"पत्र सांगते गूज मनीचे" : केदार जाधव

Submitted by केदार जाधव on 19 September, 2013 - 03:05

पत्र क्रं १ :

सच्या ,
आता तुला प्रिय सचिन लिहायला तू काही परका आहेस का ? लहानपणापासून तू आमच्यासाठी आमचा सच्या च .
आता हे पत्र बित्र काय काढलस म्हणून विचारशील म्हणून सांगतो , एकदा बाबा तू कधी रिटायर होणार आहे ते सांगून टाक म्हणजे सगळ्या कुजक्या कांद्यांचा आत्मा शांत होईल. आम्ही तरी कुणा कुणाशी भांडायच रे.
पण यार , तुझ्यासाठी भांडायलाही मजा येते रे . असेही आधी सचिनपे़क्षा लारा भारी , मग सचिनपे़क्षा पाँटींग भारी , मग सचिनपे़क्षा धोनी भारी अस म्हणणारी लोक होतीच रे , पण "भारी"पणा मोजण्याच एकक तू होतास आणी असशील . धोनी द्रविडपे़क्षा भारी होता म्हणत काय कुणी ?
मग सचिन फायनल मधे खेळतच नाही काय , तो खेळल्यावर भारत हारतोच काय , अनेक मुद्दे झाले . त्याची उत्तरही पाठ होती, मग आम्ही आकडेवारी तोंडावर मारली की गप्प बसायचे . तसही तुझा टीकाकार होण सोप काम नाही रे Happy Endulkar लिहिणार्या टाइम्स ऑफ इंडियाला नंतर तुझी तोंड फाटे पर्यंत स्तुती करण भाग पाडलस ना तू ?
पण आता हे तुझ्या रिटायरमेंटच नवीनच खूळ निघालय . ज्याला किकेट मधे किती खेळाडू असतात तेही माहित नाही त्यालाही सचिन रिटायर व्हायला हवा आहे . तेही का म्हणे तर नवीन लोकाना संधी मिळत नाही . बाबानो किती लोक स्वतःची नोकरी सोडून तरूण उमेदवाराना देताय ? पण हे कोण विचारणार ? जोवर तू पूर्ण क्षमतेन खेळतोयस तोवर बोलणारे इतर कोण ?
पण खर सांगू , आता तुझ्यात पण तो सच्या नाही राहिलाय रे . आपण तर रोज तुला शून्यावर आऊट होताना बघायला तयार आहे , पण तुझ्या इमेजची काळजी वाटतेय रे .
बाकी निर्णय काय घ्यायचा हे तुलाच माहित आहे रे .

फॅन म्हणजे काय हे कळत नसल्यापासूनचा तुझा फॅन ,
केदार

==================================

पत्र क्रं २ :

प्रिय केदार ,
तुझे पत्र मिळाले . वाचून आनंद वाटला . अरे तुमच्यासारख्यांच्या प्रेमानच मी इथपर्यंत आलोय रे .
तुमच्या सारखे लोक असताना मला टीकाकारांची पर्वा नाही . मीडियाच म्हणशील तर त्याना २४ तास चालू रहायला काहीतरी लागत रे . आणी बोलणार्याच तोंड बंद करता येत नाही ना ?
रिटायरमेंटच म्हणशील तर थोड मलाही समजून घे . आयुष्याभर मी फक्त हेच केलय . आणी आता अचानक सोडवत नाही रे . क्रिकेट सोडल तर काय करायच हा प्रश्नच मला वेदना देतो . तरीही मी प्रयत्न करतोय . आता फक्त कसोटीच खेळतोय . लवकरच तेही सोडेन .
ते जाऊ दे. तुझ माझ्यावरच प्रेम असच ठेव . कारण तूही मला परका नाहीस.

तुझा मित्र ,
सच्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग रिया ,
हे असच आत्ताच कॅंटीनमधल्या चर्चेवरून सुचल म्हणून १५-२० मिनिटात लिहिलय Happy

आपण या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
पण स्पर्धेच्या नियमानुसार दिलेल्या वेळेत प्रवेशिका न आल्याने स्पर्धेसाठी ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.