विचारपूस साफसफाई

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

विचारपूस विभागात थोडी साफसफाई केली असून २००७ मधले संदेश काढून टाकले आहेत.

वेबसर्वरच्या माहितीनुसार (Access Logs) इतके जुने संदेश, अगदी सगळ्यात जुन्या पानावर कुणीच जाऊन वाचत नसल्यामुळे कुणाला अडचण येऊ नये.

विषय: 
प्रकार: 

ऍडमीन, मागे मी ह्याच संदर्भात 'मायबोली असे सुधारता येईल' मध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता. विचारपुशीतले जुने संदेश डिलीट करणे हे काम जिकरीचे होऊन बसते कारण एकेक संदेश निवडून तो डिलीट करणे ह्यात बराच वेळ जातो. त्यासाठी संदेशाला एक चेक बॉक्स उपलब्ध करून देता येईल का? म्हणजे मग सगळे Selected Messages एकदमच डिलीट करता येतील.

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

ऍडमीन, कृपया मंजुच्या प्रश्नाला उत्तर द्यावे.

विचारपूस विभागातले जुने संदेश सभासदानी काढून टाकणे अपेक्षीत नाही. काही कालावधीनंतर जुने संदेश आपोआप काढून टाकले जातील अशी सोय आम्ही करतो आहोत. नवीन संदेश सगळ्यात वर असल्यामुळे याला हरकत नसावी.

>>> जुने संदेश सभासदानी काढून टाकणे अपेक्षीत नाही
अगदी बरोबर! Happy (मला वाटते की प्रत्येक जण एकेक पान सिलेक्ट करत डिलीट करु लागल्यास सर्व्हरवरचे लोड अनावश्यक रित्या वाढेल, त्यामुळेच ना?)

शक्य झाल्यास, सभासदाला, त्याच्या एकुण विचारपुशीची प्रिन्ट घेता येईल असे काही करता येईल का? तसे करता आले तर सभासद पीडीएफ बनवु शकेल, मग विचारपुस ठराविक कालावधी नन्तर डिलीट का होईना! Happy
अशीच सोय अर्काईव्ह होऊ शकणार्‍या बीबीन्बाबतही होऊ शकते का?
आपला, लिम्बुटिम्बु