(स्वीट कॉर्न) २ कणसे: किसून व दीड मिनिट मायक्रोवेव्ह करून, १ मोठा बटाटा: उकडून मॅश करून, पनीर :किसून अर्धी/पाऊण वाटी होईल इतका तुकडा, २ चीज क्यूब्ज्स कुस्करून, कोथिंबीर बारीक चिरून, ३/४ हिरव्या मिरच्या बारीक वाटून, १ चमचा कॉर्न फ्लॉवर, अर्धी वाटी ब्रेड क्रम्स, २ तुकडे चीज किसून, थोडे मटार दाणे आणि कणसाचे दाणे १ मिनिट मायक्रोवेव्ह करून ठेवलेले, शॅलो फ्राइंग साठी तेल, चवीपुरते मीठ.
मसाले: आमचूर पावडर व मिरेपूड प्रत्येकी पाव चमचा. चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड हे सर्व अर्धा चमचा प्रत्येकी.
२ कणसं(स्वीट कॉर्न) किसून घ्यावीत. त्याचा कीस दीड मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करून घ्यावा. म्हणजे तो शिजेल व आळेल.
एक मोठा बटाटा उकडून मॅश करून घ्यावा.
पनीर किसून घ्यावं. साधारण अर्धी पाऊण वाटी कीस असावा.
भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
४ हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्या.
आता कणसाचा मायक्रोवेव्ह केलेला कीस, पनीरचा कीस, कुस्करलेले २ चीज क्यूब्ज्स, चिरलेली कोथिंबीर, मिरचीचं वाटण, आमचूर व मिरेपूड प्रत्येकी पाव चमचा, धणेपूड, जिरेपूड, चाटमसाला प्रत्येकी अर्धा चमचा, चवीपुरते मीठ, १ चमचा कॉनफॉवर, पाव वाटी ब्रेड क्रम्स, १ मिनिट मायक्रोवेव्ह केलेले मटारदाणे व कणसाचे दाणे प्रत्येकी १ चमचा हे सगळं छान मिक्स करा.
नंतर याचे चपटे गोळे करा. ते गोळे ब्रेड क्रम्समध्ये घोळवा. त्याच्या एका बाजूला सजावटीसाठी दोन हिरवे मटार दाणे, व त्याखाली मधोमध एक कणसाचा दाणा लावा.
फ्राय पॅनमधे अर्धा चमचा तेल सोडून हे कटलेट्स शॅलो फ्राय करा.
आणि सॉसबरोबर मटकवा!
आतून सॉफ्ट आणि वरून ब्रेडक्रम्समुळे मस्त क्रिस्पी असे हे कटलेट्स.
त्यात आत मटार दाणे आणि कणसाचे दाणे घातल्यामुळे कटलेट्स खाताना ते दाताखाली येतात आणि चव वाढते!
यात कांदा लसूण नसल्याने थोडी वेगळी आणि छान सौम्य चव लागते.
मी हे करुन बघणार ते दोन मटार
मी हे करुन बघणार
ते दोन मटार दोन डोळ्यांसारखे दिसतायेत
लहान मुलं कित्ती आवडीने खातील
हे ते चेहरे मस्तच. छान प्रकार
हे ते चेहरे मस्तच. छान प्रकार आहे.
कटलेट्चे चेहरे मस्तच..
कटलेट्चे चेहरे मस्तच..
मस्तच
मस्तच
स्मायली कटलेट्स मस्त दिसत
स्मायली कटलेट्स मस्त दिसत आहेत.
रेसेपी सोप्पी (कमी कटकटीची) वाटतेय, करुन बघणार.
छान दिसताहेत स्माईली कटलेट
छान दिसताहेत स्माईली कटलेट
खुपच छान आहेत गं कटलेट्स...
खुपच छान आहेत गं कटलेट्स... खालच्या मक्याच्या दाण्याच्या जागी काजु पाकळी आडवी लावली तर पर्फेक्टच स्माईली होईल. बेसनाच्या लाडवांना लावते मी तशी. वरती दोन बेदाणे आणि खाली काजु पाकळी. लाडू हसरे दिसतात. तशीच ही पण हसरी कटलेट्स होतील
एक मस्त प्रकार..
एक मस्त प्रकार..
हा हे करून बघायला हरकत नाही.
हा हे करून बघायला हरकत नाही. एरवी कटलेट करतो त्यात फक्त पनीरची अॅडीशन आहे
चांगली दिसतायत.
चांगली दिसतायत.
वा, लगेच खावेसे वाटताहेत!
वा, लगेच खावेसे वाटताहेत!
वा वा! तोंपासू ..
वा वा! तोंपासू ..
सुंदर.. लगेच खावीशी वाटताहेत.
सुंदर.. लगेच खावीशी वाटताहेत.
व्वा... मस्तच दिसतायत. खरच
व्वा... मस्तच दिसतायत. खरच बाहेरून क्रिस्पी... आतून मऊ असणार.
मस्त!!! हेल्दी आणि चविष्ट
मस्त!!! हेल्दी आणि चविष्ट बनवलत. हे आवडल.
मस्त दिसताहेत. नेहमीचे कटलेट
मस्त दिसताहेत. नेहमीचे कटलेट आवडतात. पनीरही आवडते. दोन्हीचा कोंम्बो . मस्तच.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383