Equation

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

M = P / E की P = M X E
P= Market Price per share
E = Earnigs per share (EPS)
M = P/E ratio or multipale or times

हे equation ज्याला कळाले तो शेअर मार्केट चा राजा. ह्या equation ला p/e = market price / EPS असे ही म्हणतात. हे मी आधीही सांगीतले आहे मग परत का ह्यावरच लिहीत आहे? बरेचदा आपण अनेकदा असे ऐकतो की तो शेअर सध्या महाग आहे हा स्वस्त आहे. ( Overvalued or Undervalued ) ह्याचा अर्थ काय? Infosys च्या एका शेअर ची किंमत आज (१२ मे) ३२४३ रु आहे व TCS ची २०११ आहे म्हणून TCS स्वस्त का? बर WIPRO तर ५४४ ला मिळत आहे म्हणुन तो आणखी स्वस्त का? जो गुतंवनुकदार वरील equation चा विचार न करता असे म्हनत असेल की Wipro सध्या स्वस्त आहे आणी wipro पण ह्या दोन्ही कंपन्याचा तुलनेत आहे म्हनून मी wipro धेईल तर तो बरोबर विचार करत आहे का? हे सर्व सांगन्यासाठी मी परत P/E वर लिहीत आहे. आपण वरील तिन्ही कंपन्याचा विचार P/e Ratio ने करुयात.

P/e Ratio (M) = Todays Price (P) / EPS (E)

108460.gif

वरील चार्ट मधे मी TCS, Wipro, KPIT and Infy ची आजची किंमत, मार्च २००६ मधील त्यांची कमाई व प्रत्येक शेअर पाठीमागील कमाई ( EPS ) भविष्यातील (मार्च २००७) कमाई P/E ratio च्या सहाय्याने माडंली आहे.

WIPRO जरी ५४४ ला मिळत असेल तरी तो स्वस्त नाही. त्याचे multipale (p/e), Infy व TCS एवढेच आहे. तिन्ही कंपन्या ३६ ते ३८ च्या P/e वर आहेत. म्हनजेच equally priced आहेत. Infact wipro is slightly overpriced लक्षात ध्या की wipro चा EPS १४ आहे व Infy चा ८७ आहे तरी आज wipro थोडा महाग आहे. KPIT कडे पाहील्यावर असे लक्षात येईल की तो WIPRO, Infy, TCS पेक्षा स्वस्त आहे कारण तो earning च्या फक्त २६ वेळेस महाग आहे पण leading Industry avg पेक्षा स्वस्त आहे.

आता आपण हेच eqation थोडे बदलून असे मांडूयात.

P (expected market price) = M (p/e ratio) X E ( expected EPS

सर्व मोठ्या कंपन्या Budgt किंवा expected earnigs वर्ष सूरुवातीलाच बनवतात व share analyst ला त्याची एखादी प्रत देतात. Multax Global ही अशीच एक Analysing Company आहे. त्यावरुन मी INFY आणी WIPRO चे expected EPS धेतले आहेत. TCS च्या figurs अजुन आल्या नाहीत (२००७ साठी) त्यामुळे TCS चा Future EPS मी रिकामाच ठेवला आहे.

Future EPS ला मी Current P/e ने गुणले, त्या वरुन मला मार्च २००७ साली Infy आणी Wipro ची मार्केट प्राईज काय असेल व त्या शेअर्स मध्ये गुंतवनुक करावी की नाही याचा अंदाज बांधला. जर मी Infy त पैसे गुंतवले तर all other things remaining equal मला एका शेअर पाठीमागे ११८४ रु. चा फायदा होईल व wipro मधे १८१ रु प्रती शेअर फायदा होईल. KPIT जो आज ४९१ चा रेंज मधे आहे तो ७५०+ जाईल. म्हनजेच आज KPIT स्वस्त आहे.
पण मग KPIT जर २६ ने ट्रेड करत असेल तर Infy का घ्यावा? कारण Dalal Street cares Only about Growth. Infy, TCS and Wipro can and will grow much faster then KPIT म्हनून investor या कंपन्याना EPS च्या ३६-३७ वेळेस पैसे द्यायला तयार आहेत. पन तुमची थोडी वाट पहायाची तयारी असेल तर KPIT पन मस्त आहे. KPIT थोडा घसरल्यावर ( ४५०-६०) च्या रेंज मधे घेन्यास हरकत नाही कारन येत्या वर्षात तो ७००+ जाईल.

आता यात अनेक गोष्टी बदलल्या नाही तर असे मी वर लिहीले आहे. त्या गोष्टी कुठल्या? तर INFY किंवा इप्रो चा business असाच सुरु राहील. Industy P/E Ratio (म्हनजे पुर्ण IT companycha ) ३० ते ३८ मधे राहील etc etc

तर सांगन्याचा मुद्दा असा की वरील eqation लक्षात न धेता जर तुम्ही शेअर महाग आहे की स्वस्त आहे हे ठरवत असाल तर नफा व्ह्यायचा ऐवजी तोटा होउन पुर्ण पैसे बुडायची भीती आहे. म्हणून P = __ X __

तळटिप फक्त P/e वर अवलंबुन investment करु नये. त्या कंपनीचा पुर्ण Fundamental Analysis करावाच.

प्रकार: