परत एकदा निर्भया ...

Submitted by छोटी on 23 August, 2013 - 04:44

एका महिला चित्रपत्रकारावर (फोटोजर्नालिस्ट) मध्य मुंबईतील परळ भागात पाच जणांना सामूहिक बलात्कार...
"चाळ' या विषयावर काम करणारी ही तरुणी तिच्या एका सहकाऱ्यासमवेत या भागात आली होती. यावेळी सहकाऱ्याला बांधून ठेवून या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणीस जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला काही अंतर्गत दुखापती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारत देशात महिला ह्या आता खूप असुरक्षित आहेत
महाराष्ट्राचा बिहार होत आहे..
कुठे तरी मला एकदा वाटून गेल
मला अजिबात गर्व नाही महाराष्ट्रीन असल्याचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महराष्ट्राचा बिहार होत आहे या विधानाचा अर्थ मला हल्ली हल्ली समजेनासा झाला आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी अनेकदा बिहारमध्ये गेलो होतो. तेव्हा बिहार मागासलेला तर होताच, पण गुन्हेगारीही भरपूर होती. तेव्हा महाराष्ट्र तुलनेने बराच बरा होता. पण ते दिवस केव्हाच बदलले. महाराष्ट्रात प्रचंड गुन्हेगारी वाढली. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे झाली. स्त्रियांची सुरक्षितता हा प्रश्न इतर अनेक राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठा प्रश्न ठरला. आपण हल्ली हल्ली उगाचच बिहारला बदनाम करतो असे वाटते. वास्तविक पाहता महाराष्ट्र आता फार काही महान राज्य राहिलेले नाही त्या दोन निकषांवर, गुन्हेगारी आणि विकास!

हल्ली पेपरात येणा-या सगळ्या बातम्या एकत्रित वाचल्या की भारत हा काही महान राहिलेला नाहीय असे वाटायला लागते.

आजच्या डिएनेमध्ये या मुलीच्या बातमीत एक वाक्य होते 'शक्ती मिल एरिआ प्रचंड मोठा आणि ओसाड असा भाग आहे आणि तिथे गर्दुल्ल्यांचे वास्तव्य आहे.' हे वाचल्यावर मनात आले 'या मुलीला रात्रीच्या वेळी अशा जागी जायला कोणी सांगितले होते?' लगेच पुढचा विचार मनात आला. 'ह्या बिनकायद्याच्या राज्यात लोक असेच कसलाही धाक नसल्यासारखे वागायला लागले तर उद्या घरी बसुन अभ्यास करणा-या माझ्या मुलीवरही कोणी घरात घुसुन अत्याचार करेल आणि मग लोक मला विचारतील, तरण्या मुलीला घरात एकटी ठेऊन तू कुठे बाहेर नोकरी करायला गेलेलीस म्हणुन. असल्या ह्या देशात बायकांनी करावे तरी काय....

हे लोक एवढे पाशवी , जनावरापेक्षाही वाईट कसे काय वागू शकतात ?
यांना कशाचीही लाज,भीती कशी वाटत नाही ?
संध्याकाळी ५ वाजता ती तिच्या सहका-याबरोबर त्या मिल च्या इथे गेली होती असे टी व्ही - बातम्यात सांगितले.
तात्पर्य - कुठल्याही वेळी आणि कुठेही तुम्ही सुरक्षित नाही.

मुंबई गॅंग रेप : पाच जणांना अटक, तरूणीने दोघांना ओळखलं

मुंबईत गुरुवारी रात्री झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत तरुणीनीने दोघांना ओळखलं. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. ओळखलेल्या पैकी दोघांची नावे रुपेश आणि जावेद असल्याचे पोलिसांकडून समजते.

पीडित तरूणी आणि तिच्या सहकारी मित्राने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रेही बनवली आणि ती प्रसिद्ध केलीत. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रात्री उशीरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शक्तीमील कंपाऊड परिसरातील २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

पीडित तरुणी एका इंग्रजी मासिकात प्रशिक्षणार्थी पत्रकार असून ती तिच्या एका सहका-यासोबत शक्तीमिल परिसरात असाईमेंटवर गेली होती. तेथे त्यांना पाच अनोळखी तरूणांनी हटकले. पाच जणांपैकी दोघांनी तिच्यासोबत असलेल्या सहका-याला धमकी देत धरून ठेवले आणि उर्वरित तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची प्राथमिक चौकशीत माहिती मिळाल्याचे मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.

