जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

Submitted by अभय आर्वीकर on 23 August, 2013 - 13:51

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) 

                          कोणताही विषय नेमकेपणाने समजून घ्यायचा असेल तर त्या विषयांची शक्यतो सर्व अंगांनी माहिती करून घेणे आवश्यक असते. ज्यांना या पारंपरिक उपचार पद्धतींबद्दल अजिबात माहिती नसेल त्यांना या उपचार पद्धतीविषयी माहिती व्हावी म्हणून लेखमालेच्या पहिल्या भागात म्हणजे लेखांक-१ मध्ये साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचार पद्धती कशी असते, ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. तीन लेखांकामध्ये हा विषय पूर्ण करायचा विचार होता. परंतू पुस्तक किंवा ही लेखमाला मी वृत्तपत्रासाठी लिहीत नसून आंतरजालावर लेखन करत आहे याचे भान आल्याने व काही आततायी प्रतिसादकांकडून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर हिणकस आरोप करणारे प्रतिसाद लिहिले जाण्याची शक्यता बळावल्याने, मग प्रत्येकाला स्वतंत्रपणे उत्तर देऊन स्वतःची दमछाक करून घेण्यापेक्षा या लेखांकात आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून नाईलाजाने स्वतःबद्दल व्यक्तिगत माहिती मी लिहायचे ठरवले आहे. माझ्याविषयी संक्षिप्त माहिती अशी-

१) माझा माझा पूर्ण पत्ता विपूमध्ये लिहिलेला आहे. माझ्या गावातील २५ पेक्षा जास्त मंडळी फेसबुकवर आहे. हा लेख मी फेसबुकवर सुद्धा टाकत असल्याने मी देत असलेल्या माहितीबद्दल वाचकांनी विश्वास बाळगावा. याला संतोषीमातेचे पत्र समजू नये.

२) मी व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सरकारची कमीतकमी ढवळाढवळ असावी, असे मानतो. 

३) मी विज्ञानाचा पदवीधर असून विज्ञानाचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा कट्टर समर्थक आहे.

४) मी स्वतःमूर्तिपूजां करण्याचे टाळतो पण इतरांना मनाई करत नाही. 

५) भविष्य शास्त्रावर माझा विश्वास नाही पण विश्वास असणार्‍यांचा अनादर करत नाही. 

६) मी सनातनी, प्रतिगामी किंवा पुरोगामी या शब्दांपासून स्वतःला वाचवतो. कालबाह्य न झालेले व उपयोगमुल्य शाबूत असलेले जुने ते "सोने" समजतो आणि मला नवे ते "हवेहवेसे" वाटते.

७) जेथे विज्ञानाचे हात टेकतात आणि बुद्धीसुद्धा हतबल होते तिथून श्रद्धेची कक्षा सुरू होते. श्रद्धा ही श्रद्धा असते, डोळस किंवा आंधळी अजिबात नसते. श्रद्धेच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष वेगवेगळ्या असू शकतात, यावर माझा विश्वास आहे.

८) कालबाह्य परंपरा व रुढी नष्ट झाल्या पाहिजेत पण त्याऐवजी ज्या नव्या प्रथांचा अंगीकार करायचा आहे त्याचीही कारणमीमांसा झाली पाहिजे, डोळे झाक करून ते स्वीकारायचे नाही मग ते कितीही अद्ययावत का असेना, असे मी मानतो.

९) देवापुढे प्राण्यांचा बळी द्यायचा नाही, याचा मी समर्थक आहे. आमचे घरात दरवर्षी फ़रिदबाबाची पुजा म्हणून बोकड कापून नैवद्य दाखवायची परंपरा होती, मी घरच्या सर्व वडिलधार्‍यांचे मनपरिवर्तन करून ही प्रथा मोडीत काढली.

१०) मजूरवर्गाला सायंकाळी/रात्री मजुरीचे पैसे देऊ नये, असा आमचेकडे समज आहे. त्याला छेद म्हणून गेली २६ वर्ष मजुरांना सायंकाळी/रात्रीच पैसे देत असतो.

११) एका भविष्यवेत्त्याने मला आठवा गुरू असताना लग्न करू नकोस असे सांगितले होते. मग मी मुद्दामच आठव्या गुरूत असतानाच लग्न केले. 

१२) मद्यप्राशनाला माझा कट्टर विरोध आहे पण सक्तीने दारूबंदी करायलाही विरोध आहे.

१३) १९८७ मध्ये गावात राहायला गेलो तेव्हा सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मारुतीच्या पारावर आणून पारंपरिक उपचार करायची पद्धत होती. या पद्धतीपेक्षा वैद्यकीय पद्धतीने त्यावर उपचार व्हावेत म्हणून त्या काळी समवयस्क मुलांना गोळा करून याविषयी सतत जनजागृती केली. स्वखर्चाने दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली, मात्र कुणावर कधीही सक्ती केली नाही. बराच काळ लागला पण यश मिळाले. आता सर्पदंश झाल्यास सर्वच थेट दवाखान्याचा रस्ता धरतात. मागील दोन महिन्यात माझ्या गावात ३ शेतकर्‍यांना सर्पदंश झाला आहे. त्यापैकी एका सर्पदंश झालेल्या शेतकर्‍याला माझ्या छोट्या भावाने स्वतःच्या चारचाकीने व स्वखर्चाने त्या व्यक्तिला दवाखान्यात नेऊन भरती केले. तीनही शेतकरी वाचले आहेत.

