नभी तारकांचा जसा भास झाला

Submitted by माउ on 16 August, 2013 - 22:19

नभी तारकांचा जसा भास झाला
हाय तुझ्या आठवांचा पदन्यास झाला..

झन्कार मोहरावे स्वप्नातल्या स्वरान्चे
सोहळा मीलनाचा असा खास झाला

पहाटे उशाला तुझी जाग आली
जरासा सुगन्धी एकांतश्वास झाला

पुन्हा आरशाने पाहिले तुला
पुन्हा मनाला जरा त्रास झाला

एकेक चांदणीने पुसली तुझी खुशाली
एकेक क्षणाचा मग मधुमास झाला..

-रसिका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कविता समजूनच वाचली होती. गझलेचा उल्लेख कुठेच नव्हता. पण पहिली ओळ वृत्तात आणि नंतर एकही नाही हे खटकलं. ही ओळ एका रद्द केलेल्या माझ्या गझलेत येऊन गेलेली आहे. असो. प्रतिसाद आवडला नसल्यास रद्द करतो.