साडीवरील एम्ब्रॉयडरी/ जर्दोसी वर्क पुण्यात कुठे करुन मिळेल?

Submitted by मुग्धटली on 19 August, 2013 - 06:39

माझी एक साडी मी कुंदन वगैरे लावुन भरली आहे. साडिच डिझाईन:- बॉर्डरला सलग वेल आणि मधे बुट्टे अस आहे. बुट्टे आणि वेलीची फुल मी कुंदन लावुन सजवली आहेत. आता फक्त किनारीच्या वेलीमधे दोन फुल जोडायला लागणारा जोड वर्क करायचा आहे. पुण्यात ते कुठे करुन मिळेल आणि किती र्खच येईल?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुळशी बागेजवळ पंड्या यांचे भांड्यांचे दुकान आहे इंद्रायणी रसवंतीच्या लाईनीत तिथून राइटला वळले की मोठे दुकान आहे(2,3 मजली) आता नाव नाही आठवत(सम्राट असावं बहुदा), पण त्यांच्या कडे मिळेल.

पिन्कि ८०, सम्राटवाले हल्ली एम्ब्रॉयडरी/ जर्दोसी वर्क करुन देत नाहीत... माझी पहिली धाव त्याच कुंपणापर्यंत गेली होती... ते फक्त एम्ब्रॉयडरी/ जर्दोसी वर्कचे सामान विकतात भरमसाठ किमतीला.

सायु, धन्स, तुम्हाला अनुभव आहे का या व्यक्तिचा?

क्लोवर सेंटर - बेसमेंट, कॅम्प. दोन - तीन दुकानं आहेत. एक तर फारच एक्सक्लुसिव वर्क करुन देणारं आहे. बिझिनेस कार्ड आहे. नंबर शोधुन देइन. नाही सापडलं तर शनिवारी एक चक्कर असतेच, तेव्हा परत कार्ड आणेन.

मुग्धा: हो अलिकडेच मी काम करुन घेतले आहे याच्याकडून. माझी एक फ्रेन्ड त्याच्याकडून सतत काही ना काही विणून घेत असते. त्याचे काम खरेच खूप सुरेख आहे.