१४) दोन वर्षापूर्वी गावातील एका इसमाला कर्करोग झाला होता. पण तो नागपूरला मेडिकलमध्ये जाण्याचे टाळून वैद्याकडून जडीबुटीचे औषध घेत होता. मी खूप प्रयत्न केले पण तो मेडिकलमध्ये जायला राजी होत नव्हता. मी त्याला समजावत होतो मात्र सक्ती करत नव्हतो. मग मी पहिल्यांदा त्याच्या कुटुंबीयांना राजी केले. शेवटी रोगीही राजी झाला. मग अडचण आली पैशाची. माझ्यासमोर नाईलाज होता. खर्च मी करायचे मान्य करून त्याला नागपूरला भरती केले. कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोचल्याने ऑपरेशन झाले पण ६ महिन्यानंतर तो दगावला. आता त्याचा मुलगा दारूचा आहारी गेला आहे व माझे पैसे परत करू शकत नाही, असे त्याने मला स्पष्टपणे कळवले आहे. माझे पैसे परत मिळतील अशी आशा मावळली आहे. चाळीस हजार रुपये सोडून देण्याइतपत मी श्रीमंत नसलो तरी माझा नाईलाज आहे. मात्र त्या पोराला मी एका वाईट शब्दाने देखील बोललेलो नाही माझे पैसे परत करावे म्हणून सक्ती केली नाही, करणार नाही.

१५) एक वर्षापूर्वी एका पेशंटला आजार झाला. त्याने काही दवाखाने केले पण त्याला आराम मिळेना म्हणून तोही वैद्याकडून जडीबुटीचे औषध घ्यायला लागला होता. मी स्वतः त्याला विशेषज्ञ डॉक्टरकडे नेले आणि त्याला हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. दीड लाख रुपये खर्चाची बाब होती. त्याची ऐपत नव्हती म्हणून त्याला "जीवनदायी आरोग्य योजना" आणि अन्य संस्थांकडून सव्वा लाख रुपयाची मदत मिळवून दिली. पेसमेकर इन्प्लँटेशनचे ऑपरेशन यशस्वी झाले. मात्र यासाठी मी माझ्या गाडीचा एकूण दहा हजार रुपयापर्यंत आलेला डिझेल खर्च पेशंटकडून घेतलेला नाही. यावेळी अनेकदा डॉ. कैलास गायकवाड यांनी मला फोनवरून ऑपरेशन संदर्भात बरीच मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

१६) सहा महिन्यापूर्वी एका महिलेला "जीवनदायी आरोग्य योजना" आणि अन्य संस्थांकडून दीड लाख रुपयाची अशीच मदत मिळवून देऊन तिचे दोन्ही व्हॉल्व्ह्चे (एक रिप्लेसमेंट आणि एक रिपेअर) ऑपरेशन करून घ्यायला लावले. याकामी सुद्धा माझे स्वतःचे दहा हजार रुपये खर्च झाले आणि मी ते पेशंटकडून घेतलेले नाही.

मला असे वाटत आहे की, जे लिहिले तेच भरपूर झाले. यापेक्षा आत्मस्तुतीपर लिहिण्याची गरज नाही. आता पुन्हा मूळ लेखाकडे वळतो आणि उर्वरित लेखाचा भाग लेखांक-३ आणि लेखांक-४ मध्ये पूर्ण करतो.

                                                                                     - गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(अपूर्ण....)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीवनदायी आरोग्य विमा या एका सरकारी योजनेचा लाभ खेड्यापाड्यांतील गरिबांना मिळतो आहे, हे या लेखातून कळले. त्याबद्दल आभार.

मुटे सरांचा पहिला लेख मी वाचला आणि या भागातून त्यांचे वैयक्तिक मत आणि आचरण समजले. मी त्यांचे अभिनंदन करतो.

कायद्याचा उद्देश हा प्रस्तावनेत (कायद्याचा पहिल्या परिच्छेदात) आला पाहिजे. त्यामुळे बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील.

मुटेसाहेब भाग ३ आणि ४ लवकर येऊ द्या. म्हणजे सविस्तर प्रतिक्रिया देता येईल.

जीवनदायी म्हणजेच पिवळं कार्डं वाली राजीव गांधी योजना.
यात दीड लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्च सरकार करते. (विम्यातून)
पिवळे वा केशरी कार्ड असेल तर मुंबईत देखिल शासकीय रुग्णालयांत ही योजना चालते.
गेले वर्षभर पायलट प्रोजेक्ट म्हणून ४ की ५ जिल्ह्यांत चालवली गेली. यंदापासून व्याप्ती वाढवली आहे बहुतेक.

धन्यवाद मुटेसर....

तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील ही आदर्शवत कामे तुम्ही इथे लेखस्वरुपात मांडल्याचे पाहून आनंद झाला. यातील काही कामाबाबत [किंवा सरकारी योजनेबद्दल म्हणा...] मला आजच लेखातूनच माहिती मिळाली.

बाकी आंतरजालावर कोणत्याही विषयावर लेखन करताना येणार्‍या प्रतिसादांचे पदर लेखकाला नेहमीच उल्हसित करणारे असतील असे नसतेच बहुधा.

अशोक पाटील

>>>> जेथे विज्ञानाचे हात टेकतात आणि बुद्धीसुद्धा हतबल होते तिथून श्रद्धेची कक्षा सुरू होते. श्रद्धा ही श्रद्धा असते, डोळस किंवा आंधळी अजिबात नसते. श्रद्धेच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष वेगवेगळ्या असू शकतात <<<<<<
महत्वाचे वाक्य Happy मी लक्षात ठेवतोय.
यात अजुन एक भर हवी म्हणजे पंचेंद्रियांच्या ज्ञान ग्रहणाच्या कक्षा संपतात, तिथूनही पुढे पंचेंद्रियांचे साथीनेच श्रद्धेची कक्षा सुरू होते/सुरू करता येते.

