निसर्गाने रंग उधळले ....

Submitted by वेडसह्याद्रीचे on 31 August, 2013 - 03:47

निसर्गाने रंग उधळले ....

निसर्गाने रंग उधळले
वाऱ्यांसंगे नभ दाटले
हिरवाईचा होऊनी स्पर्श
डोंगर दऱ्या नट- नटले !

काळ्या - लाल मातीचा स्पर्श
चिखलातुनी पाय चालले
वर ढगाआड नभांगातुनी
इथे थेंबे थेंबे तळे साचले !

वेड्या वाकड्या वाटेने
इथे नदी ओढे अन झरे वाहती
खळखळाट नाद मृदुन्गाने
वृक्ष वेली - पक्षी पाखरे नाचती !

बेहोष- बेधुंद होवुनी मी
पाहत असे चमत्कार हे सारे
निसर्गाचे रूप असे हे
भुलती माझे दुख सारे
भुलती माझे दुख सारे !!!

संकेत य पाटेकर
598589_427480213941561_760033730_n.jpg

!! भावना मनातल्या,'कविता माझ्या !!
http://kavitaamaazya.blogspot.in/2012/06/blog-post_14.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users