लुंगी डान्सवर थिरकणार पावले

Submitted by मुग्धटली on 5 September, 2013 - 02:38

आजच्या सकाळ वर्तमानपत्रात मुख्य पानावर ही बातमी पाहिली. घरी वेळ न मिळाल्याने ऑफिसला येउन वाचली. "जिंदगी जिंदगी, लल्लाटी भंडार, चिंताता चिता चिता, लुंगी डान्स... लुंगी डान्स, वन टु थ्री फोर, गो गो गोविंदा, डॉन भाई का मैं तो डंका बजाऊ, देवा श्री गणेशा, बलम पिचकारी, ढिंक चिका, हूड दबंग दबंग, ड्रीमम वेकपम, यांसारखी एकाहून एक दणकेबाज गाणी यंदा गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईला थिरकायला लावणार आहेत." हे आहे पुणे सकाळमधे आलेल्या बातमीचे पहिले वाक्य.
वरील यादितील देवा श्री गणेशा आणि लल्लाटी भंडार ही दोन गाणी सोडल्यास बाकीची गाणी निव्वळ धिंगाणा घालायला लावणारी आहेत. विशेष म्हणजे ढोलपथकवाल्यांकडून या प्रकारची गाणी ढोल ताशांवर वाजवली जाणार असल्याचे समजते. पुण्यातील ढोलपथक नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वादन शैलीने रसिकांची मने जिंकत असतात. त्यांचे हे वादन बघण्यासाठी अनेक ठिकाणाहुन लोक पुण्यात विशेषतः विसर्जन मिरवणुक बघायला येतात.

मला तरी हि बातमी वाचुन आनंद झाला नाहि. तुम्हाला काय वाटते ते इथे लिहा.

बातमीची लिंक देण्याचा प्रयत्न करत होते पण नाहि जमले. कोणाला जमले तर लिंक जरुर द्या या बातमीची.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला.......या वर्षी.............

मुन्नी बदनाम, फेविकॉल.. सारख्या थिल्लर आणि आश्लिल गाण्यांपासुन सुटका मिळेल

नाहि उदयन ती गाणी तर वाजणार आहेतच ही आणखीन भर त्यात, मुन्नी बदनाम होउन जुनी झाली आता. तिच्या मागे चिकनी चमेली आलीय ती हैदोस घालणार आहे आता. Sad

नुसत्या गाण्यांनी काय होणारेय? मागं 'काला कौवा काट खाएगा' आणि 'नाचरे मोरा' या गाण्यांवर तरूण पँट मध्ये हात घालून अश्लिल हावभाव करून नाचताना बघितलेत.

आता अशी तुरळक उदाहरणं असतीलच की, म्हणून काय सार्वजनिक गणेशोत्सवच बंद करायचा काय?
असा प्रश्न विचारणार्‍या लोकांनी स्वत:च्याच थोबाडीत मारून घ्यावं. Happy

तुर्र्मखानजी ,
सार्वजनिक गणेशोत्सवच बंद करायचा काय? >> बरोबरच आहे .
तुमच्या वरच्या उदाहरणातली मुल गणेशोत्सव आहे म्हणून तस करत नव्हती , ती मुल तशी आहेत म्हणून तस करत होती .
ज्याना ढकलाढकली , छेडछाड करायची आहे त्याना ट्रेनची गर्दी सुद्धा चालते आणी ज्याना डॉल्बी लावायचा आहे त्याना मुलग्याचे जावळही चालते .

सार्वजनिक गणेशोत्सवच बंद करायचा काय? >>

काय संबंध ,
जूनी गाणी जशीच्या तशी घेतली तर त्यावर नाचता येणार आहे का
आणि मून्नी ,शीलाची गाणी आली तेव्हा मनसोक्त ऐकून घेतलीच ना , मग सार्वजनीक ठिकाणी वाजविली तर काय बिघडल .......................
काळानुसार बदल हे स्वीकारावेच लागणार आहेत.

डॉल्बी आल्यामुळे ढोल ताशे लूप्त होणार नाहीत .

सार्वजनिक गणेशोत्सवच बंद करायचा काय? >>
केला तर पर्यावरणाला फायदाच होइल...ध्वनी प्रदुषण, पाणी प्रदुषण तरी कमी होइल..

आणि मून्नी ,शीलाची गाणी आली तेव्हा मनसोक्त ऐकून घेतलीच ना , मग सार्वजनीक ठिकाणी वाजविली तर काय बिघडल>>>>> किकु, मग त्यासाठि लग्न समारंभ आहेतच ना? टिव्हीवरील मालिकांच्या सिनेमांच्या कॄपेने आजकाल लग्नसोहळे ४-५ दिवस चालु असतात. मेहेंदी, संगीत वगैरे, त्या बदनाम मुन्नीला, चिकन्या चमेलीला, जवान शिलाला नाचवा तिकडेच. गणपतीच्या मिरवणुकीत हि थिल्लरबाजी कशाला? उत्सव या शब्दाचा तरी मान ठेवा.