आमच्या एचाराने पाठविलेला "विन्ग्रजी" सुविचार पहा
"Failure keeps you Humble,
Success keeps you Glowing,
But only Faith & Determination keeps you going."
आता या इंग्रजीतील फेथ चा अर्थ काय घ्यावा बोवा?
मान्य की कॉर्पोरेट फिल्ड मधे फेथ/डिटर्मिनेशन वगैरे फक्त कर्मचार्‍यांकडून "नफायुक्त" काम करण्याबाबत अपेक्षित अस्तील. पण कर्मचारी, संस्था यांचा एकमेकांवर विश्वास नसेल, करीत असलेल्या कामाच्या योग्यायोग्यतेवर विश्वास नसेल, तर एक तरी काडी इकडची तिकडे होईल का? अन हा विश्वास "श्रद्धेशिवाय" कसा काय निर्माण होऊ शकतो?
अन हीच अक्कल नसल्यामुळे आमचे नेते जाहीर भाषणात अशा आशयाचे बोलतात की "सैनिक सैन्यात भरती होतात अन युद्धात मरू शकतात कारण त्यान्ना पगार मिळत असतो", काय खरोखर प्रत्यक्ष युद्धात लढत असताना महिन्याचा "पगार" हे मृत्युला सामोरे जाण्याचे कारण असू शकते? जर नसेल, तर कसला विश्वास वा श्रद्धा म्हणा कारणीभूत असते? राष्ट्रप्रेम? देशप्रेम? तर तिथेही राष्ट्र वगैरे हल्ली काही नस्तेच, जग जवळ आलय वगैरे बुद्धिभेद चालूच असतात. यावरुन एकच सिद्ध होते की जिथे जिथे म्हणून तुमचा विश्वास्/श्रद्धा असेल, त्या त्या श्रद्धा स्थानांवर येन केन प्रकारेण हल्ले चढवित हळू हळू पण निश्चितपणे तुम्हाला तुमच्याच श्रद्धांपासून दूर नेण्याचे (व शेवटी पशूवत निर्बुद्ध बनविण्याचे) हे कृत्य असू शकते. असो.
विषयांतराबद्दल क्षमस्व.

>>>> जेथे विज्ञानाचे हात टेकतात आणि बुद्धीसुद्धा हतबल होते तिथून श्रद्धेची कक्षा सुरू होते. श्रद्धा ही श्रद्धा असते, डोळस किंवा आंधळी अजिबात नसते. श्रद्धेच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष वेगवेगळ्या असू शकतात <<<<<<

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पुसटशी रेषा असते; जी व्यक्तीसापेक्ष असते. एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला अंधश्रद्धा वाटेल; तीच दुसर्‍या व्यक्तीला श्रद्धा वाटेल. कुठल्यातरी पुस्तकात (सकारात्मक विचारांच्या बाबतीत) मी वाचले होते ते सांगतो. भगवान येशू यांच्या 'स्पर्शाने रोग बर्‍या करणार्‍या' शक्तीबद्दल बायबलमध्ये एक विधान आहे - "त्याने सर्वांना एकत्र केले. एका झोपडीत नेले, आणि त्यांना विचारले, 'मी केवळ स्पर्शाने तुम्हाला बरे करू शकतो, यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे का?". ते 'होय' म्हणाले. मग त्याने प्रार्थना केली, 'हे आकाशातल्या बाप्पा, त्यांच्याबाबतीत त्यांच्या विश्वासाप्रमाणे घडो'. या गोष्टीत त्या व्यक्तीचा विश्वास (श्रद्धा) महत्वाची आहे. भगवान येशूची शक्ती नव्हे! काही लोक या (किंवा या स्वरूपाच्या इतर धर्मातील) गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतील. मी श्रद्धा म्हणतो.

>>>> मी श्रद्धा म्हणतो. <<<< अगदी बरोबर.
पण अशी श्रद्धा जागविण्याकरता एक येशू अन एक वा अनेक बाप्पा मानलेले असणे आवश्यक, जेव्हा की काही बुद्धिमान बुप्रा बाप्पाच मानत नसतिल, तर त्यान्नी श्रद्धा व अंधश्रद्धा यांचेतील फरकाची उठाठेव / शाब्दिक कसरत का करावी? त्यांचे दृष्टीने बाप्पा मानणे हीच अंधश्रद्धा अस्ते, व सर्व प्रथम त्यान्नी तेच मांडावे! पण तसे न करता, आम्ही तुमच्या देव मानण्या न मानण्याच्या मधे येत नाही, फक्त ठराविक चालिरीतीरुढीन्ना अंधश्रद्धा म्हणतो आहोत असा मूळ बाप्पा मानणे हीच अंधश्रद्धा ही भूमिका लपवून, उघड पणे भूमिकेतील तद्दन ढोन्गी पणा कशासाठी? येशू वा बाप्पाच मानायचा नाही तर त्याबाबतच्या प्रत्येक चालिरीती या यांचे व्याख्येप्रमाणे "अंधश्रद्धाच" ठरतात, किंबहूना "श्रद्धा" नावाचा प्रकारच नसतो, वा श्रद्धा मानणे म्हणजेच विकृती अशी ही विचारसरणी आहे.
असो.

>> ११) एका भविष्यवेत्त्याने मला आठवा गुरू असताना लग्न करू नकोस असे सांगितले होते. मग मी मुद्दामच आठव्या गुरूत असतानाच लग्न केले.

