Quantum Of Solace

Submitted by अजय on 17 November, 2008 - 01:35

काल Quantum Of Solace पाहिला. मला अजिबात आवडला नाही

एखादा चांगला जेम्स बाँडचा चित्रपट
वजा विनोद
वजा प्रणय
वजा गॅजेटस
वजा Q
वजा मनीपेनी
वजा बाँड आणि मुख्य नायिकेचे शेवटी मिलन

= Quantum Of Solace

बाँड चित्रपटातल्या या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या तर काय उरेल? फक्त ऍक्शन आणि हिंसा. त्यामुळे हा बाँडचा चित्रपट वाटत नाही. Jean-Claude Van Damme चा वाटतो. casino Royal नंतर माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या. इतक्याच नाही तर तो थोडासा भावूक करून स्त्री प्रेक्षकांना आपलेसे वाटून प्रेक्षकवर्ग वाढावा याचाही प्रयत्न होता.

Quantum Of Solace मधे नुसती मारधाड आहेत. बाँडच्या तोंडी विनोद नाही (असलाच तर खूप खूप शोधून एखादे वाक्य सापडेल). बाँड आणि त्याच्या मुली (:) ) यांच्यात प्रणयाच्या अगोदरची नजरानजर, अनुनय, जुगलबंदी, टोमणे, हळुवारपणा, कथासूत्र काही नाही. मुळात २ च मुली त्याचा जवळ(१ शरिराने, १ मनाने) आलेल्या दाखवल्या आहेत. एका शय्यागृहाच्या बाहेरून "I need some stationary. So let us go inside" म्हणून त्याच्यावर पाळत ठेवणार्‍या मुलीला तो आत घेऊन जातो आणि लगेच त्याना कपडे नसलेले दाखवले आहे. आता याला विनोद म्हणावे का काय? तेवढेच एक प्रणयदृष्य म्हणता येईल. प्रणयराधनेत दिसणारा बाँडचा इब्लिसपणा कुठेही दिसत नाही.

नायिका शेवटी नुसती मनाने त्याच्या जवळ येते आणि चुंबन घेऊन निघून जाते.

बाँड कडे कुठलेही गॅजेट्स नाहीत. जे गॅजेटस आहेत ते त्याच्या ऑफिसात (MI6) गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी आहेत (A glorified version of Google type search engine with touch screen)

photography, locations मात्र नेहमीप्रमाणे सुंदर आहेत. पण त्यासाठी हा चित्रपट पाहिला तर पैसे वसूल होणार नाहीत. माझ्यामते हा सगळ्यात बंडल नसला तरी पहिल्या ३ वाईट बाँडपटात नक्कीच असेल,

आणि हे पहा
James Bond actor Roger Moore says the new 007 film Quantum of Solace is too violent for his tastes.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मम. Happy

मी पण पहिल्याच दिवशी पाहिला.. अगदिच सो सो आहे..

खूप वेळ मला काही कळतच नव्हते.. हिंसा मात्र खूपच आहे...
_________________________
-Impossible is often untried.

नेहमीच्या बॉन्ड पटात आणि या चित्रपटात ऐक फरक आहे तो म्हणजे हा पट बॉन्डची इमोशनल साईड दाखवतो. कॅसीनो मध्ये जे अर्धवट राहीलय ते ह्या पटात पुर्ण तो करतो. त्यामूळे मागील चित्रपटातील काही पात्र आहेत.
प्रणय करन्यासाठी तो "मुव्ह ऑन" झाला पाहीजे पण तो चित्रपटात तसा दाखविलेला नाही, अजुनही सेंटीच असतो जसे ते कॅन यू स्लिप वैगरे डायलॉग्स. म्हणून प्रणय दाखवला असता तर ते विजोड वाटले असते. तसेच तो या चित्रपटात रनअवे ऐंजटच म्हणून काम करतो त्यामूळे गॅजेट्स जे ऑन ड्यूटी बॉन्डला मिळतात ते त्याला मिळाले नाहीत. (सर्वात आधीचा सिनमध्ये तो ऍस्टॉन मार्टीन चालवतो, तेव्हा तो ऐजंट असतो पण नंतर फोर्ड वर उतरतो तेव्हा नसतो. )

अर्थात पिक्चर तेवढा ग्रेट नसला तरी शुक्रवार संध्याकाळ वाईट नाही गेली. Happy क्रेगने बॉन्ड हा फक्ट गॅजेट मूळे नाही तर त्यांचा अंगात असलेल्या अफाट पॉवरमूळे देखील बॉन्ड यशस्वी होउ शकतो हे दाखवीले. हा म्हणजे थोडाफार अमिताभच्या जुन्या चित्रपटांसारखा झालाय. तो कोणालाही मारतो, पण त्याला जास्त लागत नाही. Happy

एकंदरीत ३ रत्ने.

