नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद

Submitted by खटासि खट on 4 September, 2013 - 15:14

( जी नावं या लेखात आली आहेत ती अत्यंत आदरणिय आहेत. या सर्वांबद्दल अतीव आदर आहे. एक विनोदी कल्पना म्हणून या सर्वांची माफी मागून हे धाडस करू पाहत आहे ).

मराठी साहीत्य नेटवर लिहीता यायला लागल्यापासून फटाफट साहीत्य आणि खटाखट प्रतिक्रिया यांचा जालावर इतका सुकाळ जाहला कि मुद्रीत साहीत्य वाचण्यास अनुक्रमे फटाफट आणि खटाखट यांच्यापाशी समय शिल्लक न राहीला. फटाफट खटाखट इतके छान चालले कि लेखक कम प्रकाशक आणि प्रतिसादक कम टीकाकार कम साहीत्यिक हे कुठल्याही दडपणाविना मोकळे होऊ लागले. खिडकीपलिकडचा कोण आहे याचे कोणास कसलेच देणेघेणे नसल्याने कोर्टात न्यायाधिशाने खरडपट्टी काढावी तसे अधिकार सर्वांस ज्याप्रमाणे आपोआपच प्राप्त झाले, त्याचबरोबर साक्षात कुसुमाग्रज, पुल असल्यासारखे कौतुक करण्याचे अधिकारही ! यातून कुणीही सुटले नाही. जुने नवे सदस्य सर्वच समान जाहले. नवे पण काहीच दिवसात रुळून बोचकारे काढण्याच्या कलेत पटाईत जाहले. अशातच काही सदस्य नव्याने आले. नावांशी नव्या पिढीस कसले आलेय घेणेदेणे ? शिवशिवणारी बोटं आणि फडशा पाडण्यासाठी गावलेले साहीत्य यामुळे काय घडले ते थोडक्यात सांगतो. प्रतिसादकांची नावे संपादीत करण्यात आलेली आहेत. नव्या सदस्यांचे आयडी आणि लेखाचे नाव दिले गेले आहे. यातले काही सदस्यांचे खाते हे त्यांच्या स्नेह्यांकडून चालविले गेल्याचे मागाहून कळाले.

लेखनाचा धागा - जेवणावळ - कथा - रत्नाकर मतकरी
प्रतिसाद १०७ नवीन ०७

प्रतिसादासाठी सदस्य व्हा

प्रयत्न बरा होता. पुलेशु

प्रतिसादासाठी सदस्य व्हा

कथा कुठेतरी वाचल्यासारखी वाटली. तुमची स्वतःची आहे का ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
^^^^
अहो लेखक महाशय, इथे स्वतःच्या कथा पोस्ट करायच्या आहेत.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
कृपया, लेखकाचे नाव द्यावे.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा

कथाच कळाली नाही.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
आजच्या जमान्यात अंधश्रद्धांना खतपाणी घालणारं लिहायचं. आम्हाला काही उद्योग नाहीत का हे असलं काही वाचण्यासाठी ? यापेक्षा स्टॅलोन वाचला असता तर परवडलं असतं

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
बाई, स्टॅलोन कधीपासून लिहायला लागला

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
बाईंना स्टॅलीन म्हणायचं असेल Rofl

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
दात काढायला काय झालं ? मी वाचलंय त्याचं कुठलंतरी पुस्तक.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
स्टॅलोन फाडफाड इंग्लीश असेल ते

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Lol

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Proud

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
स्टॅलोन आणि लेखक Uhoh

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
नावात काय आहे एव्हढं ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
नावात काय आहे एव्हढं ? >> अगदी बरोबर. गांधीजी म्हणायचे नेहमी.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
गांधीजी ? नक्की का ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
नावात काय आहे हो ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
ते सेक्सपीयर का काय असतील. नक्की आठवत नाही.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
आसाराम बापू म्हटले असतील

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
आसाराम कि आसुमल ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
अरे, काय चाललय हे ? नावात काय आहे हे पटतंय ना ? मग कुणी का म्हणेना.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
कथा विनोदी लेखन विभागात हलवा.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हा काय त्रास आहे? विनोदी विभागात लेख पोस्ट केला कि विनोदी लिखाण पाहून अपेक्षा वाढल्या होत्या असं खवचट सारखं लिहीतात. आता हे बिचारे सदस्य नवीन आहेत, लिहीतात पण बरं तर त्यांना हा असा प्रतिसाद.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? आमचं मत मांडलं.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
जेवणावळ म्हणजे हॉटेलच ना ? मग उद्योजक विभागात हलवा.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
मला आवडली कथा.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
वकाराव युनोवस्की हातात घेतलं कि इतर काही आवडतच नाही

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हे कोण नवीन ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
रशियन लेखक आहेत

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
कधी वाचलं नाही नाव

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
त्यासाठी रशियन शिकावी लागते.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
इंग्रजीत अनुवाद दिसले नाहीत.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
प्रत्येक भाषेचं एक सौंदर्य असतं. अनुवादीत वाचण्यात मजा नाही.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
मला पण मारीच ओंबाडे आवडतो