हे मात्र खरे. ग्रहमान कसेही आसो येथे परीनाम सारखेच

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा>>>>>>>>> जादूटोणा, व ईतर काही अनिष्ट प्रथांमुळे जर एखाद्याचे नुकसान होत असेल, त्या विरोधात एखादा कायदा तयार होत असेल तर तो अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कसा असु शकतो? माफ करा पण तुमच्या लेखनाचे शिर्षक खटकतेय व ते तुमच्या लेखनाशी देखिल विसंगत वाटतेय

मुटे, तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल, कामाबद्दल इथे कुणाला काही शंका असेल असं वाटत नाही. फक्त तुम्ही मांडलेल्या लेखातले विचार पटले नाहीत म्हणून त्याविरोधी लिहिण्यात आलंय.

लिंबाजीराव,
कस्ली देशप्रेमान ओतप्रोत भरलेली सैनिकी पोस्ट आहे हो तुमची.
गहिवरलो मी.
*
सैनिकाच्या ट्रेनिंगमधून सगळेच लोक सैनिक बनतात असे नसते. त्यातून गळून जाणारेही असतात.
पळून जाण्याचा प्रयत्न करणारेही असतात, पण पळून गेला तर शिक्षा जबर असते. म्हणून सहसा जास्त गळती नसते. पण तो वेगळा विषय.
सैनिकी ट्रेनिंग चा बेसिक ढाचा पाहिला, तर तुमच्या भाषेत त्याला 'श्रद्धावान' बनविणे, हाच उद्देश असतो.
म्हणजेच, कोणताही प्रश्न न विचारता. कोणताही संशय मनात येऊ न देता, ऑर्डर आली, की शस्त्र उचलून समोरचा माणूस मारणे. वा हातातले मिसाईल वा अणुबाँब फेकणे. मग स्त्रिया मरतील की मुले हा विचारही नाही करायचा. "टोटल ब्लाईंड फेथ इन द ऑर्डर"
तो सैनिक म्हणजे प्यादे असतो. त्याने स्वतःच्या डोक्याने विचार करायचाच नाही, अशी बेसिक कन्सेप्ट त्यात असते.
आणि म्हणूनच सैन्याचा अल्टिमेट मालक, हा सिव्हिलिअन असतो. तो स्वतः "सैनिक" नसतो. तो सगळ्या 'श्रद्धांना' प्रश्न विचारत असतो, विचारू शकतो. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान इ. लोकांचे या सैनिकांवर नियंत्रण असते, ते याच साठी. लष्करशहा जिथे राज्यसत्ता ताब्यात घेतात तिथे काय होते, हे समजायला फार शाळा शिकावी लागते असेही नव्हे.

हे झाले "सैन्यातील" सैनिकांबद्दलचे.

*

"श्रद्धे"बद्दल तुमची जी काय आख्याने सुरू आहेत, त्या तुमच्या विचारसरणीचा शेवट अशा 'श्रद्धावानांच्या फौजा' निर्माण करणे हाच असतो.

मिलिटरी सदृष ट्रेनिंग, व तशीच विनाप्रश्न आदेश पाळणारी कार्यकर्त्यांची फौज, हा, जिच्यावर तुमची 'श्रद्धा' आहे, त्या व तशा संघटनेचा मूळ ढाचा असतो.

तुम्ही जे २-३ दिवसांपासून, "अंधश्रद्धा निर्मूलन करणे म्हणजे आम्हा हिंदूंचा धर्म भ्रष्ट व नष्ट करणे" हे अनेक शब्दांचं जंजाळ वापरून रेटून सांगत आहात, व 'श्रद्धा' जोपासण्याचा जो प्रयत्न करीत आहात, त्यात डोळसपणेठेवलेल्या अतीश्रद्धेचा परिपाक, श्रद्धावानांच्या फौजा निर्माण होणे हाच होणार असतो.

या भोंदू धर्मश्रद्धा जोपासताना तुम्ही सतीच्या प्रथेचेदेखिल केलेले समर्थन इथेच मायबोलीच्या बखरीत आहे, हिंदुत्वाच्या धाग्यावर.

पराकोटीच्या श्रद्धावान व सांघिक उपासना करणार्‍या पश्चिमेतल्या धर्मांचा आदर्श तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचा आहे का? मत तिकडे झाले तसे क्रूसेड्स अन जिहाद, इतकेच उरते. प्लस, "राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश" (म्हंजे पूर्वी पोप चा किंगवर असायचा, किंवा जसा बीजेपीवर संघाचा अन त्यांच्या डोक्यावर 'साधूसंतांच्या जत्थ्यांचा' असतो, तसा). याचा एंडपॉइंट कुठे येतो ते मी लिहायलाच हवे का?

हे सगळे मुद्दे वेगळे भासत असले, तरीही अंधश्रद्धा निर्मूलनाला असलेला तुमचा व तुमच्यासारख्या इथल्या आयडींचा विरोध पहातानाही, हाच छुपा अजेंडा रेटलेला मला दिसतो आहे.

एकदाचे देशातल्या सगळ्याच नागरिकांना असे पराकोटीचे "श्रद्धावान" बनवले, की धर्माचे मुखंड म्हणविणार्‍या काही बनेल लोकांनी फतवा काढला, की ते 'श्रद्धावान' नागरिक डोळे झाकून विकृत चाळे करू लागतात, हे तुम्ही ज्या धर्माकडे बोट दाखवून त्याचा बागुलबुवा करत असतात, त्याच बागुलबुव्याकडे पाहून क्षणात लक्षात येते.

*
नेमक्या अशा आंधळ्या सश्रद्ध वागण्यास माझा विरोध आहे.

देवा धर्मावरील विश्वास ठेवणे, वा धर्माचरण करणे याला कुणाचाही विरोध नाहीये. अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांचा तर अजिबातच नाही.

"धर्म बुडाला!" अशा आरोळ्या ठोकणे बंद करून हे नक्की काय सुरू आहे, ते डोळे उघडून पाहिलेत तर जरा बरे होईल, असे सुचवतो.