मला हा क्रेग बॉन्ड वाटतच नाही. पिअर्स ब्रॉस्नन च आवडतो सगळ्या "बॉन्डात" Happy जुन्या जाणकार लोकांना शॉन कॉनरी (अस्सल मराठीत सीन कॉनरी) आवडतो, पण आम्ही बॉन्ड बघू लागेपर्यंत तो म्हातारा झाला होता आणि बहुधा नेव्हर से... सोडला तर बॉन्डपट करतही नव्हता.

>>> जुन्या जाणकार लोकांना शॉन कॉनरी (अस्सल मराठीत सीन कॉनरी) आवडतो,
कालच पार्ल्यात 'शॉन कॉनरी सारखा बाँड नाही' असं कुणीतरी म्हणालं, आज तू हे बोललास!!!!!!!! Proud स्वातीsssss Proud

अजय,
वरच्या वजा वाल्या यादीत अजून एक राहीले ना
'वजा बॉन्डचे प्रसिद्ध पेय Vodka Martini, shaken, not stirred '
Happy

नाही ते वजा नाही. ते आहे. इतकेच नाही तर त्याची संपूर्ण कृतीही (कदाचित पहिल्यांदाच) सांगितली आहे.

केदारचे म्हणणे थोडेफार पटते आहे. नेहमी सुरुवातीला जे पिस्तुलाच्या नळीत बाँड दिसतो आणि ते नेहमीचे बाँड संगीत असते, ते सगळ्यात शेवटी दाखवले आहे. म्हणजे या चित्रपटाच्या सुरुवातीला बाँड हा बाँड नसतो तो शेवटी होतो असे दिग्दर्शकाला सुचवायचे असावे.

बघा - मी पिअर्स ब्रॉजनन बेस्ट बाँड म्हटलं तर पटलं नाही कोणाला.
आणि शॉन कॉनरीबद्दलचा माझा मुद्दा थोडासा निराळा होता. (पण ते इथे नको. :P)

>>जुन्या जाणकार लोकांना शॉन कॉनरी >>

जुन्या लोकांना तर आवडतोच पण ह्या पीढीतल्या काही लोकांना पण आवडतो. Happy

लालु Lol

'ह्या पीढीतल्या' म्हणजे नेमकं कुठल्या साली बारावी झालेल्या? Proud

१८५७ Wink

सिंडे(खापर पणजी), एवढी ज्ये. व जा. आहेस होय!! Wink

ज(ख्खड) किंवा ज(र्जर) म्हैतीये मला पण जा म्हणजे काय ?

पन्ना, लालू कुठे दिसली तुला?? Happy

असूदेत गं आयटे, वय झालय तिचं, मान लटपटत असेल तर नसेल दिसलं की पोस्ट स्वातीने टाकलय Wink

अस्स होय? मला वाटलं की शॉन कॉनरी इफे़क्ट की काय?? Proud Lol

आणि टिमोथी डाल्टन सगळ्यात डबडा बॉन्ड होता हे कोणत्याही पिढीतील लोकांना पटावे Happy

farend, swaatee_ambole पिअर्स ब्रॉझनन बेस्ट बाँड असं माझंही मत आहे, आणि टिमोथी डाल्टन सगळ्यात डबडा बॉन्ड हे पण एकदम मान्य्....तो भारी म्हणजे भारीच कनप्यूज्ड वाटायचा Happy

मला क्रेग अजिबात आवडत नाही, एकदम थकल्यासारखा वाटतो, म्हणजे तापातून उठलेला माणूस कसा वाटतो ना तस्सा! Happy क्लाईव्ह ओवेन बाँड म्हणून मस्त दिसला असता असं आपलं माझं मत्.....तरी नशीब ओरलॅन्डो ब्लूमला बाँड म्हणून घेतलं नाही, त्याचंही नाव चर्चेत होतं म्हणे.....मग तर हिरो कुठ्ला आणि हिरॉईन कुठली काहीच कळलं नसतं Happy

केदारला अनुमोदन. Quantum of Solace, Casino Royale नंतर अर्ध्या तासात सुरू होणारा चित्रपट आहे हि गोष्ट लक्षात घेतल्यावर बर्‍याचशा गोष्टींची संगती लागते.

काल गेलो होतो..तिकीट नाही मिळाले. दोन्ही शो फुल्ल...:(
आता पुढच्या मंगळवारी परत ट्राय..

काल गेलो होतो..तिकीट नाही मिळाले. दोन्ही शो फुल्ल...>>> आमच्या येथे(नोएडा) पहिल्यादिवशीच्या शो ला थेटर निम्मे रिकामे होते.

मला आवडला....

मस्त आहे...
क्रेग एकदम रफ अँड टफ दिसतो...
हा बाँड चा सूड आहे हे माहिती असल्यामुळे जास्ती एंजॉय करता आला... (रोमांस नाही हे मनात ठेऊन... शेवटी बाँड चा सूड पूर्ण झाल्याचं सुतोवाच आहे... त्यामुळे पुढच्या सिनेमात रोमांस असेल अशा आशा ठेवायला हरकत नसावी....)
_______
ओ बीच बजारी दंगे लग गए दो तलवारी अंखियोंके, मखणां...
हो जान कटे के जिगर कटे अब इन दोधारी अंखियोंसे, मखंणा...