साकडे

Submitted by राजेंद्र देवी on 12 September, 2013 - 04:09

साकडे

एकीचे केस काळे कुरळे
एकीचे लांबसडक मोकळे
एकीचे हास्य निरागस
तर एकीचे मनमोकळे

एकीचा रंग गव्हाळी
एकीचा रंग सोनसळी
एक बोलता घंटा किणकिणते
एकीचे बोल अबोल प्रीती

कोणती निवडू हा प्रश्न पडे
देवाला घातले मी साकडे
थोडा विचार करून त्याने
बोट दाविले तुझ्याकडे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users