चपला-बूट-पादत्राणे

Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:42

चपला, बूट, पादत्राणे, Shoes, Sandals, Chappal यांच्या नवीन फॅशनबद्दलचं हितगुज

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चपला, बूट लिहून परत पादत्राणे हा आणखी एक शब्द कशाला?

कि तो(पादत्राणे) एक वेगळा प्रकार आहे? हा मराठी शब्द तसा एकायला व बोलायला विचित्रच वाटतो.

मला इतरही पादत्राणे अपेक्षीत होती. उदा, मोजड्या, सँडल्स, पंप्स, चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची, खडावा, पादुका Happy

फॅशन मधे बसत नाही हा प्रश्न पण तरीही इथेच विचारते. पुण्यात चपला तयार करून मिळतात का ? पायाला भोवर्‍या असणार्‍या एकांना अशा हव्या आहेत.

कोणाला चांगल्या पादुका कुठे मिळतात ते माहीती आहे का? >>>>>>>>> चांगल्या ( टिकाउ ) कदाचित नसतीलही पण बांद्रा लिंकिन्ग ला जबराट स्टायलिश चपला असतात......मोजड्या, सँडल्स, पंप्स, चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची, खडावा, पादुका हे सर्व प्रकार मिळतील तिथे आणि रिझनेबल

>> चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची,
हे प्रकार काय आहेत कुणी सांगू शकेल का? वेब मास्तर हा अ‍ॅडमिनचा प्रकार आहे का? म्हणजे ते आता धागा उघडून गेले असतिल. नाहीतर त्यांनीच सांगितले असते.

>>मोजड्या, सँडल्स, पंप्स, चुक्का, क्रेपीज, गेता, जिप्सीन, वराची, खडावा, पादुका>> चुक्का, क्रेपीज्, गेता,जिप्सीन, वराची हे खेटरांचे प्रकार आहेत? गुगल करून बघायलाच हवं.
लिंकींगला मस्त व्हरायटी असते हे अगदी खरं आहे. यावेळी त्या बाजूला गेले असताना हातात वेळ असूनही आळस केला जायचा.

गेता मला लक्षात आलं नंतर. पण ते घालून चालणं आणि ते ही मुंबईतल्या रस्त्यांवर.. अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे लिकींगला ठेवूनही कोण घेत असेल काय माहित. पण वरच्या लिंक्सकरता धन्यवाद वेमा.

धन्यवाद वेमा Happy
वराचे आपल्या कोल्हापुरी चपलान्सारखे दिसत आहेत. आणि गेता खडावान्सारखे.
सायो मुम्बईत गेता.. खरच Happy आणि त्यातून घातल्याच तर जवळपास फ़िरणार्यान्चं काही खरं नाही.

सायो मुम्बईत गेता.. खरच स्मित आणि त्यातून घातल्याच तर जवळपास फ़िरणार्यान्चं काही खरं ना
गेता मला लक्षात आलं नंतर. पण ते घालून चालणं आणि ते ही मुंबईतल्या रस्त्यांवर.. अशक्य गोष्ट आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. इतकिही अशक्य नाही हं.....मी आता राहते ठाण्यात आणि मला कमीत कमी २ इंच हील्स ची सवय आहे.....ते घालुन मीच नव्हे तर कित्येक मुली ट्रेन ट्रॅवल करतात......एकदा घालायला सुरुवात केली की आपोआप ते जमुन जाते.....एंजॉय करायचं.......:)

अनिश्का दोन इंच हिल्स घातल्यावर तू अजून उंच दिसत असशीलना, मुळात तुझी हाईट दृष्ट लागावी अशी आहे.

अरारा हे गेता भयानक प्रक्रण दिसतंय... मी तर फ्लॅट मध्ये फ्लॅट होते.. हे गेता बिता घालून हिंडले... तर चार पायावरच बहुदा Proud

क्रेपीज मस्त!! पण पाय तसे मस्त मेंटेन्ड नाहीयेत... Sad

तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्यपूर्ण, उत्साहाची, यशाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.

मला नविन चप्पल घातली की पायाला फोड येतात. यावर कायमचा उपाय आहे का?
कितीही नरम चांगली घेतली तरी पायाला फोड येतोच त्यामुळे नविन चप्पलची भिती असते. पायाला फोड आल्यामुळे दुसरी जुनी चप्पल घातल्यावर त्रास होतोच. प्लिज उपाय सांगा?