श्रद्धा ठेवा, पण ती श्रद्धा मी का ठेवतो आहे हा प्रश्न विचारायची हिम्मत अंगात असू द्या, हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा गाभा आहे. लोकांच्या श्रद्धांना हात घालून त्यांना लुबाडणार्‍या, त्यांचे शोषण करणार्‍यांना लगाम, हा या जादूटोणा विरोधी कायद्याचा गाभा आहे.

आपल्याला महाश्रद्धावान धर्मांध धार्मिकांच्या जिहादी फौजा निर्माण करायच्या आहेत, की डोळस, सशक्त, सुदृढ भारतीय समाज, ज्यात सगळ्याच धर्माचे लोक आपापल्या श्रद्धा व धर्म आपपल्या घरी ठेवून राष्ट्रधर्मी पाळून देशाच्या उभारणीस मदत करतील, असा समाज बनवायचा आहे, हा चॉइस आपला आहे.
(प्रगत राष्ट्रांत अशीच बाय चॉइस वागणूक असते Happy )

*

आता याला अनेक तेल लावलेल्या बगला देण्यात येतीलच,
फक्त हिंदूंच्याच श्रद्धांबद्दल का बोलता? हा घिसापिटा प्रश्न विचारला जाईलच.
याशिवायचेही प्रश्न व त्यांची उत्तरे मला पाठ आहेत, ती देखिल मी देईनच.
कितीदाही उत्तर दिले तरी तुमचे तुणतुणे सुरू रहाणारच. हे देखिल मला ठाऊक आहे.

फक्त, चर्चा वाचणार्‍या नव्या लोकांना तुमच्या लंब्याचवड्या पोस्टींमागचा 'हिडन अजेंडा' दिसावा यासाठी ही पोस्ट टंकली आहे.

लिंटीं,

१००००००००० + अनूमोदन !!

तुम्हाला म्हणायच आहे तेच प्रतीत झालय ह्या बातमीत !

लष्करात जायचं? ना ना!...

म टा वृत्त
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/---/a...

स्वातंत्र्यदिन आणि राखीपौर्णिमा यादरम्यान नागपुरात तीन विभागातील कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया सुरू झाली. महसूल विभागाने लिपिक आणि तलाठी या दोन पदांसाठी जाहिराती काढल्या गेल्या. लिपिकाच्या जागा होत्या ५५ आणि तलाठ्याच्या ४१. त्यासाठी अर्जांचा पाऊस पडला. ३६ हजार ७९१ अर्ज प्राप्त झाले. याचदरम्यान वनविभागानेदेखील वनरक्षकपदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतली, त्यासाठी रांगेत होते १४ हजार ५०० उमेदवार. एका प्रतिष्ठित कॉलेजने अटेंडंटच्या एकाच जागेसाठी जाहिरात दिली, त्यासाठी ८५१ अर्ज प्राप्त झाले.गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात लष्करातील जवानपदासाठीही भरती सुरू आहे. तेथे सुमारे ७५ जागांसाठी फक्त सहा हजार अर्ज आले आहेत. यावरून तरुणाई कुठल्या प्रकारच्या नोकरीला प्राधान्य देते, त्याचा अंदाज यावा.

दृष्टिक्षेपात...

पद / जागा / अर्ज

तलाठी / ४१ / २१,२८६

लिपिक / ५५ / १५५०५

वनरक्षक / २२२ / १४,५००

जवान / ७५ / ६०००

जे ६००० लोक जवान व्हायला तयार झाले त्यापैकी कितीनां दुसरी नौकरी मिळाली तर ही जवानांची नौकरी सोडून, तिथे जातील?

जर सर्व भारतीय शिक्षित झाले आणि श्रद्धाहीन असले मग सैनिक बाहेरुन मागवावे लागतील.

बाकी भारताकडे सैनिक असले काय अन नसले काय आपला रोजगार चालतोय ना मग झाल.

मुटे साहेब,

आता बरीच सारवासारव होईल ईथे !!

बाकी तोंड दिलय म्हणून बोलणारे ईथे जास्तच !!

तुम्ही मनावर घेऊ नका !

इब्लिस, तुमची पोस्ट पटली. पण त्याचा काही फायदा होणारे का? इथे अनादिअनंत काळापासून हीच अर्ग्युमेन्ट्स पुन्हापुन्हा होत रहातात. निष्पन्न काही होत नाही. गेल्या वीसेक वर्षांत समाजाचे ध्रुवीकरण किती तीव्र झाले आहे हे मात्र यातून पक्कं दिसून येतं.

मुटे, तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल, कामाबद्दल इथे कुणाला काही शंका असेल असं वाटत नाही. फक्त तुम्ही मांडलेल्या लेखातले विचार पटले नाहीत म्हणून त्याविरोधी लिहिण्यात आलंय. >>> +१

इब्लिस, पोस्ट पटली पण इतकी मोठी पोस्ट लिहूनही खूप काही फरक पडेल असं वाटत नाही.

Evil is powerful when good men are timid.

तुमच्या माझ्या सारखे लोक या प्रतिगामी, मूलतत्ववाद्यांचा प्रतिवाद करीत नाहीत,
सगळ्या जनांना स्वतः विचार करून या भंपक प्रचारामागचा अर्थ आपोआप उमगेल असे समजतात,

त्यामुळे नवतरुणांना यांचे विचार फेसबुकावर पटतात.

तरुणांनीही थोडे वय वाढल्यावर १९व्या वर्षी विचार करायला सुरुवात केली की हे सपशेल तोंडावर आपटतात.

I am good, and i wont be timid.

ज्या नवतरुणांना टार्गेट करून हे लोक त्यांना 'बनवत'आहेत, त्यांना थोडी खीळ तर नक्कीच घालीन मी.

*

तेल लावलेली नवी बगल म्हणून,

डुप्लिकेट आयड्या घेऊन लष्करात भरती होण्या बद्दलच्या पोस्टि जेव्हा मंद श्या जोशात टाकाव्या लागतात, तेव्हा मला यांची कीव येते, व विचारावेसे वाटते, बबडू, चल, येतोस का लष्करात?

काय टोणगे, येणार का सीमेवर? सध्याची नोकरी सोडायची का? झालंय आपलं संचलन वालं ट्रेनिंग ना? तिथे मिल्ट्रीत रोज संचलन अस्तं. येता का गम्मत पहायला एन्डीएत?

की डेक्कन च्या बस स्टॉप वर येणार? तुमची जुनी व आवडीची जागा??

की पानटपरीच्या कोपर्‍यावर उभे राहून 'अहो, 'त्यांनी' अमुक केले, आपल्याला आता काही करायला हवे बरे का..' अशी कुजबूज माजविण्याची औकातच दाखवित रहाणार?

इन मिन ३ टिनपॉट आयड्या इथे टिमक्या बडवत आहेत.

मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायची हिम्मत नाही. पैलवान माझ्या एका प्रश्नाला उत्तर देईना. हे लिंबूभाऊ आमचे मित्र, फकस्त हापिसातून उत्तरे लिवतात Wink

इतरत्र, सुटून जाता येईल अशी तेल लावलेली बगलही नीट देता येत नाहीये मुद्द्यांना.

मिल्ट्री भरतीच्या जाहिराती अन बातम्या टाईप करतात उत्तर म्हणून. हसू की रडु यांना?

आजपर्यंत तरी या देशाला सैनिकांची कमतरता भासलेली नाहिये.
अन भासणारही नाही.
आम्हाला सैनिक हवेत, ते आहेत.
जिहादी वा क्रूसेडर्स नकोत. ते आम्ही खपवून घेणार नाही.

जर सर्व भारतीय शिक्षित झाले आणि श्रद्धाहीन असले मग सैनिक बाहेरुन मागवावे लागतील.
<<
लाज वाटत नाही या माणसाला.
कि शिक्षित झाले तर लोक देशप्रेम विसरतात म्हणायला!!
शिक्षित झाले तर!!
अरेरेरेरे. खरे बाहेर आले मळमळीतले.
काय हो,
की सैनिक म्हणजे निर्बुद्ध प्यादी हे मनी उमगल्याने, व याच न्यायाने भारतातल्या अनेक जाती जमातींना व स्त्रियानाही शतकानुशतके अशिक्षित ठेवून त्यांच्याकडून फक्त सेवा करवून घेतली होती???
जनावरासारखी निर्बुद्धपणे??
बाहेरून सैनिक?
हसू का पुन्हा?

अ‍ॅडमिन,

ईथल्या प्रतीक्रिया बघीतल्या का ?

नेहेमी प्रमाणे डोळेझाक करणार ?

का, काही कारवाईची अपेक्षा ठेवावी ?

इब्लिस,

तुमची २४ ऑगस्ट, २०.५० ची पोस्ट पटली. फक्त त्या विचारांचे कायद्यात रुपांतर करताना जी काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी साशंकता वाटते. कोणताही कायदा राबवताना ४ प्रक्रिया असतात. कायदा बनवणे, समाजाने तो पाळणे, व्यवस्थापनाने (सरकारने) त्याची अंमलबजावणी करणे आणि कायदेभंग झाल्यास न्यायालयाने त्याबद्दल शासन करणे. दुसरी, तिसरी आणि चौथी प्रक्रिया काही अडचणी न येता राबवण्यासाठी पहिली प्रक्रिया सर्वांची मते विचारात घेऊन केली पाहिजे. ती इथे झालेली दिसत नाही.

>>>> फक्त, चर्चा वाचणार्‍या नव्या लोकांना तुमच्या लंब्याचवड्या पोस्टींमागचा 'हिडन अजेंडा' दिसावा यासाठी ही पोस्ट टंकली आहे. <<<<< Lol Lol Lol
इब्लिसराव, जवळपास फुटपट्टी आहे का? सहाइन्चीदेखिल चालेल. नसेल तर वीतीनी मोजा, माझ्या पोस्टची "उंची" अन तुमच्या पोस्टची लांबी! Wink

लिंबाजीराव,
पोस्टीमागचा, व पोस्टींमागच्या या दोघांत काय फरक आहे हो?
तुम्ही या विषयावर लिहिलेल्या सगळ्या पोस्टींबद्दल लिहिले आहे ते. आता फुटपट्टी घ्या, अन आपल्या सर्व पोस्टी मोजा. Wink

रच्याकने, तुमच्या पोस्टची "उंची" समजली, माझ्या पोस्टीतल्या विचारांची "खोली" तुम्हाला समजूनही तुम्ही बगलच देणार हे मला ठाऊक आहे.

इब्लिस,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> ऑर्डर आली, की शस्त्र उचलून समोरचा माणूस मारणे. वा हातातले मिसाईल वा अणुबाँब फेकणे. मग स्त्रिया
>> मरतील की मुले हा विचारही नाही करायचा. "टोटल ब्लाईंड फेथ इन द ऑर्डर"

सैनिक अणुबॉम्ब डागत नाहीत. त्यासाठी निर्णय घेणारी वेगळी यंत्रणा असते. अगदी शेवटल्या क्षणापर्यंत राजकीय नेतृत्वाची अनुमती घेतली जाते. पंतप्रधान या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. अधिक माहितीसाठी पहा : http://en.wikipedia.org/wiki/Nuclear_Command_Authority_%28India%29

स्त्रिया मारतील की मुले हा विचार नागरी नेतृत्वाने करायचा आहे. उगीच भारतीय सैनिकांच्या नावाने काहीबाही ठोकून देऊ नका!

