Submitted by निशिकांत on 13 September, 2013 - 00:58
कैक उसासे मनी कोंडले ओघळणारे
शांत चेहर्याआड दडवली वादळवारे
बेफिकिरीने हत्ती चाले चाल आपुली
जीव तोडुनी विरोधात का देता नारे?
इंद्रपुरीच्या चौकाचौकामधे भेटले
राजघराण्याचेच नगारे वाजवणारे
आश्रमातही सखा राहिला राम न आता
स्त्रियांभोवती गिधाड असते भिरभिरणारे
दरबाराला नवरत्नांचा रुतबा होता
अता राहिले लबाड मंत्री बडबडणारे
कवचकुंडले स्त्रीस लाभता वार्धक्याची
नराधमांचे भय ना उरते थरथरणारे
जीवन आहे जुगार मोठा, अंतक्षणाला
असेल कोणी का गंगाजल पाजवणारे?
शब्द वेचुनी भावपूर्ण लिहिल्या गझलांना
हवे आपुले चाल लावुनी गुणगुणणारे
"निशिकांता"ला सख्या विठ्ठलाच्या चरणावर
शीष ठेवता अनुभव आले सुखावणारे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'दडवले' वादळवारे असे करा
'दडवले' वादळवारे असे करा निशिकांतजी.
जीवन आहे जुगार मोठा,
जीवन आहे जुगार मोठा, अंतक्षणाला
असेल कोणी का गंगाजल पाजवणारे? >>>> मस्त....
कवचकुंडले स्त्रीस लाभता
कवचकुंडले स्त्रीस लाभता वार्धक्याची
नराधमांचे भय ना उरते थरथरणारे
>>
अगदी!
कवचकुंडले स्त्रीस लाभता
कवचकुंडले स्त्रीस लाभता वार्धक्याची
नराधमांचे भय ना उरते थरथरणारे>>>
>>
अगदी!
नक्की का?
माणूस ह्याच्यापेक्षाही खालच्या थराला गेलेला आहे असे वाटते.
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
विदीपा, अॅग्री
विदीपा, अॅग्री
त्या शेराबाबत कणखरजींशी सहमत
त्या शेराबाबत कणखरजींशी सहमत
मतल्यात दडवले असे हवे बहुधा टायपो असावा
गुणगुणणारे चा शेर छान पण अजून छान व्ह्यायला पाहिजे होता -वैम
हत्ती << मीही एकदा एका शेरातहत्ती वापरला होता पण शेर सपशेल विसरलो आहे आता पण असा विचार अजून लक्षात आहे की हा हती हा शब्द एकूणच गझलेत तितकासा छान वाटत नाही मला त्यात गझलेचा भाव कधी आढळत नाही मला............. मुहावरा छान वापरलात पण
असेल कोणी का गंगाजल पाजवणारे?<<< नको कका असले अभद्र विचार नका करू !!!
मक्ता नेहमीप्रमाणे छानच दुसरी ओळ मनापासून पटली
दरबाराला नवरत्नांचा रुतबा होता
अता राहिले लबाड मंत्री बडबडणारे<<< हा सर्वाधिक उत्तम वाटला
कवचकुंडले स्त्रीस लाभता
कवचकुंडले स्त्रीस लाभता वार्धक्याची
नराधमांचे भय ना उरते थरथरणारे<<< अप्रतिम!
काय जोडा मारला आहे नराधमांना! अर्थात, याहीपेक्षा खालच्या थराला माणूस गेला आहे हेही पटतेच दुर्दैवाने
गुणगुणणारे हा शेरही विशेष आहे.
छानच गझल!