फ्रुटी पोलेन्टो--गोड--सुलेखा.

Submitted by सुलेखा on 17 September, 2013 - 05:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मुख्य पदार्थ :-
मका पिठ --१ वाटी .[सपाट भरुन घ्यावी .]
कॉर्न फ्लोअर --१/२ वाटी.
चीज --२ लहान क्युब.
फळे --१ किवी फ्रुट आणि अर्धे सफरचंद .

उप-पदार्थ :-
साखर : ३ टेबलस्पून.
लोणी :--१ टेबलस्पून .
दालचिनी पूड :--१ टी स्पून.
काजु :--१० ते १२ नग.
sweet fruti polento 005.JPG

क्रमवार पाककृती: 

१] मका पिठ मायक्रोवेव्ह मधे ३० सेकंद -फुल पॉवर- वर ठेवुन थोडेसे भाजुन घ्या.
[मायक्रोवेव्ह नसल्यास ,कढईत हे पिठ हाताला गरम लागेल इतपत परतुन घ्या .]
२]एक किवी व अर्ध्या सफरचंदाची साले काढुन अगदी बारीक फोडी चिरुन घ्या.
३]एका कढईत एक टेबलस्पून साखरेचे कॅरेमल --बिन पाण्याचा पाक- तयार करा त्यात काजु घालुन परता.एका लहान प्लेट ला तूप लावुन त्यात मध्ये हे मिश्रण काढुन घ्या.थंड झाल्यावर या काजुचे भाजी कापायच्या कात्रीने किंवा हाताने लहान-लहान तुकडे करा.
४]त्याच कढईत आणखी २ टेबलस्पून साखरेचे कॅरेमल तयार करा.कॅरेमल मध्ये किवी-सफरचंदाचे तुकडे घाला व परता.फळांना थोडेसे पाणी सुटल्याने मिश्रण थोडेसे पातळ होईल. दालचिनी पूड घाला .चमच्याने सतत ढवळा.मिश्रण घट्ट झाले कि गॅस बंद करा्ए मिश्रण एका बाउल मध्ये काढुन घ्या.त्यात काजु तुकडे मिक्स करा.

हे आहे कॅरेमलाइज काजु व फळांचेमिश्रण :-
sweet fruti polento 009.JPG

५]एका जाड प्लास्टीक शीट ला बटर /तूपाचा हात लावुन कोटींग करुन घ्या.
६]एका पातेलीत २ वाट्या पाणी गरम करा. एका कढई गॅसवर तापायला ठेवा . कढई गरम झाली कि त्यात पातेलीतील १ १/२ वाटी पाणी ओता. पाणी उकळु लागले कि त्यात १ टेबलस्पून बटर घाला .लगेच भाजलेले मका पिठ थोडे थोडे टाकत एका चमच्याने सतत ढवळत रहा .त्यानंतर कॉर्न फ्लोअर टाकुन तेही छान ढवळा.गॅस बंद करुन किसलेले चीज घालुन मिश्रण व्यवस्थित ढवळुन घ्या.मिश्रणाचा मऊसर गोळा तयार होईल.
७]प्लास्टीक शीट वर हा गोळा ठेवुन लाटण्याने लाटुन घ्या.एक मोठा चौकोनी आकार -पराठा इतपत जाड---लाटा.करंजीच्या कातण्याने किंवा सुरीने चौकोनी पोलेन्टो [वड्या] कापा.

पोलेन्टो :--
sweet fruti polento 011.JPG

८]एका नॉन-स्टीक पॅन गॅसवर गरम करुन मंद आचेवर त्यामधे १/२-१/२ टी स्पून बटर घालुन सगळे पोलेन्टो खरपुस भाजुन घ्या.
९] या खरपुस भाजलेल्या पोलेन्टो वर १-१ टी स्पून फ्रुटी कॅरेमल पसरा.
१०] प्लेट मधे सर्व करताना ,.एका पोलेन्टोवर फ्रुटी कॅरेमल पसरुन त्यावर दुसरा पोलेन्टो ठेवावा.किंवा एकेरी पोलेन्टो वर फ्रुटी कॅरेमल पसरुन ही सर्व करता येईल.

sweet fruti polento 015.JPG

असे हे खरपूस "स्वीट फ्रुटी पोलेन्टो " तयार आहेंत.

अधिक टिपा: 

१] मकापिठ बोटशेके भाजुन घेतल्याने पिठातील कच्चे पणा जातो.त्यात कॉर्न फ्लोअर घातल्याने उकडलेल्या पिठाची पोळी छान लाटता येते.
२]या उकडीत चीज किसुन घातल्याने पोलेन्टो ला खूप छान चव येते.
सफरचंद गोड व किवी आंबट गोड असल्याने दोन्हीची चव मिळुन येते.२ टेबलस्पून साखरेचे कॅरेमल पुरते. कॅरेमल मधे काजु घातल्याने ते क्रिस्पी होतात.
३]आंतरजालावर पोलेन्टो म्हणजे मक्याचा जाड रवा असे लिहीले व प्रत्यक्ष पाककृती मध्ये दाखवले आहे.त्यामुळे आपल्याकडे मिळणारे मका पिठ व कॉर्न फ्लोअर वापरुन त्याची चीज मिश्रीत उकड काढुन पोळी लाटुन बटरवर खरपुस भाजण्याचा विचार केला .

माहितीचा स्रोत: 
आंतरजालावर पोलेन्टो ची उकड पाहिली.बाकी स्व-प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी,
आधी मका पिठ कोरडेच ३० सेकंद मावे.त भाजुन घ्यायचे आहे.तळहाताला गरम लागेल इतपत.त्यामुळे पिठाचा कच्चेपणा जातो व पिठ मोकळे /हरवाळ होते.उकड काढल्यावर चौकोनी तुकडे कापुन ते फ्राय पॅन मध्ये प्रत्येक वेळी १/२ -१/२ टी स्पून बटर वर खरपुस भाजुन घ्यायचे आहेंत.त्यामुळे " गिच्च " लागत नाही पण खुटखुटीत होतात आणि त्यात चीज ची चव ही जाणवते.तसेच खायलाही छान लागतात.मी ६, ७ व ८ क्रमांकावर हे सविस्तर लिहीले आहे..
कल्पना आवडल्याबद्दल धन्यवाद!!

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

Pages