चांदण्यासाठी

Submitted by सचिनकिनरे on 18 September, 2013 - 14:32

विचार भरकट्ण्यासाठी,
आचार न आचरण्यासाठी,
दिलासा तुझ्या आठवणीचा,
सोबतीला घेण्यासाठी.

असेच धावत जाते मन
चंद्रकलेच्या पाठी,
चंद्रकलेला स्पर्शुन
अथांग कोसळण्यासाठी

जाते सागरा भेटाया,
तुझ्यात सामावण्यासाठी,
गाजेत, फेसात, स्पर्शात,
वाळूचे मुठीतून निसटण्यासाठी.

आता नाही भरकटत,
आता कोसळतही नाही,
कधी पापण्या ओलावतात,
तू क्षण सांडलेल्या चांदण्यासाठी...

सचिन किनरे १८-०९-२०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users