मी आणि माबो

Submitted by मुग्धटली on 13 September, 2013 - 03:58

मित्रहो!

आज मी माझ्या मनातल तुम्हाला सांगाव या विचाराने लेखन करत आहे. तस ललित वगैरे लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.

मी साधारण तीन वर्षांपूर्वी मायबोली.कॉमची सभासद झाले. मला वाचायची प्रचंड आवड. एकदा ऑफिसमध्ये कामाचा लोड फारसा नसल्याने माझ्यातल्या वाचनाच्या आवडीने उचल खाल्ली. आधी मेलबॉक्समधल्या जुन्या मेल्स वाचल्या पण ते सगळ आधिच वाचुन झाल्याने मन रमलं नाहि. मग सहज म्हणुन नेटवर गेले आणि एक सर्च दिला "nice articles to read". आलेल्या सर्च रिझल्टमध्ये एक लिंक दिसली "मी केलेला वेंधळेपणा" Happy विषय जरा वेगळा वाटला म्हणुन लिंक ओपन केली आणि काय सांगु महाराजा इथले एक एक किस्से वाचताना अगदी वेड लागायची पाळी आली. ऑफिसमध्ये असल्याने जोरजोरात हसता पण येत नव्हतं, पण सगळे किस्से अगदी धम्माल होते. ही होती माझी आणि माबोची पहिली ओळख!

नंतर यथावकाश मी माबोची सदस्य झाले आणि अगदी न चुकता रोज इथे भेट देत गेले. माबोवरच्या अनेक ग्रुप्सची मी सभासदही झाले. वेंधळेपणाच्या धाग्यावर स्वतःचे वेंपणेही लिहुन झालेत माझे! हळु हळु इतर धाग्यांवरच लिखाणही वाचु लागले. आधि थोड घाबरत पण नंतर अगदी बिनधास्तपणे प्रतिसाद देउ लागले. मायबोलीवर नवीन चेहरासुद्धा माहित नसलेले पण आपल्या खस लिखाणाच्या शैलीने नवीन मित्रमैत्रिणी भेटले. दक्षिणा, स्वप्ना_राज, अश्विनीमामी आदिंनी तर सगळ्याच विषयांच्या धाग्यांवर पोट धरुन हसायला लावल, अजुनही लावत आहेत आणि त्यांनी असच कराव अशी प्रमाणिक ईच्छा आहे. त्यातल्या त्यात उपग्रह वाहिन्यांच्या धाग्यावर स्वप्नाने!

मायबोलीवर वारंवार भेट देताना एक लक्षात आलं की इथला सर्वच वाचक वर्ग एका सुसंस्कृत घरातुन आणि उत्तम विचारांची जडण घडण घेउन आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या उच्छृंखलपणाला आणि थिल्लरबाजीला इथे स्थान नाही. माझी सगळ्या प्रकारच्या वाचनाची हौस इथे भागली जाते, अगदी गुढकथा ते विनोदी लेखन. अनेक विषयांवर माहितीसुद्धा खूप सुंदर मिळते. चालु घडामोडिंपासुन देवदेव, रितीभती ते अगदी मालिकांपर्यंत सगळ्याच विषयांवर लिहिले जाते. येथिल सर्व धाग्यांवरील प्रतिसादाने मला प्रत्येक गोष्टिंकडे बघण्याची एक वेगळी द्रुष्टि दिली आहे.

अजुन खूप काही मनात आहे पण शब्दात मांडता येत नाहिये, पण जेव्हा जमेल तेव्हा नक्की लिहिन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मला वाचायची प्रचंड आवड. आधी मेलबॉक्समधल्या जुन्या मेल्स वाचल्या पण ते सगळ आधिच वाचुन झाल्याने मन रमलं नाहि."

आपल्या वाचनवेडाचं आणि व्यासंगाचं कौतुक वाटतं, आयशप्पत!

छान लिहिलेय मुग्धा, गणेशोत्सवातच माबोचाही वाढदिवस येतो, त्या मुहुर्तावर सर्वांच्याच भावना शब्दबद्ध केल्यास.

मुग्धा.रानडे | 13 September, 2013 - 04:05
बेफी, तुम्ही मला कधी बघितलत? माबोवर तर मी फोटो टाकले नाहीयेत?

>> अग तुझे प्रोफाइल पिच्चर आहे ना माधुरीचे!

ती तिच आहे. मला तिचा हा फोटो खूप आवडतो आणि ती पण खूप आवडते, माझ्या दोन्ही घरी(सासरी आणि माहेरी) स्वतंत्र खोली वगैरे कॉन्सेप्ट नाहियेत आणि दोन्ही घरी आवडत्या व्यक्तींचे फोटो वगैरे लावण प्रकार पटेबल नाहियेत. पण जर भविष्यात माझी स्वतंत्र खोली मला मिळाली ना तर ह्या फोटोच मोठ्ठ पोस्टर मी नक्की लावणार आहे.