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
आता हे कोण ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
नायजेरियन लेखक आहे.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
कुठली भाषा म्हणे ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हौसा

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
आँ ? ओ ....ती तर आमची कामवाली आहे. ती कधीपासून लिहायला लागली ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हौसा ही नायजेरियातली एक भाषा आहे.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
तुम्ही कधी गेला होता नायजेरियाला ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
भाषा शिकायला तिथं जायलाच पाहीजे का ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
कुठं शिकवतात म्हणे आपल्याकडं ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
साहेबराव दुतोंडे

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हे कोण ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हौसा शिकवणारे

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
गाव बिव काही असेल कि नाही ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
चोराची उंडवडी

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
तिथ कशाला कडमडलात ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
मी तिथलाच आहे

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
ब्वॉर !!!

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
तेच म्हटलं लोक जर्मन, फ्रेंच, जॅपनिज, चायनीज, कोरीयन शिकतात. हे एकदम हौसाबाई प्रकरण कुठून आलं ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Lol

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Lol

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Lol

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हौसाबाई Rofl

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
लेखापेक्षा प्रतिसाद वाचनीय

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
लेखक महाशय कुठे गेले ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
प्रतिसाद वाचून पुन्हा लिहायचं धाडस करणार नाहीत

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
अहो, ते प्रथितयश लेखक आहेत.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हा विनोद इथे करू नका. विनोदाच्या बीबी चा वापर करावा

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
कैच्याकै

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
प्रथितयश लेखक आम्हाला कसे माहीत नाहीत ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
तुम्हाला विचारून लिहीतात का लोक ? कोण लागून गेले तुम्ही ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
शब्द जपून वापरा

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
नाही वापरणार

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
इड्झिडकोन्गत्याअ

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हन्त हन्त हन्त

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
य्तस्ल्क्ज्ल्क्ज्द अयुअ

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
अहो अ‍ॅडमिन, लक्ष द्या

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हा धागा बंद करण्यात आला आहे

--------------------------------------------------------------------------------------

लेखनाचा धागा - कविता -प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं - मंगेश पाडगावकर

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
मायबोलीवर स्वागत. पुलेशु

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
ठीकठाक

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
वृत्तात लिहायचा प्रयत्न करा. पुलेशु

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
मुक्तछंद पाहीला कि मॉनिटर फोडून टाकावासा वाटतो.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हळू

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
कवितेत दम नाही

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
माफ करा थोडं स्पष्ट बोलतो.. मला हा वेळेचा अपव्यय वाटतो. या कवितेत ना लय आहे, ना छंदबद्ध रचना, ना नवा विचार, ना आशय. गणेशोत्सवात शिवाजीराव भोसलेंनी प्रेम या विषयावर भाषण द्यावं तसं वाटलं. इथे अनेक नावाजलेले कवी आहेत, त्यांच्या कविता वाचा, मनन करा आणि मग लिहा. गैस नसावा.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
मला आवडली

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
मलाही

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
साहीत्यविषयक जाणिवा बोथट होत चालल्या कि हीन दर्जाच्या साहीत्याला डोक्यावर घेणारे रसिक भेटतात.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
बरं बरं. असू द्या आमची हीन अभिरुची. तुम्हालाच काय ते एकट्याला कळतं वाटतं ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
स्वतःच कवी, स्वतःच समीक्षक, स्वतःच प्रतिसादक, स्वतःच लेखक.. ऐकत नाहीत ब्वॉ !

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हौस नाही आली. लोकांच्या आग्रहाखातर लिहीतो.

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
हो का ? आम्हाला वाटलं प्रतिसाद पण तुम्हीच देता

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Lol

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Lol

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
Lol

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
झाली का इथंही भांडणं सुरू ?

प्रतिसादासाठी सदस्य व्हा
माफ करा. मी एक छोटासा कवी आहे. इतके दिवस या विद्वतसभेबाबत अनभिज्ञ असल्याने एका मोठ्या साहीत्यिक शिक्षणाला मुकलो असं वाटतंय . इतक्या उशिरा इथे सदस्य झाल्याबद्दल मी सर्व विद्वानांची माफी मागतो. इथे सुचवल्याप्रमाणे मी इथल्या कवितांचं अध्ययन करणार आहे.

कळावे
आपला नम्र
मंगेश पाडगावकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

Biggrin

छान आहे लेख. हौस असेल आणि खूप रश नसेल तर या लेखाचं रशियन आणि हौसा भाषेत भाषांतर करून प्रकाशित करता येईल. स्टॅलोन आणि दुतोंड्यांना पकडा ......

झकास

मस्त

ती हौसा भाषा खरच आहे बरं का ? इतक्या वर्षात मला फक्त दोन वाक्य शिकता आली.

बोलेवू = आहेस कुठे तू.
मोंबोला = मी उद्या येणार नाही.

माझ्या सहकार्‍यांशी बोलताना ही वाक्य वापरायचो मी !

Pages