एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल्परवाचे एपिसोड मस्त झाले. काकूचा भोचकपणा पाहून अनेक नातेवाईकांची आठवण आली. Proud

मराठी "कमझोर कडी कौन?" चालू केलं तर काकूला होस्ट करा.बरोबार त्या धनाला पकडून बोलत होती.

त्या घरात एकही फ्यामिली फोटो नाहीये. अरेच्या त्यात काय?आमच्या घरात पण एकही फ्यामिली फोटो नाही. घरात फोटो लावण्याची फ्याशन जुनी झाली Happy

काकूचा भोचकपणा पाहून 'अनेक' नातेवाईकांची आठवण झाली>>>> हो, मै भी येईच सोच रही थी काकू को देखके.....
@सुजा....येस्स.. आमच्याही कडे ही फ्याशन नाही फोटू लावायची....पण काही लोकांना असते आवड भिंती भरभरून फोटू लावायची(नो ऑफेन्स इन्टेन्डेड)....फ्यामिली फोटू, झालंच तर मुलांचे जन्मल्यादिवसापासून दर ६महिने-वर्षाचे वगैरे....इकडे ऊसगावात खूप फॅड आहे.

रच्याकने....भोचक काकूंनी अचूक निरीक्षण करून मोहन आगाशेंना उ.का.च्या लुटुपुटीच्या फ्यामिलीचं अस्सल फाकडो वर्णन सांगितलं....मजा आली....

भोचक काकूंनी अचूक निरीक्षण करून मोहन आगाशेंना उ.का.च्या लुटुपुटीच्या फ्यामिलीचं अस्सल फाकडो वर्णन सांगितलं...]+१
तो nervousness होता, कोणी काँफिडंट नव्हतं वागताना, जयेश गावरान भाषेत बोलत होता, घरातल्या बाईला घरातल्या वस्तू कुठे ठेवल्यात माहीत नाही, इशाला सगळी माहिती यांच्या घरातली... काकुने बरोबर निरिक्ष्ण केलं.

काकू जामचं भोचक बुवा... तिने शिक्षिका होण्यापेक्षा गुप्तहेर व्हायला हव होतं... मग त्या इथल्याऐवजी 'अस्मिता' मध्ये दिसल्या असत्या आपल्याला.. [ पण मी ता मालिका पहात नाही, त्यामुळे ताप वाचला असता डोक्याचा Happy ]
btw नंतर त्या शुभांगी गोखलेने बरोब्बर मारला टोमणा.. 'असतात काही काही जण खोचक आणि भोचक' Proud

<< काकूचा भोचकपणा पाहून 'अनेक' नातेवाईकांची आठवण झाली>>>> घरातल्या मुलीच्या लग्नाबाबत संशयास्पद गोष्टींची मुद्दाम चौकशी करायला गेल्यावर भोळसटपणा न करतां भोचकपणा दाखवणार्‍या अशा नातेवाईकांचं खरं तर कौतुकच करायला हवं ! Wink
मोठे बाबांबरोबरचं दोन्ही सूनांचं पुणे भेटीचं रिपोर्टींग सोडलं तर बाकी कालचा एपिसोड पाणी घालून वाढवण्याचाच प्रकार होता [ उदा. काकेने ऑडिशनमधे अडकलेल्या ओमच्या बहिणीला काल फोन लावायचं प्रयोजन ? ] !

काकू बेस्ट आहे. सजग आहे. नाहीतर इशाची आई बिचारी सहज गुंडाळली जाते. त्या दोघींच्या एकाच गोष्टीला असलेल्या अनुक्रमे भोचक आणि भाबड्या रिअ‍ॅक्शन्स मस्तच Happy
शोभनालाही मस्त संवाद दिले आहेत. वरवर भोळी वाटते ती, पण सावरून घेणारी आणि टोमणे परतवून लावणारी..

काकू बेस्ट आहे. सजग आहे. नाहीतर इशाची आई बिचारी सहज गुंडाळली जाते. त्या दोघींच्या एकाच गोष्टीला असलेल्या अनुक्रमे भोचक आणि भाबड्या रिअ‍ॅक्शन्स मस्तच >>

आणी मोहन आगाशेंचे काम मस्त. थोडकेच असते पण एकदम संतुलीत.

उमेश कामत सकट सर्व जण गडबड गोधळाची सुरेख अँक्टींग करतात.

.

शिल्पा तुळसकरचा आवाज होता ओमच्या आईचा>> हो?
मी ओळखला नाही. दोन वाक्यात तुम्हाला आवाज ओळखता आला? भारी!
पण शिल्पा तुळसकर ओमची आई असेल तर मग जर्रासा अपेक्षाभंग झाला माझा. ती एकदम गोड, साधी आहे. नवर्‍याशी पटलं नाही म्हणून मुलाची कोणतीच जबाबदारी न घेतलेली आई वाटत नाही Happy अर्थात, सगळा अभिनयच असतो. ती हे काम छान करेलही कदाचित.
ओमची रीअ‍ॅक्शन- राँग नंबर- पाहून मात्र वाईट वाटलं Sad

मला पडलेला एक प्रश्न! ओमच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर ओम दोघांपासुन वेगळा रहात आहे. मग त्याच्या आईला त्याचा घराचा आणि मोबाईल नंबर सुद्धा! कसा मिळाला?

म्हणजे शितू इज टू स्वीट टू से राँग नंबर टू हर ऑन फोन स्मित>> हो, पण ती तिथे आई आहे ना त्याची, जी त्याला सोडून हिंडते आहे. शितु नाही Happy

मग त्याच्या आईला त्याचा घराचा आणि मोबाईल नंबर सुद्धा! कसा मिळाला?>> तेचकी. घराचा असू शकेल, कारण त्यांचंच घर असतं ना ते? तिथेच एकेकाळी रहात असतात ते. मोबाईल नंबरचं मात्र कळलं नाही. आजीने दिला होता का कधीतरी?

ओम म्हणाला होता की त्याचे आईवडील त्याला फक्त वाढदिवसाला फोन करतात म्हणजे त्यांच्याकडे ओमचा नंबर असणार.

त्याने नविन नंबर नाहि... मोबाइल घेतला आहे नविन .... नंबर तोच असनार ना.... लॉजिक Wink

मला मीना नाईकचा आवाज वाटला तो.>> हां. मीना नाईक फिट्ट बसतील त्या रोलमध्ये Happy

केवळ दोन वाक्यात मी काही आवाज ओळखू शकले नाहीये. ज्यांनी ओळखलाय त्यांना _/\_

Pages