प्रेम म्ह्ण्जे नक्की काय असतं ?

Submitted by सुनिल जोग on 6 September, 2013 - 02:57

पलकोन्के पिछेसे क्या तुमने फरमाया
फिरसे तो फरमाना,नयनोने सपनोन्की महफिल सजायी
तुम भी जरुर आना....

प्रेमातील रोमान्स भावना काय किवा प्रेम थोडेसे मॅच्युअर झाल्यावर

भले बुरे जे घडुन गेले ,विसरुन जाउ सारे क्षणभर..
जरा विसावू या वळणावर .. या वळणावर..

ही प्रेमातील आश्वासकता आज आपण हरवून बसलो आहे की काय असे वाटण्याची वेळ आलीय. साधारणपणे १९८० च्या दशकातील म्हणजे आता ६० च्या आसपास असलेल्या पिढिला पडलेला हा प्रश्न आहे.
म्हणजे " आमच्या वेळी' हा राग आळवणारा मी जेस्ठ नागरीक नाहिये. पण नीरज् ची देवानन्द साठी गाणी मला जितकी प्रिय आहेत तितकीच समीर ची १९९० मधील गाणी मला प्रिय आहेत. मला आर्डी जितका आवडतो तितकाच ए.आर आणि गुणी शंकर एहसान लॉय हे त्रिकूट देखिल आवडते.

पण सगळा घोळ झाला १९९१ च्या आर्थीक धोरणाने. आर्थिक सुबत्ता आपण पचवु शकलो नाही. कारण त्याबरोबर जरुर असणारी सान्स्क्रुतिक सुबत्ता आपण जोपासली नाही. डोळ्याच्या कोप र्‍यातुन पाहुन लाजणारी प्रेयसी गायब झाली. ' तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी..' हा गोडवा गेला आणि मद्रासी पिक्चर मधला धसमुसळेपणा आपल्या रोजच्या जीवनात आणि प्रेमात केव्हा मिसळून गेला हे आपल्याला कळलेच नाही.

आता हल्ली १६ वर्षाची मुले जेव्हा ' ए लव्ह देती का ? ' असं प्रपोज करता त तेव्हा मला १ किलो सर्फ दे असं म्हटल्या सारखं वाटत. प्रेम हे इतकं स्वस्त आणि चिल्लर असतं का ? बर हे प्रेम कसं तर मोबाईल मधल्या मेसेज बॉक्स सारखं.. १ महिन्यात ऑटो डिलीट होणारे. दोघानाही त्याचे सोयर सुतक नाही.

दुसरी भिती 'नाहि' म्हटल तर अश्लिल मेसेजेस, क्लिप्स आणि एम.एम.एस चा मारा
होणार. कुणाला सान्गायची चोरी.. एवढी बाब 'मॅटर" होणार. मग टीव्ही न्युज.. वगैरे ..

प्रेम ही एक उदा त्त भावना आहे ती जोपासायची असते,कुरवाळायची अस ते हे कोण कधी कसे शिकवणार हा प्रश्न मला पडलाय आणि हे सारं करायला वेळ कुणाला आहे.
विचार करा १९८० मधे आपण आपल्या पत्नीला रु २५ चे ग्रीटिन्ग कार्ड आणि हॉटेल्मधे जेवण हा विचार पचवला असता का ? आता.. ? बुके आणि जेवण आणि महागडे गिफ्ट याशिवाय प्रेम व्यक्त करणे म्हणजे
आउच.. भले घरी तिच्यावर कितीही खेकसत असतो तरी...

त्यावेळि प्रेमात एवढा भपकेबाजपणा नव्हता. भानुविलास किवा प्रभातला बाल्कनीत एक पिक्चर आणि एक गजरा ही साधी अपेक्शा होती.
एवढ सारे करुन खरं प्रेम मिळतय का ?

ती काय कमॉडीटी आहे? द्या पैसे आणि घ्या १ किलो प्रेम ?
मला वाटते हे डिमान्ड सप्लाय चे मार्केटिंग अस्ते तसे प्रेमाचे मार्केटिन्ग सुरु होईल २०२५ पर्यन्त आणि मग आयटी आय्टी सारखे त्याचे देखिल कोचिंग क्लासेस सुरु होतील .
वय वर्शे ५ ते १० = हाउ टू लव्ह युवर पेरेन्ट्स १०० डॉलर्स
वय वर्शे १० ते १५ = हाउ टू लव्ह युवर टिचर्,नेबर्स २०० डॉलर्स
वय वर्शे १६ ते २० = हाउ टू प्रपोझ युवर फियान्सी ५०० डॉलर्स
वय वर्शे २१ ते २५ = हाउ टू एन्जॉय युर मॅरीड लाईफ ५००० डॉलर्स

मग प्रेमाने बोलल्यासा ठी १ तासास रु ५००,
प्रेमाने वागण्यासाठी १ तासास रु १०००
असे दरपत्रक वाचायची सवय करावी लागेल. पैसे वाचवण्यासाठी मग लोक प्राण्यान्वर प्रेम करतील.झाडान्वर प्रेम करतील.

हे सारे झाले तरी प्रेम हे बाहेरुन येणारी बाब नसुन ती मनात्, ह्रुदयात स्वतः निर्माण करावी लागणारी चीज आहे हे केव्हा कळणार आहे कुणास ठाऊक ? नाहितर आहेतच अ‍ॅटॅक, रेप आणि अत्याचार...
हे सारं मी नकारत्मक भावनेने लिहित आहे असा गैरसमज नसावा ही गंभीर बाब आहे. यावर आपण चिंतन करणे आवश्यक आहे. कारण भावी समाजमन घडवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users