८० - ९० च्या दशकातील कॉमेडी गाणी....

Submitted by अनिश्का. on 6 September, 2013 - 07:03

८०-९० च्या दशकात जी हिंदी सिनेमा मधिल गाणी असायची ती आता ऐकली तर फार्फार कॉमेडी वाटतात...सगळीच नाही...आहेत काही काही.........

जसे - १. सुबह सुबह जब खिडकी खोले
बाजु वाली लडकी हाय हाय हाय
तो दिल मेरा बोले हेल्लो हाउ आर यु
हाय हाय दिल मेरा बोले हेल्लो हाउ आर यु....
२. जब भि कोइ लडकी देखु
मेरा दिल दिवाना बोले
ओले ओले ओले ओले ओले ओले
आज ही गाणी ऐकली तर मलाच हसायला येते....पण यात काही छान गाणी पण होतीच.......बघुया किती चांगली गाणी आणि किती कॉमेडी गाणी निघताहेत........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अत्यंत कॉमेडी गाणं ऐकलेलं कुमार शानू आणि कविता कॄष्णमुर्तीचं ( ह्या जोडीनंच माझं हायला झालं होतं)....आता आगापीछा काहीही आठवत नाही......पण गाणं केवळ अविस्मरणीय
कुमार सानू
तुम पर हम है अटके यारा, दिल भी मारे झटके
क्योंकी तुम हो हटके
कविता कृष्णमूर्ती
अरे बचके रहना प्यारमें पड जायेना तुमको फटके
भैय्याको तू खटके
सापडलं तूनळी वर, खालची लिन्क पहा
http://youtu.be/GXHn722c6Rk

अबोलीजाह्नवी, हे गाण सलमान खान आणि काजोल यांच्या प्यार किया तो डरना क्या या पिक्चर मधल आहे. त्यात धरमपाजी पण आहेत.

धन्यवाद मुग्धा.... तू नळी वर असेलच.....वेळ काढून पाहीन मी हा सिनेमा.....सलमान खान आणि धरमपाजी....बघणार नक्की......धमालच असेल...;)

सरकायलो खटिया जाडा लगे

बटाटावडा, बटाटावडा, दिल नही देना था, देना पडा

तेरी नानी मरी तो मै क्या करू

ऊन्ची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है

आजा मेरी गाडी मै बैठ जा

व्हॉट ईज यूर स्टाईल नंबर

बटाटावडा, बटाटावडा, दिल नही देना था, देना पडा>>>>> हे कुठलं????>>>>
अनिश्का माधुरी आणि अनिल कपुरचं आहे हे. जमाईराजा मधलं बहुतेक.
जमाईराजा मधलं "तेरी प्यारी प्यरी बाते मुझे आछ्छी लगती है" पण तसंच आहे.

असेल बघायला हवं Happy
असच एक गोविंदा माधुरी चं पण आहे......
एक रसगुल्ला कही फट गया रे
एक रसगुल्ला कही फट गया रे
फटके जलेबी से लिपट गया रे... Happy

मेरे प्यार का रस जरा चखणा ओय मखणा ओय मखणा ऐसे न चुरा अब अखणा ओय मखणा ओय मखणा...... "बडे मियाँ छोटे मियाँ" अमिताभ बच्चन, गोविंदा आणि धक धक गर्ल माधुरी दिक्षित - नेने..... मला हे गाण कॉमेडी वाटलं....

जरा विषयांतर करते. जितेंद्रच एक गाण आहे पावसातल "हाय रे हाय निंद नही आय" याचा व्हिडिओ मिळाला तर बघा भन्नाट कॉमेडी गाण आहे. म्हणजे गाण छान आहे. कोरिओग्राफी कॉमेडी आहे.

एक रसगुल्ला कही फट गया रे
फटके जलेबी से लिपट गया रे>>> Rofl

१) सुबह सुबह जब खिडकी खोले,
बाजुवाली लडकी हाय हाय
दिल मेरा बोले हॅलो हाव आर यु??

२) भोली भाली लडकी
खोल तेरे दिलकी
प्यार वाली खिडकी

<मराठीत माझं मत 'प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश'ला. त्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर दिसत नाही; पण क ह र आहे अगदी> नंदन +१.
हेच का ते गाणे की ज्याच्या सुरुवातीला वाडकरांनी दोन-तीन गद्य वाक्ये म्हटलीत..अरे तुम्ही मला पांडू समजता का अशीच काहीतरी...
टीव्हीवर आला होता तेव्हा चित्रपट पाहिला होता...अशोक सराफ - रंजना ही नावे पाहून. एकदा पाहूनही ते गाणे लक्षात आहे. अगदी रेडियोवर लागले तरी रेडियोचा कान पिळतो.
नायक बहुतेक चित्रपटनिर्मात्याचा मुलगा आहे. प्रि-प्रायमरी शाळेतील मुलांनी करावा तसा अभिनय-नृत्य दिग्दर्शन आहे.

सुबह से लेकर शाम तक
शाम से लेकर रात तक
रात से फीर सुबह तक
सुबह से फीर शाम तक
मुझे प्यार करो
मुझे प्यार करो

यांना इतर कुठलीही (उदा. पोटं साफ करणे.) कामं नसावीत काय?

मराठीत माझं मत 'प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश'ला. त्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर दिसत नाही; पण क ह र आहे अगदी> नंदन +१.>>>>>>>>>>>>>>> शी तो हिरो कसला पकाव आहे,,,,,,,

या गाण्यासाठी कायपण http://www.4shared.com/mp3/YhWQH3m3/Premasati_Jhukale_Khali_Dharni.html

गाण्याचा व्हिडियो नाही. पण. गाण्याआधीचे गद्य जे काही आहे तेवढेच ऐका. शितावरून भाताची परीक्षा करा.

मलाही गोविंदा आणि रविनाची जोडी आवडते - त्यांच्या गाण्याच्या मध्येच आँऊ....... असले काही भलते सलते शब्द आणखी मजा आणायचे..........................

जबसे हुई है शादी.. आंसू बहा रहा हूं..
आफत गले पडी है.. इसको निभा रहा हूं..

चित्रपट - थानेदार

संजय द्त्त चे एक्स्प्रेशन्स अप्रतिम आहेत..!! जोडीला माधुरी.!!

मला गोविंदा खूप आवडतो असे नाही पण त्याच्यावर चित्रित केलेली बरीच गाणी कॉमेडी असायची, ते आऊ वगैरे मला फारसे नाही आवडायचे.

सु सु सु आ गयी मै क्या करु
सु सु सु आ गयी मै क्या करु
ए आ ओ आए ...जा तु घरमे करके आ
ए आ ओ आए....नन्ने मुन्ने मत शरमा.....

( अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी च्या मुव्ही मधलं )
आणि त्याच मुव्ही मधलं हे अजुन एक..

बाराना दे...बाराना दे ...बाराना...
बाराना दे...दे दे दे.....बाराना दे ...बाराना...

अनिल कपूर माधुरीचे एक गाणे होते, त्यात अच्छी लगती हो/है असे शब्द होते. आणि प्रत्येक अच्छीवर शिंकण्याची अ‍ॅक्शन होती.

जमाई राजा मधलं.......
तेरी प्यारी प्यारी बाते..मुझे आ आ आ आ आच्ची लगती है......ये सब दिन और सब राते मुझे आआच्ची लगती है....