या प्रकाराची राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेत बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी सुमारे १८ पोलीस पथके तयार केली होती. दरम्यान, पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. या पाचही जणांची ओळख पटली आहे. अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

पहाटे २च्या सुमारास हि बातमी दाखवत होते, तेव्हापासूनच काही सुचत नाहीये, काय प्रतिक्रिया देणार. चीड, संताप, डोके बधीर असे सर्व एकत्र झालेय.

कठीण परिस्थिती आहे. षंढ राज्यकर्ते, निष्फळ कायदे... या देशात स्त्री म्हणुन जन्माला आलोय हीच चुक झालीये !!! Sad

सारख्या बलात्काराच्या बातम्या वाचुन खरच काय करावे हेच कळत नाही.:राग: या गुन्हेगारांना न्यायालयात नेताच कशाला? नुसते सक्तमजूरी वा ४-५ वर्षाच्या सजा भोगायला?:राग:

लोकांच्या/ जमावाच्या ताब्यात द्या त्यांना. ढेकणासारखे चिरडले जातील तेव्हा समजेल. जमावाचा राग अतीशय हिंस्त्र प्रकारचा असतो. अशी सजा बघीतल्यावरच असले घृणास्पद प्रकार कमी होतील. फाशी जन्मठेप सोडुन द्या आता. द्या नाहीतर पिसाळलेल्या कुत्र्या लांडग्यांच्या ( खरोखरच्या) ताब्यात.

पुण्यातील पण एक भयानक बातमी वाचली. जीवेच मारलेय तिला. केवळ ११ वर्षाची.
सगळ्या भावना मरुन केवळ एकच भावना शिल्लक राहिली आहे का या नराधमांची ?

-----

दिल्ली गँग रेपची बातमी अजून जुनी झालेली नाही, त्या घटनेचे पडसाद अजूनही मनावर असतानाच एक बातमी येऊन कानावर आदळली......’एका पत्रकार तरुणीवर सामुहिक बलात्कार..एक अटक आणि अजून चौघांचा शोध सुरु....’
हि घटना मुंबईतली आहे. वासनेच्या गटारातले किडे आहेत हे.....कधी बदलणार हि परिस्थिती?

Angry

अत्यंत लाजिरवाण्या स्थितीत आपला देश येऊन पोहोचला आहे. कसलीही सद्सद्विवेक बुध्दी नाही, भिती नाही, चाड नाही अन रक्तात गर्मी नाही.
यापेक्षा किडे अन प्राणी बरे.
उद्विग्न ,केवळ उद्विग्न!!!
अन या पोस्ट्स वाचल्या तर आणखी कलवाकालव होते
http://in.news.yahoo.com/us-student-calls-india-travellers-heaven-womans...?

अवघड आहे खरोखर! Sad
परवाच सीएनएन वर त्या अमेरिकन मुलिचे अनुभव वाचले, आणि आज मुंबईत सुद्धा हे घडले. इतके महिने होउन सुद्धा त्या दिल्ली गँग रेपवाल्यांना शिक्षा झालेलि नाहिये, आता इथे किति वर्ष लागतिल कोण जाणे.

नुसतं Angry Sad टाकून काहीही उपयोग नाही
प्रत्येकाने स्वतःच्या मुलीला आधी फिजिकली आणि तरीही काही बर-वाईट झालंच तर मेंटली स्ट्राँग बनवायला सुरुवात करा

इथे सरकार नियम, मानसिकता बदल काहीही होणार नाहीये .....
कोणावर डिपेण्ड न रहाता स्वतःच स्वतःला वा चवा Sad

इतकं काही होऊनही अजुन बलात्कार्‍यांना मृत्युदंडाची शिक्षा नाही....
आत्ताच हे इतकं आहे
भविष्यात अजुन वाढेल कदाचित!
आपण आत्ताच आपल्या पासून उपाय का नाही करत आहोत?

