जीपीएस डिवाइस बद्द्ल माहिति

Submitted by निर्मल on 24 August, 2013 - 06:52

जीपीएस डिवाइस कुठ्ला चांगला आहे? खरंच उपयोग होतो का? ठाणे ते भोपाळ मोटार घेउन जायचे आहे. म्हणून चाउकशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणताही अँडॉईड फोन घ्या. त्यात डेटा प्लॅन हवा.
गूगल नॅव्हिगेशन वापरा. अगदी हा फ्लायोव्हर घेउ की नको हे देखिल व्यवस्थीत सांगते.
मुंबई ते भोपाळ काहीही प्रॉब्लेम नाही, अगदी जीपीएस नसले तरी. एकदा हायवेला लागलात की ४लेन रस्ता सोडायचा नाही.
भोपाळमधे घर शोधायला जीपीएसचा उपयोग होईल. आधी ओळखीच्या गावात वापरुन पहा थोडे.
एकूण ड्राइव्ह मोठा आहे. ड्रायव्हिंगची सवय नसल्यास धुळे शिरपूर कुठेतरी हॉल्ट घ्या. दोन ड्रायव्हर असलेत तर एका पल्ल्यात जाता येईल. व्यवसायीक ड्रायव्हर एका पल्ल्यात जाऊ शकेल.

हॅपी जर्नी

इंदुर म्हणजे ठाण्याहून सुमारे ५७० किमी. मोठी गाडी असली तरीही ८-९ तासाचा ड्राईव्ह होईल. चहा जेवणाचे हॉल्ट वेगळे.

आणि हो, जीपीएस डिव्हाईस/स्मार्तफोन साठी कार चार्जर सोबत असू द्या. बॅटरी फार अन पटकन खाल्ली जाते. .

ठाणे - भोपाळ एका दिवसात सहज होईल. गाडी चांगली असेल आणि कोणाला मोशन सिकनेस नसेल तर किस झाड की पत्ती ! दोन ड्रायव्हर असेल तर मध्ये रात्रीसाठी थांबायची गरजच नाही. सध्याचे रस्ते चांगले आहेत. आणि इंदूर मार्गे जा. तो मुंबई आग्रा हायवे असल्यामुळे चार पदरी आहे.

मॅप माय इंडिया चे कोणतेही जिपीएस चालले. आणि इब्लिस म्हणतात तसे जर तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल तर गुगल मॅप्स डाऊनलोड करा. आणि वापरा.

कितीही ड्रायव्हर असले तरी मध्यरात्री गाडी चालवू नका. गाडीला आणि चालकाला दोघांनाही विश्रांती हवी