दिलिपसाब यांची प्रकृती स्थिर.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 September, 2013 - 07:34

अभिनय सम्राट दिलिपकुमार यांची प्रकृती स्थिर आहे..

फेसबुक वरील एका पेजची लिंक आणि नवी मुंबई येथील एका स्थानिक पत्रकाराकडून केलेल्या खात्रीनंतर मी दिलिपसाब निवर्तल्याची बातमी येथे दिली होती.

ही बातमी खोटी असून चुकीच्या बातमीसाठी मी दिलगीर आहे.

दिलिपसाब यांस उत्तम आयुरारोग्य लाभो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

...

कैलास, अजून नेटवर कुठेच बातम्यात आलेले नाहिये. काल अनुराग कश्यपने चुकीने ट्वीट केले होते की 'दिलीपसाब वारले'. पण त्याने लगेचच खुलासा करून ही बातमी चुकीची आहे असेही जाहीर केले.

http://www.bollywoodlife.com/news-gossip/dilip-kumar-dead-declares-anura...

.....

अरे दिलिप साहेब आहेत अजुन... त्यांची प्रकृती स्थिर आहे...
देव त्यांना दिर्घायुष्य देओ...

कृपया खात्री न करता असे बाफ उघडू नका...

आणि देव म्हणजे देव आनंद नव्हे... Happy

दादासाहेब फाळके पुरस्कार आणि निशान-ए-पाकिस्तान पुरस्कार प्राप्तकर्ते युसुफ खान म्हणजेच दिलीप कुमार यांच्या प्रकृतीला आराम पडो ही प्रार्थना.

अर्रर ... मीपण आधी खात्री केली नाही... एरवी सतत गुगलत असते काहीबाही... आज कसं काय आंधळ्यासारखी प्रतिक्रिया दिली... Sad

असो गुगलून बघीतल्यावर त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याची लिंक मिळाली. http://indiatoday.intoday.in/story/dilip-kumar-improving-still-in-icu/1/...

...

ही बातमी उडवता येइल का इथून ?? खुप सार्या लोकांचा गैरसमज होतो आहे .. >> +१ धागाकर्ते मुंबईत वैद्यकीय अधिकारी आहेत. कृपया ते खुलासा करतील का?

डॉ. धागा उडवला जात नाही तोपर्यंत संपादित करून शीर्षक आणि मजकुराच्या जागी टिंब द्याल का?

आता टीव्ही वर बातम्या पाहिल्या, त्यात दिलिपकुमार यांची प्रकृती सुधारते आहे असेच दाखवले आहे ..

दुसर्‍या बातमी मधे मन्ना डे यांची प्रकृती सुधारते असे सांगितले आहे

ट्रॅजेडी किंग, अभिनयाची शाळा असलेल्या दिलीपसाब उर्फ युसूफखान यांना लवकरच आराम पडू देत. हिंदी सिनेसृष्टीचं एक दैदीप्यमान युग असलेल्या त्रिमूर्ती मधला सर्वात तेजस्वी तारा !!!

Pages