झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे (विडंबन)

Submitted by लतांकुर on 13 September, 2013 - 08:16

<strong></strong><STRONG>मंगेश पाडगावकरांची माफी मागून </STRONG>

झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे
ओळखून आहेत सारे , presenty साठी तुझे फक्त येणे

भर दुपारी लेक्चर ला, पेंग तुला का यावा
लागताच डोळा तुझा, प्रश्न नेमका तुलाच विचारावा
तुझ्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी तुझ्याशी असा दगा का करावा

तुझ्या निर्भत्सनेचा अर्थही तुला न उमगावा
फेकलेल्या खडूचा नेमही चुकावा
झोपेतल्या बरळण्याला तुझ्या, कोणी आपला अपमान का समजावा

घेता छोटी डुलकी तू, अचानक यावा मोठा वारा
अन जागी होऊन तू, करावास कुठे आहे मी चा देखावा
अन वर्ग सारा हास्य कल्लोळात बुडावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users