२.
>> तो सैनिक म्हणजे प्यादे असतो. त्याने स्वतःच्या डोक्याने विचार करायचाच नाही, अशी बेसिक कन्सेप्ट
>> त्यात असते.

साफ साफ साफ चूक! प्रथम तुमच्या राष्ट्राची सुरक्षा, मग सैन्यातल्या इतरांची सुरक्षा आणि सर्वात शेवटी स्वत:ची सुरक्षा हा प्राधान्यक्रम सैनिकाला सतत लक्षात ठेवावा लागतो. यासाठी विचार करून स्वत:चं डोकं सदैव तल्लख ठेवावं लागतं. हाच क्रम सन्मान (ऑनर) आणि कल्याण (वेल्फेअर) यांच्या बाबतीतही आहे.

३.
>> सैन्याचा अल्टिमेट मालक, हा सिव्हिलिअन असतो. तो स्वतः "सैनिक" नसतो. तो सगळ्या 'श्रद्धांना' प्रश्न
>> विचारत असतो, विचारू शकतो.

मालक जरी श्रद्धांबद्दल तात्विक प्रश्न विचारत असला तरी सैन्याच्या कामात लुडबूड करीत नाही. सैनिकांच्या श्रद्धांना कोणी हातही लावत नाही.

४.
>> "श्रद्धे"बद्दल तुमची जी काय आख्याने सुरू आहेत, त्या तुमच्या विचारसरणीचा शेवट अशा 'श्रद्धावानांच्या
>> फौजा' निर्माण करणे हाच असतो.

डोळस श्रद्धा नावाचा काही प्रकार अस्तित्वात असतो याची तुम्हाला जाणीव दिसत नाही.

५.
>> तुम्ही जे २-३ दिवसांपासून, "अंधश्रद्धा निर्मूलन करणे म्हणजे आम्हा हिंदूंचा धर्म भ्रष्ट व नष्ट करणे" हे अनेक
>> शब्दांचं जंजाळ वापरून रेटून सांगत आहात

आजिबात नाही. चर्चा जादूटोणा प्रतिबंध कायद्याविषयी चालली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी नाही. कायद्यातील संदिग्ध तरतुदींवर आक्षेप नोंदवणे म्हणजे अंधश्रद्धेला उत्तेजन देणे नव्हे.

६.
>> त्यात डोळसपणे न ठेवलेल्या अतीश्रद्धेचा परिपाक, श्रद्धावानांच्या फौजा निर्माण होणे हाच होणार असतो.

असू शकतो. म्हणूनच डोळस श्रद्धा ठेवावी. त्यासाठी नामस्मरण उपयोगी येतं. हे अनेक संतांनी सांगितलं आहे. पण ते करणार कोण!

७.
>> या भोंदू धर्मश्रद्धा जोपासताना तुम्ही सतीच्या प्रथेचेदेखिल केलेले समर्थन इथेच मायबोलीच्या बखरीत आहे,
>> हिंदुत्वाच्या धाग्यावर.

सती ही नेहमीची प्रथा (routine custom) कधीच नव्हती. तशी असती तर गावोगावी सतींची देवळे दिसली असती. सहजानंद स्वामींच्या मते सती जाण्याचे मूळ वेदात सापडत नाही.

८.
>> पराकोटीच्या श्रद्धावान व सांघिक उपासना करणार्‍या पश्चिमेतल्या धर्मांचा आदर्श तुम्हाला डोळ्यासमोर
>> ठेवायचा आहे का?

नाही.

९.
>> मत तिकडे झाले तसे क्रूसेड्स अन जिहाद, इतकेच उरते

पाकिस्तान विसरलात तुम्ही. त्यांनी केलेली ५ युद्धेही (४ थेट, १ अप्रत्यक्ष) विसरलेले दिसताहात. त्यांना धडा कोण शिकवणार!

१०.
>> प्लस, "राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश" (म्हंजे पूर्वी पोप चा किंगवर असायचा, किंवा जसा बीजेपीवर संघाचा
>> अन त्यांच्या डोक्यावर 'साधूसंतांच्या जत्थ्यांचा' असतो, तसा). याचा एंडपॉइंट कुठे येतो ते मी लिहायलाच
>> हवे का?

भाजपवर संघाचा काडीइतकाही अंकुश नाही. तसं असतं तर राममंदिर केव्हाच बांधून झालं असतं. भाजपची हिंदूंच्या तोंडाला पानं पुसायची हिम्मत झाली नसती.

११.
>> हे सगळे मुद्दे वेगळे भासत असले, तरीही अंधश्रद्धा निर्मूलनाला असलेला तुमचा व तुमच्यासारख्या इथल्या
>> आयडींचा विरोध पहातानाही, हाच छुपा अजेंडा रेटलेला मला दिसतो आहे.

छुपा अजेंडा हा अतिशय यातनामय आरोप आहे! Proud आम्ही महाराष्ट्र सरकारइतके बेअक्कल आणि कर्मदरिद्री आहोत का फॅसिस्ट पद्धतीने राज्यकारभार हिसकावून घ्यायला? हे असलं जे काही बोलताहात ना, ते महाराष्ट्र सरकारला जाऊन सांगा. त्यांना जादूटोणा गेस्टापो नेमायचेत. फॅसिस्ट ते आहेत. आम्ही नाही.

आमचा अजेंडा उघड आहे. त्यास हिंदू मतपेढी योजना म्हणतात. ही योजना पूर्णपणे सनदशीर आहे. छुप्या आणि बेकायदेशीर गोष्टी करायची गरज नाही. असले चाळे कोण करतो ते आम्हाला माहीत आहे.

