पार्ट-टाईम/ फुल-टाईम ऑनलाईन घर बसल्या काम करा!!! (किती खरं? किती खोटं?)

Submitted by king_of_net on 29 August, 2013 - 02:05

मीत्रांनो,
वर्तमान पत्रात, मायाजालावर बरेचदा आपण असल्या जाहीराती वाचल्या/पाहिल्या असतील. ह्यातिल ९९% तर बोगस असतात.
आपल्यापैकी कुणाला जर एखाद्या genuine कंपनी बद्दल वा ऑन लाईन कामाबद्दल माहीती असेल तर कृपया इथे शेयर करावी ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

oracle outsource ahmedabad ही क़ंपनी per COPY PASTE साठी १.५ $ देणार्रेत...ह्याची शहनिशा कशी करायची?(आधी ५५०० हजार भरायचेत्)मी त्यान्ना फोन केला होता,ok वाट्लेत..

नसती उठाठेव करु नये

जर काम तुम्ही करणार असाल तर पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे ,तुमच्याकडून घेतले गेले नाही पाहिजे,
ब-याच लिंकवरुन तुमची व्ययक्तिक माहिती घेवून फसवणूक होण्याची शक्यता जास्त...................

अशा भूलथापांना बळी पडायच आणि मग फसवणूक झाल्यावर पोलीस,सरकार काय करतात असे पश्न उपस्थित करायचे.

इजी मनी कुठेच नसतो.......... कष्ट हाच पर्याय

<तुमचा आइडी आणी तुमचा प्रश्न ह्यात जमिन आसमानचा फरक आहे. क्रुपा करुन आइडी बदला. किन्ग म्हणायचे अणि भिक मागायचि, हा काय प्रकार आहे.> + १००

ईथे आयडिचा काय प्रश्न आहे आयडि काहीही असला तरी तो माणुसच आहे ना, त्याला प्रश्न पडु शकतात. आयडि किंग आहे म्हणुन काय झालं प्रश्न पण नाही का विचारायचं? उमेशप, भ्रमर, विनायक परांजपे>>>> कै च्या कैच प्रतिक्रिया आहेत तुमच्या......

अहो त्यांना बनायच आअहे ना किंग म्हणुन. Happy

९९% जाहिराती बोगस असतात. त्यापेक्षा गुगल अ‍ॅडसेन्स बघा.

असे लोक प्रथम तुम्हाला काहि amount deposit करायला लवतात, ईन्वेस्ट्मेन्ट जसे की computer, net etc. त्याचे Remuneration चे rules हि खुप असतात, जे वाचल्यावर आपण deposit केलेली amount तरि recover की नाहि असा प्रश्न पड्तो.. जे काय कराल ते नीट समजुन उमजुनच करा..

आरे ज्याना उद्देशुन लिहिले ते तर काहिच म्हणत नाहि.
ऊगिच सर्वजण माझ्यावर बिल फाडत आहेत.
पातळी सोडुन म्हणाल तर...
आइडी इन्ग्लिश मधे आणि प्रश्न मरठीत. हे चालते.

उमेशप त्यांच्या आयडी चा आणि त्यांच्या प्रश्नाचा संबंध येतोच कुठे ? काहीही .
<<पातळी सोडुन म्हणाल तर..आइडी इन्ग्लिश मधे आणि प्रश्न मरठीत. हे चालते.>> उमेशप अगदी म्हणजे अगदीच काहीही Lol मुग्धा अग भ्रमरनी उमेशप यांनी टाकलेल्या पोस्टचा विरोध केला आहे.

http://www.designmate.com/contactus.html
अहमदाबाद मधील या कंपनीचं काम मी केलं होतं मागे २००९ मधे.
ऑनलाईन एज्युकेशनल सीडीजच्या इंग्रजी ते मराठी भाषांतराचं काम होतं. !
त्यांनी एक पेमेंट तर व्यवस्थीत केलं. नंतर मला वेळ नसल्याने काम जमणार नव्हतं, म्हणुन मी सोडलं.

मुग्धाजी, माझी पोस्ट कैच्याकै कशी ते सांगाल काय??? मी उमेशप यांनी टाकलेल्या पोस्टचा विरोध केला आहे.>>>> Uhoh अग्ग्बाई अस आहे का ते???.... सॉरी हां माझ्या समजण्यात चुक झाली.....

कोणाला अनुभव आहे का अश्या कामांचा?? मी सुद्धा लोकलमध्ये.. पेपरमध्ये अश्या जाहिराती पाहिल्या आहेत.
नक्की कामाचे स्वरुप काय असते?

मि एकलेले काम हे data entry प्रकारातले होते.. ते लोक, स्केन कॉपीज (एमेजेस) पाठवतात, आणि आपण ते नोट पॅड मधे टाइप करुन पाठ्वायचे असते.. प्रत्येक spelling mistake साठी पेसे कापले जातात.. आणि monthly target हि असतेच ते achieve झाले नाहि तर payment मिळत नाहीत..

