इतक्या छोट्या आनंदांनी का हुरळावे

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2013 - 13:19

इतक्या छोट्या आनंदांनी का हुरळावे
मोठ्या आनंदाच्यासाठी कुठे वळावे

इतके रडायचे आहे पण वेळच नाही
माझे ट्रेलर म्हणुनी हे आकाश गळावे

तिच्या मनाचा थांग अन्यथा कसा कळावा
गळ्यातले होऊन तिचे मी...घरंगळावे

स्वतःपासुनी सुटका व्हावी यासाठी मी
कुणाबरोबर कशापासुनी दूर पळावे

प्रत्येकाला भेडसावते हीच समस्या
जितकी दाबावी इच्छा तितकीच बळावे

यासाठी जपतात शील सारे केव्हाचे
योग्य माणसाकडून हे चारित्र्य मळावे

बोली मर्‍हाटमोळी माझी कविता फार्सी
पुरून घ्यावे स्वतःस की निश्चिंत जळावे

कुस्करण्याच्या 'बेफिकीर' उपभोग वेदना
मृत्यूला पाहून तुझे आयुष्य चळावे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या छोट्या आनंदांनी का हुरळावे
मोठ्या आनंदाच्यासाठी कुठे वळावे

स्वतःपासुनी सुटका व्हावी यासाठी मी
कुणाबरोबर कशापासुनी दूर पळावे

प्रत्येकाला भेडसावते हीच समस्या
जितकी दाबावी इच्छा तितकीच बळावे

व्वा.

स्वतःपासुनी सुटका व्हावी यासाठी मी
कुणाबरोबर कशापासुनी दूर पळावे

प्रत्येकाला भेडसावते हीच समस्या
जितकी दाबावी इच्छा तितकीच बळावे

यासाठी जपतात शील सारे केव्हाचे
योग्य माणसाकडून हे चारित्र्य मळावे >>> भारीच!!! े

"स्वतःपासुनी सुटका व्हावी यासाठी मी
कुणाबरोबर कशापासुनी दूर पळावे

प्रत्येकाला भेडसावते हीच समस्या
जितकी दाबावी इच्छा तितकीच बळावे"

हे दोन शेर सर्वात विशेष..... मस्तच.

स्वतःपासुनी सुटका व्हावी यासाठी मी
कुणाबरोबर कशापासुनी दूर पळावे

प्रत्येकाला भेडसावते हीच समस्या
जितकी दाबावी इच्छा तितकीच बळावे

व्वा, शेर फार आवडले.

>>यासाठी जपतात शील सारे केव्हाचे
योग्य माणसाकडून हे चारित्र्य मळावे

बोली मर्‍हाटमोळी माझी कविता फार्सी
पुरून घ्यावे स्वतःस की निश्चिंत जळावे >>
हे सर्वात आवडले !कहर आहे.

तिच्या मनाचा थांग अन्यथा कसा कळावा
गळ्यातले होऊन तिचे मी...घरंगळावे

यासाठी जपतात शील सारे केव्हाचे
योग्य माणसाकडून हे चारित्र्य मळावे

<< हे दोन शेर बेहद आवडले.

_/\_