१२.
>> एकदाचे देशातल्या सगळ्याच नागरिकांना असे पराकोटीचे "श्रद्धावान" बनवले, की धर्माचे मुखंड
>> म्हणविणार्‍या काही बनेल लोकांनी फतवा काढला, की ते 'श्रद्धावान' नागरिक डोळे झाकून विकृत चाळे
>> करू लागतात,

अगदी साफ साफ बरोबर. पाकिस्तानात हेच चालतं.

१३.
>> नेमक्या अशा आंधळ्या सश्रद्ध वागण्यास माझा विरोध आहे.

आमचाही आहे.

१४.
>> हे तुम्ही ज्या धर्माकडे बोट दाखवून त्याचा बागुलबुवा करत असतात, त्याच बागुलबुव्याकडे पाहून
>> क्षणात लक्षात येते.

अगदी साफ साफ चूक. हिंदू धर्म अनादि आणि अनंत आहे. हिंदूंमध्ये श्रद्धेला प्रश्न विचारायची सोय आहे. श्रद्धावान् लभते ज्ञानम् असं प्रत्यक्ष श्रीकृष्ण गीतेत म्हणून गेलेत. हे ज्ञान श्रद्धावान माणसाच्या मनात मनन आणि चिंतनातून येतं. मनन आणि चिंतनात प्रश्न विचारावेच लागतात.

ज्याला तुम्ही बागुलबुवा म्हणता ती सार्थ भीती आहे. अनिसचे जादूटोणा गेस्टापो नेमण्यामागचं प्रयोजन काय?

१५.
>> देवा धर्मावरील विश्वास ठेवणे, वा धर्माचरण करणे याला कुणाचाही विरोध नाहीये. अंधश्रद्धा निर्मूलन
>> वाल्यांचा तर अजिबातच नाही.

मग कायदा इतका संदिग्ध का ठेवला? भोंदू म्हणजे कोण? अनिष्ट प्रथा म्हणजे काय? या व्याख्या धडपणे का केलेल्या नाहीत?

१६.
>> "धर्म बुडाला!" अशा आरोळ्या ठोकणे बंद करून हे नक्की काय सुरू आहे, ते डोळे उघडून पाहिलेत तर
>> जरा बरे होईल, असे सुचवतो.

डोळे उघडूनच पाहतोय. म्हणून कायद्यातल्या विसंगत्या दिसताहेत.

१७.
>> श्रद्धा ठेवा, पण ती श्रद्धा मी का ठेवतो आहे हा प्रश्न विचारायची हिम्मत अंगात असू द्या

आहे हिम्मत. पण ही चर्चा जादूटोणाविरोधी कायद्याबद्दल चालली आहे. श्रद्धेबद्दल नाही.

१८.
>> लोकांच्या श्रद्धांना हात घालून त्यांना लुबाडणार्‍या, त्यांचे शोषण करणार्‍यांना लगाम, हा या जादूटोणा
>> विरोधी कायद्याचा गाभा आहे.

संदिग्ध तरतुदी केल्यामुळे या कायद्याचं मूळ उद्दिष्ट स्पष्ट होत नाही.

१९.
>> आपल्याला महाश्रद्धावान धर्मांध धार्मिकांच्या जिहादी फौजा निर्माण करायच्या आहेत, की डोळस, सशक्त,
>> सुदृढ भारतीय समाज, ज्यात सगळ्याच धर्माचे लोक आपापल्या श्रद्धा व धर्म आपपल्या घरी ठेवून राष्ट्रधर्मी
>> पाळून देशाच्या उभारणीस मदत करतील, असा समाज बनवायचा आहे,

जे लोकं आपापल्या श्रद्धा व धर्म आपापल्या घरी ठेवत नाहीत त्याचं काय करायचं?

२०.
>> प्रगत राष्ट्रांत अशीच बाय चॉइस वागणूक असते

नावं घेणार का या राष्ट्रांची?

२१.
>> फक्त, चर्चा वाचणार्‍या नव्या लोकांना तुमच्या लंब्याचवड्या पोस्टींमागचा 'हिडन अजेंडा' दिसावा यासाठी
>> ही पोस्ट टंकली आहे.

छुपं उद्दिष्ट कशाला, उघडपणे सांगतो की आम्हाला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य म्हणजे राम नावाच्या राजाचं राज्य नव्हे. तर रामाच्या राज्यात प्रजा जशी धर्मसंपन्न होती तसं धर्मपालन लोकांकडून करविणं. रामराज्यातल्या प्रजेने धर्मपालनाद्वारे प्रत्यक्ष रामावर दबाव टाकून सीतेच्या राणीपदाविषयी शंका उपस्थित केली.

हल्लीचे राज्यकर्ते लोकांना किती किंमत देतात ते मी सांगायला नकोच.

आ.न.,
-गा.पै.

तर रामाच्या राज्यात प्रजा जशी धर्मसंपन्न होती तसं धर्मपालन लोकांकडून करविणं. रामराज्यातल्या प्रजेने धर्मपालनाद्वारे प्रत्यक्ष रामावर दबाव टाकून सीतेच्या राणीपदाविषयी शंका उपस्थित केली. >>

अरे बाप रे!! हे असले रामराज्य आम्हाला कदापिही नकोय . असली धर्मपालन करणारी प्रजाही नकोच.

पैलवान,
हा विनोदी प्रतिसाद इथे लिहिण्या ऐवजी तिकडे इंग्लंडात रामराज्य चळवळ सुरू करा पाहू.

>>
भाजपवर संघाचा काडीइतकाही अंकुश नाही.
<<
नवा जोक आहे का एकादा?

Pages