सोन्याचा बोरु, पितळेचे भांडे

Submitted by चिंतामण पाटील on 23 August, 2013 - 06:46

सोन्याचा बोरु, पितळेचे भांडे
दिवसभरच्या रिपरिपीनंतर पाऊस थाबंला होता. तसा गेला महिना झाला पाऊस कोकणासारखा कोसळत होता. घरी आलो तेव्हा सायंकाळ होत आलेली. ओट्यावर आई माझीच वाट बघत बसलेली. ओट्यावर चढलो तसा ती ओक्साबोक्सी रडू लागली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काही बोलायच्या आत `` अरे भाऊ तो गोरखनं काय व्हयनं म्हणे? मरी गया म्हणे! `` मला गावाबाहेर कानघून लागलीच होती. मी तपास केला तर बातमी खरी होती. गोरखशेठ मरण पावला होता. पण म्हणावी तेवढी बातमी वार्‍यासारखी पसरावी म्हणतात तशी काही पसरली नाही.
गावाला शहराचा रस्ता माहित नव्हता तोवर आमच्या गावात सोनार, बामण्,गुजराथी, परदेशी रहायचे. तेच गावात गब्बर होते. कुणबीतर त्यांच्याकडे राबायचे. ते सगळेच आता शहरवाशी झालेत त्यातला गावातला हा शेवटचा सोनार. गोरख सोनार.
गावात बारा बलुतेदारांचं राज्य होतं तेंव्हा आमच्याही गावचे सोनार नांदते होते. गावच्या आजूबाजूला सोनारांची सुपीक जमिन होती. त्यावरुन शेतांना सोनारे, सोनारपांढरी अशी नावे होती. पूर्वी गावात सोनारांची चारपाच घरे होती. ही मंडळी पंचक्रोशीच्या आधारावर धंदा करायची. पण स्वातंत्र्यानंतर गावे बदलली. बारा बलुतेदारातली उच्चवर्गीय मंडळी गाव सोडून शहरवासी होऊ लागले. त्यात सोनारही होतेच. अपवाद फक्त गोरख सोनाराचा.