घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 05:11

बाप्पा मोरया!! Happy

सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!

घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या. Happy

मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.

image 289.jpg
प्रकाशचित्र सौजन्य: यो रॉक्स

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१३.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य मुर्ती मस्तच !! सुरेख झाली आहे अगदी..
हिम्या आजोबांचे सुलेखन भारी..
बाकीही सगळ्यांचे गणपती आणि सजावटी छान.. !!

यंदा मी पण मुर्ती बनवायचा प्रयत्न केला.. मी इको फ्रेंडली गणपती बनवायच्या वर्कशॉपमध्ये जाऊन बनवली.. त्यामुळे नीट मार्गदर्शन मिळाले.. कोणाला इंटरेस्ट असेल तर ऑनलाईन कोर्सही आहे..

ही रंगवण्याआधी तयार मुर्ती
Bappa_During Preparation.jpg

ही रंगवून झाल्यावर.
Bappa_Rerady.jpg

आरास आणि पुजा झाल्यावर...
Decoataion.jpg

गणपती बाप्पा मोरया !!

वा वा... सुंदर आरास. सगळ्यांच्याच घरचे बाप्पा किती आनंदात, सुखात दिसतायत. थर्माकॉलशिवाय आरास करण्याबद्दल संपदा अभिनंदन.
चैतन्य... घरी केलेली मूर्ती? क्या बात है.
मोरया मोरया मोsssरया.

चैतन्य, पराग स्वहस्ते घडविलेली मुर्ती फारच छान आहे. वेगळेच समाधान वाटते. सगळ्यांचे बाप्पा आणि सजावट सुरेख.

खालील मुर्ती माझे अजमान (दुबई) मधील सहकारी गणेशभक्त श्री. जगन राव यांनी घडविली आहे. फळांची वेगळीच आरास पाहण्यात आली. कदाचित आंध्रप्रदेशात अशी पद्धत असावी. शेवटी श्रध्दा महत्वाची. देवा हो देवा गणपती देवा .... तुमसे बढकर कौन ....

jagan ganpati 4.jpgjagan ganpati 5.jpg

फळांची वेगळीच आरास पाहण्यात आली. कदाचित आंध्रप्रदेशात अशी पद्धत असावी.>>> हो. आंध्रात असे फळांचे छत घालतात. Happy

सगळ्यांचे गणपती बाप्पा आणि सजावट मस्त आहेत.अगदी प्रसन्न फोटो आहेत.
चैतन्य,पराग मूर्ती छान झाल्या आहेत.परागने त्याच्या पोस्टमध्ये जे वर्कशॉप लिहिले आहे ते मी ऑनलाईन अटेंड केले.
गेले २ वर्षे गणपती घरीच तयार करत होते पण ह्या वर्कशॉपने खूपच छान मार्गदर्शन मिळाले.गेल्या २ वर्षांपेक्षा बरीच सुधारणा झाली.
हे आमचे बाप्पा.
533230_10151840450279570_1006848830_n.jpg1234664_10151840450344570_1942561233_n_0.jpg

आमच्या ५ वर्षाच्या मुलाला त्याच्या गाड्या आणि विमाने ह्यांची आरास करायची होती म्हणून हा देखावा तयार केला.
अगदी कमीत कमी खर्च करुन बाकी सगळ्या घरातल्याच वस्तू वापरुन सजावट केली आहे.

1186855_10151840450159570_1647393580_n.jpg

स्वतः बनवलेले सगळ्यांचे गणपति मस्त दिसत आहेत. त्यासाठी स्पेशल कौतुक करायलाच हवे.
हा आम्च्या घरचा बाप्पा.
Ganapati2013.jpg

आणि हा क्लोज अप
GanapatiCloseup2013.jpg

सगळ्यांना धन्यवाद Happy
शूम्पी,नैवेद्य भारी दिसतोय.पेढे आहेत कि लाडू?

सगळ्यांचे बाप्पा मस्त.
घरि बनवलेले सगळे बाप्पा एकदम मस्त. पुढच्या वेळि घरि बनवलेल्य बाप्पासाठि थर्मॉकॉल न वापरता सजावट करता येईल तर अजुन चांगले होईल.

या वर्षी लेकीला बॅले नृत्याचा श्री गणेशा करायचा होता. मग काय, गणपती बापा आला आपला बॅलेरीना होवुन उंदीरमामाला घेवुन Wink असा आमचा यावर्षीचा गणपती बाप्पा.
1.jpg2.jpg3.jpg

सगळ्यांचे बाप्पा मस्तं!
चैतन्य, पराग .. किती सुंदर बनवलीय मुर्ती
हिम्सकुल .. रांगोळीमधले बाप्पा क्युट आलेत एकदम
आश .. तुमचा बाप्पा तर फुल्ल टु मॉडर्न आहे की .. Happy

पुर्वा, चनस. धन्यावाद.

मस्त आहे सगळ्यांचे गणपती. इथे अमेरीकेत अस्ल्यामुळे, घरी बसल्या सगळ्यांचे गणपती पाहुन भारतातल्या वेगवेगळ्या गणेश मंडळाचे गणपती पाहील्याचे समाधान Wink

आमचा घरी बनवलेला बाप्पा आणि घरी बनवलेला माऊंट रेनिअरचा देखावा. माझे बाबा डायरेक्टर. घरातील बाकी कामगार मंडळी Happy

ganpati_0.jpgWP_20130909_058.jpg

पर्थ मधला बाप्पा...

Gharcha bapp 1.JPGGharcha bapp 2.JPGGharcha bapp 3.JPGGharcha bapp 4.JPG

बाप्पाचा कालचा नैवेद्य, खीर
Gharcha bapp 5.JPG

हा आमच्या घरचा बाप्पा. बाप्पाला यंदा घरच्या बागेतली जास्वंद आणि गणेशवेलीची फुलं मिळालीत Happy गेली दोन वर्ष छोटीशी का होइना सजावट घरीच बनवली पण यंदा अगदी ऐनवेळी घर बदलावे लागल्याने दोन वर्षांपुर्वीचीच सजावट वापरली आहे.

ganesh3.jpg

Pages