरी आल्यावर मुलांनी प्रेमाने मिठी मारली तरी नकोशी वाटू लागते. लहानपण ज्यांच्या कुशीत गेलं त्या आजी-आजोबांच्या, आई- बाबांच्या हातात हात घेवून गप्पा मरण सोडा, त्यांच्या खोलीत डोकावाण्याचाही भान राहत नाही. फक्त पळत राहणे या ससेमिर्यात आपण अडकून पडतो.

पण पण पण.. मनाची असीम इच्छाशक्ती आणि स्वतःवर दृढ विश्वास असेल तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो.आणि if you blame others, you give up your power to change. सुरवात करणे आपल्या हातात असतं. कारण जोपर्यंत तुम्ही दुसर्याला blame करणं सुरु करत नाही तोपर्यंत तुम्ही हरलेले नसता. असं आहे एकंदरीत तर ..

......... ..... ...........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालपण आणि तरुण वय या दोन टप्प्यातील 'वेडं वय' हा भाग मस्तच खुलविला आहे रमा यानी. विशेषतः कविता सुचायचे हे दिवस, त्यातही मुलींसाठी तर विशेष करून. चोरट कटाक्ष, बहाणे, ध्यास, ओढ, आशानिराशेचा खेळ, तो भावनेचा चढउतार....रुसवेफुगवे....आदी नाना सप्तरंगी प्रकार भोगण्याचे ते वेडं वय. खरंतर कुणावर चिडावे आणि कुणाच्या प्रेमात पडावे याबाबत सदैव मनी घोळ घालण्याची अवस्था या वेड्या वयातच प्राधान्याने उमटते....त्याचवेळी कॉलेजच्या विश्वातही पाऊल पडलेले असते...आणि तिथून सुरू होते ती 'मॅच्युरिटी' ची धारा...त्या धारेत केव्हातरी उमजून चुकते की अरेच्या आपण आता तरुण झालो आहोत. पंख फुटणे, त्याना बळ प्राप्त होणे....वडिलधार्‍यांनी प्रसंगी बोल लावले तर त्याना का ? असा प्रतिप्रश्न विचारण्याचे धाडस अंगी येणे....त्याबद्दल हुशारीही वाटणे....ही सारी तरुणपणाची लक्षणे.....रमा यानी तीही चांगलीच शब्दबद्ध केल्याचे दिसत्ये.

"...स्वतःवर दृढ विश्वास असेल तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो...." हे खरंय, पण आयुष्य निव्वळ अंगी विश्वास असून चालत नाही तर प्रसंगी येणार्‍या साहसाला तसे संधीला सामोरे जाण्यासाठी जे ज्ञान मिळविणे गरजेचे असते त्याची सुरुवात तारुण्यातील पहिल्या वर्षापासूनच केली तरच रमा चे वरील वाक्य सार्थपणे प्रत्यक्षात उतरू शकेल.

अशोक पाटील

बर मग?

सुरवात करणे आपल्या हातात असतं. कारण जोपर्यंत तुम्ही दुसर्याला blame करणं सुरु करत नाही तोपर्यंत तुम्ही हरलेले नसता.
>>>>
मस्त

चांगलं लिहिलंय - थोडक्यात घेतलेला जीवनाचा आढावा ....
पण .... सेकंड इनिंगचे काय ?? Happy तेही जाणून घ्यायला आवडेलच ....