ही फसवणुकच असते. नाशिकमध्ये नुकताच एका कॉम्प्युटर इन्स्टिट्युटला सोळा लाखांचा गंडा घालण्यात आलाय. दिल्लीच्या एका कंपनीची नेटवरची जाहिरात पाहून यांनी डाटा एंट्री कामासाठी संपर्क केला. २२ रूपये पेजप्रमाणे ठरले. डिपॉझिट म्हणून दीड की दोन लाख रूपये त्या कंपनीने बँक खात्यात भरायला सांगितले. त्यानंतर वर्षभर काम दिलं. जवळपास चौदा लाख रूपयांचं बील थकल्यानंतर या संस्‍थेनं तगादा लावला. बील देण्यास त्या कंपनीनं टाळाटाळ केली. प्रत्यक्ष दिल्लीला जाऊन पाहिलं तर ना कंपनी होती ना तिचं कार्यालय. आता कोर्टात या संदर्भातची केस सुरू आहे. त्यामुळे अशा इझी मनीला न भुलणे हेच उत्तम. शेवटी कष्टाची मिळालेली अर्धी भाकरीच चांगली. Happy

वर्तमान पत्रात, मायाजालावर बरेचदा आपण असल्या जाहीराती वाचल्या/पाहिल्या असतील. ह्यातिल ९९% तर बोगस असतात.

>>>> हा बिझिनेस आपल्याला इझी मनी मिळवून देण्याकरता नसून त्या लोकांकरता इझी मनी असतो.

एकदम पार्टटाईम काम! जाहिरात द्या, इमेल/फोनवरून येणार्‍या शंकांना उत्तरं द्या. एक तात्पुरता बँक अकांउंट काढा. बास इतकं केलं की आपसूक लोकं ती जाहिरात वाचून पैसे भरतात. की यांना इझी मनी (तोही भरपूर) मिळाला! Happy

देअर इज नो फ्री लंच .... नेहमी लक्षात ठेवा.

डेटा एंट्रीच्या कामातही अनेकदा फसवणूक किंवा कमी पेमेन्ट देणे, पेमेन्टसाठी टाळाटाळ / उशीर इत्यादी प्रकार केले जात असल्याचे ऐकिवात आहे. माझ्या ओळखीतील एका मुलीने डेटा एंट्रीची कामे कंटाळून सोडली. उशीरा किंवा खूप तगादा लावून मगच पेमेन्ट मिळणे, त्यातही तुम्ही केलेल्या डेटा एंट्रीत खूप चुका होत्या असे सांगून कमी पेमेन्ट देणे असे प्रकार व्हायचे हे तिचे म्हणणे होते.

गमभन, लिंक नाही कारण तो अंक ऑनलाईन नसतो असा माझा अंदाज. मे २०१३ मधे आलेला लेख होता. गृहिणींसाठी फ्रीलान्सिंगच्या संधी या विषयावर.

फार फसवणूक असते यात … यांची

फार फसवणूक असते यात … यांची प्रोसिजर अशी असते

तुम्ही कामाची विचारपूस केली कि हे तुम्हाला काम समजून घेण्यासाठी एक cd विकत घेण्यास सांगतात… हि cd जवळ जवळ २ हजार रुपयांची असते यातला तुम्हाला एक शब्दही काही कळत नाही … अस तुम्ही त्यांना बोलायला गेलात कि ते तुम्हाला आणखी सोप्पी पद्धत आहे त्यासाठी बुक किंवा परत सिडि ऑफर करतात ती थोड स्वस्त असते… या सर्वात तुमचे ५-६ हजार गेलेत कि आपली समज होते आपणच ढ आहोत आणि आपण नाद सोडतो … फक्त नाद सोडायचे पैसे गेलेले असतात आणि आपली फसवणूक झालेली आहे हे कळायला फार वेळ लागतो… तेव्हा नाद सोडायचाच असेल तर तो आत्ताच सोडून दिलेला बरा

बेस्ट वे, काही छानसे व्हिडीओ बनवा. कॉपीराईट ची भानगड न करता आणि युट्युबवर अप्लोड करा. सेटींगमध्ये अ‍ॅडसेन्स वापरा. खुप कमी पैसे मिळतील, पण खात्रीलायक.

विजय मला याबद्दल जरा जास्त माहिती मिळेल का?