"परवाच सीएनएन वर त्या अमेरिकन मुलिचे अनुभव वाचले" - लगेच ती मुलगी अमेरिकन असल्यामुळे उलट-सुलट प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मिळाल्या (काही). आजची हि मुंबई ची आणी पुण्याची बातमी.. अक्षरशः दररोज अशा बातम्या येतात (कालच अजून दोन बातम्या ह्याच धर्तीवरः ३ वर्षाच्या मुलीची आणी एका विवाहितेवर वडिलांनीच अतिप्रसंग केल्याची): संतापजनक / उद्वेगजनक आहे हे सगळं.

'स्त्री'ला किंबहूना कुठ्ल्याही व्यक्तीला एक माणूस म्हणून मान देऊच शकत नाही का आपण? तो तर लोकशाही चा पाया असतो ना? ही कसली कुणालातरी गुलाम / वस्तू समजण्याची क्षुद्र आणी हलकट वृत्ती? आजच्यापेक्षा काल बरा होता असं म्हणत रहायचं आणी कुणीही कधीही न पाहिलेल्या, पुराणकालीन सुवर्णकालीन संस्कृती च्या नावाचा पोकळ जयजयकार करत रहायचं. स्वतःच्या असहायतेचा राग येतो, पण मग ज्यांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्यांना अधिकार दिले, त्यांनी तरी स्वतःच्या अधिकाराचा उपयोग करून असल्या घाणेरड्या प्रवृत्तींवर जरब बसवून गैरप्रकारांवर आळा घालायला नको का? दर वेळी तोंडदेखली पोकळ बडबड, समर्थनं आणी शॉर्ट पब्लिक मेमरी चा गैरफायदा घेणं.... हेच आणी इतकच!

नुसतं राग अरेरे टाकून काहीही उपयोग नाही
प्रत्येकाने स्वतःच्या मुलीला आधी फिजिकली आणि तरीही काही बर-वाईट झालंच तर मेंटली स्ट्राँग बनवायला सुरुवात करा
कोणावर डिपेण्ड न रहाता स्वतःच स्वतःला वा चवा अरेरे
आत्ताच हे इतकं आहे
भविष्यात अजुन वाढेल कदाचित!
आपण आत्ताच आपल्या पासून उपाय का नाही करत आहोत? >>>>
रिया तु स्वतः काय उपाय सुरु केलेत ते पण लिहि ना, ते सुद्धा वाचल्यावर बाकिच्यांना मदच होणार आहे.

समाज म्हणजे काय? आपणच ना?
रस्त्यात जर कोणि एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर आपण काय करतो?

बसमध्ये कोणि एखादीच्या अंगचटीला येत असेल, ब्रेक्च निमित्त करून एखादीची छाती धरत असेल तर आपण काय करतो?

मी जर बरेचदा अगदी रात्रीसुद्धा कामावरून परत येताना काही वावगं दिसला तर तिथल्या तिथे विरोध केलेला आहे. स्वतःसाठी अन दुसर्यासाठी सुद्धा. खुपदा एकटी पडले पण भारतात राहत असताना हे होणरच. कारण सगळेच फार सभ्य लोक असतात ना! अन याच कारणाने बेक्कार बदनामी करायचे पण प्रकार झाले पण "फक यु " Attitude ठेवल्याशिवाय गत्यंतर नहि. ह्या असल्या बातम्या पहिल्या कि हताशपणा येतोच पण सगळ्यांनीच हातपाय गाळून घेतले तर याच बातम्यात वाढ होणार हे निश्चित.

प्रत्येकाने स्वतःच्या मुलीला आधी फिजिकली आणि तरीही काही बर-वाईट झालंच तर मेंटली स्ट्राँग बनवायला सुरुवात करा>>>
लेक १२ वर्षांची आहे. ती गेले ४ वर्ष अ‍ॅथलेटिक्स करते आहे. तिला माहीत आहे की तिचे खेळणे हे फक्त मेडल्स मिळवण्यासाठी नसून स्वसंरक्षणासाठी सुद्धा आहे. तिला हेसुद्धा सांगीतले आहे की काही वावगे झाले तर नुसते घाबरून बसायचे नाही तर चांगली बोंब मारायची. स्वतः प्रयत्न करायचे नुसते लोक मदत करतील म्हणून वाट बघायची नाही.

Pages