जर काम तुम्ही करणार असाल तर पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे ,तुमच्याकडून घेतले गेले नाही पाहिजे,
ब-याच लिंकवरुन तुमची व्ययक्तिक माहिती घेवून फसवणूक होण्याची शक्यता जास्त....>>>>>>>माझी अशीच फसवणूक झाली आहे... पहिले पैसे लवकर आले म्हणुन मी जास्त मेंबर जमवले तर आम्चे सर्वांचेच पैसे बुडाले.
तेव्हा सावधान....कुणीही असे काम करुन नये

कोणतीही मेंबर जमवणारी स्कीम ही Pyramid स्कीम असते, आणि त्यात अगदी वरच्या थराला पैसे मिळतील आणि बाकीचे नाडले जातील, हे कुणाही गणीत शिकलेल्या माणसाला कळू शकते. पण वर्षानुवर्षे असल्या स्कीम येतात आणि लोकं फसतातच.. चालायचेच

कोणतीही मेंबर जमवणारी स्कीम ही Pyramid स्कीम असते, आणि त्यात अगदी वरच्या थराला पैसे मिळतील आणि बाकीचे नाडले जातील, हे कुणाही गणीत शिकलेल्या माणसाला कळू शकते. पण वर्षानुवर्षे असल्या स्कीम येतात आणि लोकं फसतातच.. चालायचेच
<<< अनुमोदन.
जिथे प्रचंड आणि भरपूर पैसा एकदम मिळेल असं सांगितलं आसतं ते "आमिष" असतं हे ल्क्षात ठेवा कृपया...

घरबसल्या काम करायचे असल्यास सर्वात आधी स्वत: काय काम करू शकता ते ठरवा. त्यानंतर त्या कामासाठी योग्य ते विश्वासू कॉन्टॅक्ट शोधा, आणि त्यांच्याकडून काम मिळवायला सुरूवात करा. सुरोवातीला पैसा थोडाच असेल. नंतर हळू हळू कामं वाढत जातील तसा पैसा वाढत जाईल.

धन्यवाद लोक्स,
काही कारणास्तव काल पुन्हा लॉग इन करु शकलो नाही....

तुमच्या अनुभवाचा आणि संपर्काचा फायदाच होईल ह्याची खात्रि होती....

तुमचा आइडी आणी तुमचा प्रश्न ह्यात जमिन आसमानचा फरक आहे.
क्रुपा करुन आइडी बदला.>>>>
उमेशप, सुचनेचा जरुर विचार करीन... बा द वे... नेट चा अर्थ इथे internet नाहीये... Happy

किन्ग म्हणायचे अणि भिक मागायचि, हा काय प्रकार आहे>>>>>
भ्रमा, धन्स.... मला वाटतं कि पोस्टरण्याने हि पोस्ट डीलिट केली आहे नाही तर मी नक्की विचारल असतं की ह्यात भिक मागण्या सारखं काय आहे ते?

... बा द वे... मला हा नेट चा अर्थ अजुनहि समजला नाहि.
हे कोळ्याचे जाळे, मछर दाणि कि मासे पकडायचि जाळि.
का हे अजुन कुणाला पकडायचे जाळे.

यावर माझ्या एका दूरच्या नातेवाईकाने 'इमेल करा पैसे मिळवा' अशा एका अमेरिकन कंपनीला पैसे भरुन ४ मुले/मुली आणि एक छोटी कचेरी भाड्याने घेऊन व्यवसाय चालू केला होता असे आठवते.
काम होते: कंपनीकडून येणार्‍या इमेल यादीतील लोकांना मेल पाठवणे (कोणती ते आठवत नाही पण 'अमुक तमुक स्वस्त दरात मिळवा' वाली ऑफर मेल्स असावीत.) मेल एकाच आयडीला एकापेक्षा जास्तवेळ गेल्यास दंड म्हणून काही पैसे कट. पाव डॉलर एका मेलला. व्यवसाय काही महिने व्यवस्थित चालू होता, कंपनीकडून मिळालेल्या पैशात ४ जणांचे पगार नीट येत होते, नंतर कंपनीने पैसे पाठवण्यात उशिर बर्‍याचदा केल्याने हळूहळू हा व्यवसाय बंद करण्यात आला.

इमेल यादीतील लोकांना मेल पाठवणे <<<

फक्त माहीती साठी:

कोणत्याही छोट्या कंपनीला एक email-server (Computer and free software) घेऊन असला Setup करणे सहज शक्य असते. त्यामुळे 'Email करणे' या व्यवसायात काहीही दम नाही.

>>>>किंग ऑफ नेट - काम पाहिजे असेल तर माझ्याकडे ये भरपूर पडलय >>>
किरण मित्रा, काम मला नकोय रे नाही तर नक्की आलो असतो.. Happy

>>>>>हे कोळ्याचे जाळे, मछर दाणि कि मासे पकडायचि जाळि.
का हे अजुन कुणाला पकडायचे जाळे. >>>>
जाउ दे उमेशप... त्रास करुन घेउ नकोस .

मीत्रांनो,
हवी होती ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला वाटत हा धागा इथेच बंद करावा
धन्यवाद.